गव्हांकूर चूर्णाला पृथ्वी वरील संजीवनी म्हणतात. एक उत्तम शक्तीवर्धक आहे. प्रथिने, जीवनसत्वे, कार्बोहायड्रेटस आदींचा मुबलक पुरवठा यातून होतो. यातील क्लोरोफिलच्या मुबलक प्रमाणामुळे याला हिरवे रक्त म्हणतात. ऍनेमिया, हिमोग्लोबिनची कमतरता, कॅन्सर, पचनाचे विकार, ऍलर्जीचा त्रास अशा अनेकविध आजारात हे प्रभावी आहे. शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढून हे शरीराला आतून शुध्द करते. यामुळे सगळ्याच आजारात हे प्रभावी आहे. पोट साफ नसणे, रक्तामध्ये आम्लाचे प्रमाण अधिक असणे आणि शरीरात विष द्रव्ये साचून राहणे ही आजारपण येण्याची प्रमुख कारणे आहेत. गव्हांकूर चूर्ण फायबरयुक्त असल्याने पोट साफ होते, ते पचल्यानंतर रक्त अल्कलाईन करते आणि ते शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढते. यामुळे आजारी व्यक्तीला बरे होण्यासाठी तर निरोगी व्यक्तीला नेहमी निरोगी राहण्यासाठी गव्हांकूर चूर्ण उपयुक्त आहे.
डॉ. विग्मोर यांनी यावर विशेष संशोधन केले आहे. विशिष्ट प्रमाणात गव्हांकूर सेवन केल्यानंतर त्यांचे गँगरिन बरे झाले. गव्हांकूर कँसरच्या पेशींची वाढ रोखते अशी नोंद डॉ. विग्मोर यांनी त्यांच्या संशोधनपर लिखाणात केली आहे.

No comments:
Post a Comment