News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Sunday, 21 December 2014

लठ्ठपणा किंवा वजन कमी करण्याची दशसूत्री


पुण्यातील "आपला जनसंवाद" या पाक्षिकात माझे आरोग्य विषयक काही लेख छापून आले आणि मला गेल्या दीड महिन्यात पुण्यातून साधारण पाचशेपेक्षा अधिक फोन आले. लेखातील विषयाच्या अनुषंगाने आपल्या शारीरिक समस्यांवर चर्चा केल्यानंतर यापैकी सत्तर टक्के लोकांनी आपल्या किंवा आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या लठ्ठपणाचा आणि वाढत्या वजनाचा विषय काढलाच. त्यामुळे वाढत्या शहरीकरणातील बदलत्या जीवनपध्दतीने दिलेल्या या वाढत्या वजनाच्या घातक देणगीवर काही लिहावे असे मला वाटू लागले. त्यातूनच हा लेखप्रपंच करीत आहे. सगळ्यात आधी लठ्ठपणा निर्माण होण्यामागची कारणे कोणती हे पाहू - १. अतिसेवन - वारंवार खात राहणे, फास्ट फूड खाणे, तेलकट, मसालेदार आणि चरबीयुक्त अन्नाचे सतत सेवन, मद्यपान, अमर्याद चहा आणि कॉफी यांचे सेवन, हॉटेलमध्ये वारंवार जेवणे २. अवेळी भोजन - दोनवेळा आणि वेळा ठरवून जेवणे हे निसर्गाच्या नियमाला धरुन आहे. पण, या नियमाचे पालन केले नाही आणि वेळ मिळेल तेव्हा अथवा वाट्टेल तेव्हा भोजन केले की वजन वाढते. ३. जेवणाची चुकीची पध्दत - गडबडीत जेवणे, टी.व्ही पहात अथवा वाचन करत जेवणे, गप्पा मारत जेवणे, जेवल्यावर ताट बाजूला सरकवून तिथेच लगेच झोपणे. ४. विरुध्द अन्न खाणे - मासे, दूध, दही, फळे, पनीर हे आणि यापासून बनविलेले पदार्थ एकमेकांच्या विरुध्द आहेत. त्यांचे एकाचवेळी सेवन करणे. जिभेवर ताबा न ठेवता काहीही आणि कधीही, कसेही खाणे. ५. व्यायामाचा अभाव - वजन वाढण्याचे हे सगळ्यात मुख्य कारण आहे. एकाच जागी बसून काम करणे, अजिबात व्यायाम न करणे, चालण्याचा कंटाळा करणे. ६. काही पदार्थांचे वारंवार सेवन - पुरण पोळी, बासुंदी, श्रीखंड, मासे, मटण, अंडी, पनीर, मिठाई, हलवा, रबडी, दही हे पदार्थ वारंवार खाण्याने लठ्ठपणा वाढत असतो. ७. अनुवंशिकता - काही व्यक्तींमध्ये लठ्ठपणा ही अनुवंशिकता असते. त्यांनी वजन कमी करण्यासाठी फार कडक उपाययोजना करु नयेत. अशांनी यासाठी तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटावे आणि उपाय करावेत. ८. थायरॉईड - थायरॉईड ग्रंथींचे कार्य बिघडले तर काही व्यक्तींना लठ्ठपणा अथवा वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरात अचानक बदल झालाय असे लक्षात आले तर तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटून थायरॉईडची समस्य़ा आहे का याचे निदान करुन घ्यावे. ९. चिंता - वारंवार चिंता करणे, सतत ताण तणावात राहणे यामुळेही वजन वाढते. लठ्ठपणामुळे अथवा वाढत्या वजनामुळे ब्लडप्रेशर, डायबेटीस (मधुमेह), संधीवात, आमवात, हृदयरोग, त्वचा विकार, पित्ताशयाशी निगडीत व्याधी, मूतखडा, नपुसंकता, लैंगिक समस्या, चक्कर येणे, श्वसनाचे आजार, दम लागणे, लवकर म्हातारपण येणे असे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणे आणि ते अटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. लठ्ठपणा किंवा वजन कमी कऱण्याची दशसूत्री - १. रोज सकाळी उठल्यावर अनुषापोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळावा, एक चमचा मध घालावा आणि ते प्यावे. यानंतर अर्धा तास काहीही खावू नये. या अर्ध्या तासात साधारण २ कि.मी. चालण्याचा व्यायाम करावा. दर आठवड्याला हे अंतर एका किलोमीटरने वाढवत पाच किलोमीटरपर्यंत जावे. नंतर एवढे रोज चालावे. २. सकाळचा नाष्टा आणि दुपारी जेवण ही पध्दत बंद करावी. त्याऐवजी सकाळी ९ ते १० यावेळेत पूर्ण जेवण घेण्याची सवय करावी. दुपारी भूक लागलीच तर काकडी खावी. रात्रीचे जेवणही संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत घ्यावे. सकाळच्या जेवणाच्या निम्म्याप्रमाणात रात्री आहार घ्यावा. रात्री जेवल्यानंतर किमान दोन तासांनी झोपावे. दोन्हीवेळेस जेवणाच्या आधी एक तास, जेवताना आणि जेवण झाल्यावर दीड तास अजिबात पाणी पिऊ नये. ३. दोन्हीवेळच्या जेवणाच्या आधी एक तास एक फ्लॅक्स सीड कॅप्सूल घ्यावी. दोन्हीवेळच्या जेवणानंतर लगेच फक्त घोटभर कोमट पाण्यासोबत एक स्पिरुलिना आणि एक मोरिंगा कॅप्सूल घ्यावी. रात्री झोपताना दोन व्हिटग्रास कॅप्सूल्स कोमट पाण्यासोबत एकाचवेळी घ्याव्यात. बाजारातून या कॅप्सूल्स घेताना त्याच्या शुद्धतेबाबत पूर्ण दक्षता घ्यावी. ते शक्य नसेल तर माझ्याशी संपर्क करावा. अतिशय उत्तम गुणवत्तेच्या आणि शुद्धतेच्याबाबतीत खात्रीशीर असलेल्या या कॅप्सूल्स मी तयार करतो. त्या मी तुम्हाला कुरीअरने घरपोहोच पाठवून देऊ शकतो. ४. मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, मांसाहार, हॉटेलचे खाणे आणि जेवणे, गोड पदार्थांचे भरपूर सेवन, चरचरीत आणि चमचमीत पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शिळे अन्न, पापड, लोणचे, केळी, आंबा, सिताफळ, दही, लोणी, तूप, पनीर, तूरीची डाळ हरभरा, उडीद, वांगी, बटाटा, घेवडा, पावटा हे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे. ५. पालेभाज्या, फळभाज्या, मूग, मसूर, मटकी, साय काढलेले दूध, लोणी काढलेले ताजे ताक यांचा आहारात समावेश अवश्य करावा. दूध शक्य असेल तर गाईचे वापरावे. ६. मेथी १०० ग्रॅम, ओवा ४० ग्रॅम आणि काळे जिरे २० ग्रॅम आणावेत. लोखंडाच्या कढईत हे तिन्ही वेगवेगळे साधारण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावेत. नंतर एकत्र करुन त्याचे चूर्ण करावे. रोज रात्री झोपताना व्हिटग्रास कॅप्सूल घेतल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यासोबत हे चूर्ण एक चमचा घ्यावे. ७. दर महिन्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे साजुक तूप घालून प्यावे. यामुळे दुसरे दिवशी सकाळी पोट साफ होत असल्याने हा प्रयोग सुट्टीच्या आधल्या रात्री करावा. ८. जाहिराती पाहून अथवा नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांच्या विक्रेत्यांचे ऐकून वजन कमी करण्यासाठी कसल्याही गोळ्या, पावडर, विविध प्रकारचे ज्यूस, औषधे आणि उपवास यांचे प्रयोग करु नयेत. असे प्रयोग वजन कमी करतीलही पण त्यामुळे शरीराचे नुकसानही होवू शकते. म्हणून असे काही प्रयोग करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ९. शीतपेये, फ्रीजमधील पदार्थ, थंड पदार्थ, थंड पाणी अजिबात सेवन करु नये. शक्य असेल तर सगळ्याच ऋतुत कोमट पाणी पिणे अधिक चांगले. चहा, कॉफी पूर्णपणे बंद करावी. १०. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहारातून साखर पूर्णपणे हद्दपार करावी. त्याजागी गुळाचा वापर करावा. " साखरेचे खाणार त्याला लठ्ठपणा येणार " हे नेहमी लक्षात ठेवावे. या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचे आहे. ताण तणावातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. ते शक्य नसेल तर दररोज किमान एक तासभर मनाला आनंद देणारा एखादा छंद जोपासावा. जुनी गाणी, शास्त्रिय संगीत ऐकावे, हलके फुलके वाचन करावे, निखळ करमणूक करणारे कार्यक्रम पहावेत. डोक्याला ताण देणा-या आणि रडक्या मालिका पाहू नयेत. महिन्यातून एकदा निसर्गाच्या सान्निध्यात शक्य तेवढे पायी फिरावे. आध्यात्माची आवड असेल तर त्यातील ध्यान धारणेसारखे मनाला शांत करणारे प्रयोग करावेत. तीर्थक्षेत्रांना जावे. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणा-यांनी दोन गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मला वाटते म्हणून माझे वजन वाढले आहे, याला काही अर्थ नाही. तुमच्या उंचीला १२ ने गुणल्यावर जे उत्तर येईल त्यापेक्षा अधिक तुमचे वजन असू नये, असे मानले जाते. (उदा. उंची ५ फूट ४ इंच असेल तर त्याला गुणीले १२ म्हणजे ६४ ते ६५ किलोपेक्षा अधिक वजन असणे उचित नाही) तर दुसरी गोष्ट म्हणजे, दरमहा एक ते तीन किलो याच प्रमाणात वजन कमी होणे योग्य आहे. झपाट्याने वजन कमी झाले तर ते घातक असते. केवळ डाएट करुन, केवळ औषधे घेवून अथवा केवळ भरपूर व्यायाम करुन लठ्ठपणा किंवा वजन कधीच कमी होणार नाही. योग्य आहार, योग्य आणि आवश्यक तेवढा व्यायाम, योग्य औषधांचे सुयोग्य नियोजन आणि पचनशक्ती वाढवून स्थूल तसेच सूक्ष्म पचनात आणलेली सूसूत्रता यामुळेच वजन कमी कऱण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत. डॉ. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर, जि. कोल्हापूर मो. 7744964550 ई मेल -asknaturopathy@gmail.com

Monday, 8 December 2014

प्रतिजैविकांचा होणारा अतिरिक्त वापर थांबविलाच पाहिजे.


प्रतिजैविके म्हणजे अण्टीबायोटिक्स औषधे. सध्या या औषधांचा उपयोग करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. माणसाच्या शरीरात शिरलेल्या आणि रोग उत्पन्न करणा-या जीवाणूंना आणि विषाणूंना मारण्यासाठी केलेली विशिष्ट प्रकारची औषध योजना म्हणजेच प्रतिजैविके होत. या प्रतिजैविकांच्या उपयोगाने शरीरात शिरलेले जीवाणू आणि विषाणू मारले जात असल्याने आजाराच्या लक्षणापासून आपणाला तात्काळ आराम मिळतो. सध्याच्या धावत्या जगात म्हणजेच ‘घे गोळी आणि पळ कामाला’च्या युगात तात्काळ आराम देण्याचा हा प्रतिजैविकांचा गुणधर्म म्हणजेच आपणाला साक्षात ईश्वराचे वरदान वाटत आहे. त्यामुळे आधुनिक उपचार पध्दतींच्या वैद्यांकडे, ‘मला एखादे अण्टीबायोटिक द्या’, अशी मागणी करणारे रुग्णही आता दिसू लागले आहेत. वास्तविक पाहता आपल्या शरीरात बाहेरुन येणा-या विषाणू आणि जीवाणूंशी लढणारी यंत्रणा असतेच. ही यंत्रणा नैसर्गिकपणे त्यांच्याशी लढत असते. शरीरातील या यंत्रणेने आपले काम सुरु केले की, त्याची काही लक्षणे शरीरावर उमटू लागतात. खरे तर शरीरातील ही यंत्रणा शरीर स्वच्छ करण्यासाठी धडपडत असल्याचे हे द्योतक आहे. पण, या लक्षणांना आजार मानण्याची कल्पना आपणाकडे आहे आणि याच आजारावर आपण औषध सुरु करीत असतो. वास्तविक पाहता शरीरातील अंतर्गत यंत्रणा जे शरीर शुध्दीचे काम करीत आहे, त्याला पूरक ठरेल अशी भूमिका आपण घ्यायला हवी. आपण तशी भूमिका घेऊन शरीराला या कामात मदत करण्याचा साधा विचारही आपण करीत नाही. उलट चटकन बरे होण्यासाठी आपण प्रतिजैविकांचा मारा शरीरावर करीत असतो. त्यामुळे शरीराच्या या कामात अडथळेच तयार होतात. प्रतिजैविकांच्या सेवनाने विषाणू आणि जीवाणू नष्ट होतातही पण, हे जीवाणू आणि विषाणू शरीरात वाढण्यासाठी पूरक ठरलेली शरीरातील घाण आणि व्यवस्था तशीच राहते. साहजिकच लक्षणे बरी झाल्याने आपणाला आजार बरा झाल्याचे समाधान मिळते. पण, आजाराला पोषक असणारी शरीराची व्यवस्था तशीच राहिल्याने कालांतराने आजार परत उदभवतो आणि हे समाधान क्षणिक ठरते. आपणाला माहिती झालेली असते की, अमूक प्रकारच्या लक्षणांमध्ये अमूक गोळ्या घेतल्या की, आपणाला तात्काळ आराम मागच्या वेळेस मिळाला होता. मग वैद्यकीय सल्ल्याची गरज आपणाला रहात नाही आणि औषधांच्या दुकानातून त्या गोळ्या आणून आपण परस्परच सेवन करीत जातो. अशा प्रकाराने साधी सर्दी झाली तरी कळत न कळत अशी प्रतिजैविके घेणारी अनेक माणसे आम्ही पाहिली आहेत. प्रतिजैविकांचा एक गुणधर्म असतो. एकदा त्याची सवय झाली की, ती घेतल्याशिवाय आजार बराच होत नाही. त्याही पुढे जाऊन त्याच्या मात्रेची (डोस) सवय होते आणि मग त्याचा परिणाम दिसावा यासाठी पुढे प्रत्येकवेळी त्याची मात्रा वाढवतच जावे लागते. अशी किरकोळ कारणाने प्रतिजैविके घेण्याची रुग्णांचीही हौस काही डॉक्टरांनी नेमकी हेरली आहे. ‘‘अमूक डॉक्टरकडे गेलो ... एक इंजेक्शन आणि दोनच गोळ्या घेतल्या...सकाळी उठून फिरायला लागलो, ’’ असं सांगत रुग्ण गावभर फिरुन जाहिराती करीत असल्याने असे डॉक्टरही आता कसलाच विचार न करता साध्यासुध्या आजारातही इंग्रजीत ज्याला ‘हाय्यर अण्टीबायोटिक्स’ म्हणतात, ती देत असतात. सध्या वैद्यकीय क्षेत्राचा उपयोग सेवा भावापेक्षा व्यवसाय म्हणून करण्याकडे कल वाढत आहे. पूर्वी वैद्यकीय व्यवसाय घराण्याची परंपरा होती. कसलाही खर्च न करता एका पिढीकडून दुस-या पिढीला हे ज्ञान हस्तांतरित करण्यात येत होते. साहजिकच शिकण्याचा खर्च नसल्याने त्यातला सेवाभावही वैद्यकीय शिक्षणाचे एक अविभाज्य अंग म्हणून शिकवला जात होता. आता घरात मिळणारे हे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात गेले. साहजिकच त्यातही व्यावसायिक दृष्टीकोनाची मंडळी शिरली आणि या क्षेत्राचाही व्यवसाय झाला. लाखो रुपये खर्च करुन पदवी घेतलेले हे डॉक्टरही मग या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणूनच पाहू लागले आणि रुग्ण म्हणजे गि-हाईक झाले. ते कायम आपल्याकडेच येत रहावे, यासाठी त्याला तात्काळ बरे वाटले पाहिजे म्हणून अशा प्रतिजैविकांचा वारेमाप वापर करण्याची पध्दत यातूनच वाढत चालली आहे. प्रतिजैविकांच्या या परिणामांसोबतच त्यांचे होणारे दुष्परिणामही खूप आहेत. विविध अवयवांवर होणारे त्याचे परिणाम भविष्यात माणसाला सोसावेच लागतात. म्हणूनच या सगळ्याचा गंभीरपणाने विचार केला तर प्रतिजैविकांचा अतिरिक्त आणि अनावश्यक वापर म्हणजे ‘रोग परवडला, पण औषधे नकोत,’ यातलाच प्रकार आहे. म्हणूनच प्रतिजैविकांचा होणारा अतिरिक्त वापर थांबविलाच पाहिजे.

Tuesday, 2 December 2014

शरीरासाठी पोषक घटकांचा खजिना - स्पिरुलिना


आर.टी.ओ. कार्यालयात काम करणारी एक व्यक्ती माझ्यासमोर रेल्वेत बसली होती. प्रवास सुरु असतानाच मला नांदेडमधून माझ्या एका पेशंटचा फोन आला. आमचे बोलणे समोर बसलेली ही व्यक्ती लक्षपूर्वक ऐकत होती. बोलणे संपल्यावर त्या व्यक्तीने स्वतःचा परिचय करुन दिला आणि मला विचारले, ‘‘ तुम्ही डॉक्टर आहात का ?’’ मी उत्तर दिले, नाही... मी निसर्गोपचार सल्लागार आहे.’’ माझ्या उत्तराने त्यांची जिज्ञासा जागी झाली आणि त्यांनी आपले शारीरिक त्रास मला सांगायला सुरुवात केली. त्यांचे सुमारे अर्धातास ऐकून घेतल्यावर माझ्या लक्षात आले की, त्यांना काहीही झालेले नाही. शरीराची दैनंदिन गरज भागविण्यासाठी आणि शरीराची होणारी झीज भरुन काढण्यासाठी जे घटक शरीरात दररोज गेले पाहिजेत ते त्यांना पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना सतत थकल्यासारखे वाटणे, उत्साह नसणे, वजन वाढणे, पोट साफ न होणे, साथीच्या रोगांची तात्काळ लागण होणे, जडत्व आल्यासारखे वाटणे, सारखे झोपून रहावे असे वाटणे, वारंवार पित्त होणे अशा अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कामावर आणि करिअरवर झाला आहे. त्यातच भरीस भर म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्राच्या तज्ज्ञांनी त्यांना करावयास लावलेल्या एक्स रे पासून एम.आर.आय. पर्यंतच्या अनेक तपासण्या आणि घ्यायला लावलेली औषधे याच्या खर्चामुळे ते पार वैतागून गेले होते. इतके करुनही त्यांना बरे वाटत नव्हतेच हा भाग वेगळाच! ! मी त्यांना स्पिरुलिनाच्या कॅप्सूल्स दिल्या. सकाळी आणि रात्री जेवणानंतर एक एक कॅप्सूल घेण्यास सांगितले. माझा मोबाईल नंबर दिला आणि सांगितले कॅप्सूल्स घ्यायला लागल्यापासून पंधरा दिवसांनी मला फोन करा आणि तुमची प्रगती सांगा. सोळाव्या दिवशी रात्री साडे दहा वाजता त्यांचा फोन आला. खूप उत्साहात ते बोलत होते. ‘‘ आनंदराव, चमत्कार झालाय ! ! आज मी माझ्या गावापासून शंभर किलोमीटरवर असलेल्या गावात आर.टी.ओ. कॅम्पला गेलो होतो. दिवसभरात दोनशे गाड्या पासिंग केल्यात. आत्ता परत आलोय पण, अजून फ्रेश आहे. अजिबात थकवा वाटत नाही. बाकीचे सगळे त्रासही कमी झालेत. तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही साहेब ! ! तुम्ही आता आमचे फॅमिली मेंबर आहात, कधीही आमच्या गावी, घरी हक्काने या ! !’’ मी धन्यवाद म्हणून फोन बंद केला आणि मला खूप समाधान वाटले. काय आहे स्पिरुलिना ? स्पिरुलिना ही निळ्या हिरव्या रंगाची आणि अनेक शाखा असणारी फोटोसिंथेटिक पाणवनस्पती आहे. प्रामुख्याने ही वनस्पती समुद्रात आढळते. शेवाळ्यासारखी असणारी ही वनस्पती तिच्या नागमोडी आकारामुळे ‘स्पिरुलिना’ या नावाने ओळखली जाते. मेक्सिको आणि मध्य आफ्रिकेतील लोक ही वनस्पती अगदी नैसर्गिक स्वरुपातही खातात. शास्त्रज्ञांना स्पिरुलिनातील पोषक तत्वांचा शोध सन १९६० मध्ये लागला. त्यानंतर स्पिरुलिना पृथ्वीवरील सर्वात शक्तीवर्धक प्रोबायोटिक पूरक अन्न म्हणून जगभरात वापरण्यात येवू लागले. आज जगभरातून लाखो लोक याचा पूरक अन्न म्हणून बिनधास्तपणे वापर करत असतात. इतकेच नव्हे तर सन १९७४ मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने सर्वात चांगले शक्तीवर्धक पूरक अन्न म्हणून स्पिरुलिनाचे समर्थन केले आहे. सन १९८१ मध्ये फूड ऍण्ड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशननेही स्पिरुलिनाचा गौरव केला आहे. सन १९८३ मध्ये पश्चिम जर्मनीच्या इंटरनॅशनल फूड एक्स्पोजर या संस्थेनेही स्पिरुलिनाचे समर्थन केले आहे. स्पिरुलिनातून काय मिळते ? उत्तम जीवन, शक्तीशाली आणि सुदृढ शरीर यासाठी स्पिरुलिना हा आदर्श पूरक आहार आहे हे त्यातून मिळणारे घटक पाहिले की लगेच लक्षात येईल. रोज सकाळी एक आणि रात्री एक याप्रमाणे सलग सहा दिवस स्पिरुलिनाच्या बारा कॅप्सूल्स पोटात गेल्या (साधारण ६००० मिलीग्रॅम) तर शरीराला खालीलप्रमाणे पोषक घटक मिळतात. १) बीटाकॅरेटिन ः ५६ ग्लास गाईचे दूध प्याल्यावर अथवा ५५० सफरचंद खाल्ल्यावर जितके बीटाकॅरेटिन मिळेल तितके आणि गाजरापेक्षा २५ पट अधिक २) व्हिटॅमिन बी १ ः हिरव्या मिरच्या २० खाल्ल्यावर जितके मिळेल इतके ३) व्हिटॅमिन बी २ ः ४२० द्राक्षे अथवा ४७ स्ट्रॉबेरीज खाल्ल्यावर जितके मिळेल इतके. ४) व्हिटॅमिन बी ३ ः आठ लिंबू खाल्ल्यावर जितके मिळते तितके ५) व्हिटॅमिन बी ६ ः ९० ग्रॅम ब्रेडपासून जितके मिळते तितके ६) व्हिटॅमिन बी १२ ः २४० ग्रॅम पनीर पासून जितके मिळते तेवढे ७) व्हिटॅमिन ई ः चिकनचे सहा तुकडे खाल्ल्यावर जितके मिळेल तितके. पालेभाज्यांपेक्षा ३ टक्के अधिक ७) प्रोटिन्स ः पालेभाज्यांपेक्षा ६० टक्के अधिक, दुधापेक्षा १४ टक्के अधिक, अंड्यापेक्षा ६ टक्के अधिक तर कडधान्यापेक्षा ३ टक्के अधिक ८) जैविक लोह घटक ः पालेभाज्यांपेक्षा पाच ते आठ पट अधिक ९) क्लोरोफिल ः अल्फा अल्फापेक्षा ५ ते ३० पट अधिक याशिवाय स्पिरुलिनामध्ये २९ टक्के फॅटी ऍसिड असते. त्यामुळे शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल हटवले जाते, चरबी वितळवून शरीराबाहेर टाकली जाते आणि हृदयाचे रक्षण होते. स्पिरुलिना कोणत्या आजारात फायदेशीर आहे ? विविध शरीरोपयोगी घटकांनी परिपूर्ण असणारे हे स्पिरुलिना शरीरातील पौष्टिक घटकांची कमतरता भरुन काढते. शरीराची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविते. फुफ्फुसांना अधिकप्रमाणात प्राणवायू मिळावा यासाठी काम करते. पेशींना बळकट बनविते. शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताभिसरण वाढवते. सर्वसाधारण आजार आणि जुने आजार यावर काम करते. ऍनेमिया, हृदयाशी संबंधीत आजार, अकाली येणारे वृध्दत्व, लठ्ठपणा, अल्सर, मानसिक ताण, पचनसंस्थेचे विविध आजार, दीर्घकाळापासूनचा संधीवात, डोळ्याच्या आणि केसांच्या समस्या, स्मृतीभ्रंश अशा आजारात तर स्पिरुलिना खूपच छान फायदा देते. त्याचबरोबर कॅन्सर आणि एचआयव्ही सारख्या पेशींशी संबंधित आजारातही स्पिरुलिना प्रभावीपणे काम करते. स्पिरुलिना शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढते आणि विषारी पदार्थांच्या आघातापासून मूत्रपिंडाचे (किडनी) रक्षण करते. उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि वाढत्या वयासोबत येणारे आजार यासाठी तर स्पिरुलिना संजीवनीच म्हणावी लागेल. स्पिरुलिना हे समृध्द शक्ती, कमी कॅलरीज आणि सहज पचणारे पूरक अन्न आहे. म्हणूनतर ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने त्याचा वापर आणि गौरव केला आहे. गेल्या साडेतीन लक्ष वर्षांपासून लहरी निसर्ग, सततचे प्रदूषण अशा नेक उलथा पालथींशी टक्कर देत स्पिरुलिना आपले नैसर्गिक गुणधर्म जसेच्या तसे टिकवून आहे, हा निसर्गाचा अजब चमत्कारच म्हणावा लागेल. स्पिरुलिना स्वस्त आणि सामान्य माणसाला परवडेल असे आहे. म्हणजे दिवसाचा खर्च दहा रुपये आहे. आपला रोजचा चहाचा खर्च यापेक्षा नक्कीच जादा असतो आणि त्याचा शरीराला फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होतो. त्याही पुढे जाऊन विचार करायचा तर निरोगी राहण्यासाठी रोजचा दहा रुपये खर्च हा आजारी पडल्यावर होणार्या दवाखान्याच्या खर्चापेक्षा नक्कीच कमी आहे, नाही का ? स्पिरुलिना आजारी असलेल्यांनी तर घ्यावेच पण ज्यांना कसलाही आजार नाही अशा निरोगींनीही कायमपणे रोगमुक्त राहण्यासाठी अवश्य घ्यावे. याबाबत अधिक माहिती अथवा अतिशय उत्तम प्रतिच्या स्पिरुलिना कॅप्सूल्स हव्या असतील तर माझ्याशी जरुर संपर्क साधावा. मी उपलब्ध करुन देईन. डॉ. आनंद कुलकर्णी , निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर (जि. कोल्हापूर), मोबाईल - ७७४४९६४५५०

Sunday, 30 November 2014

मधुमेह, रक्तदाब विकारावर प्रभावी दशसूत्री


गेल्या महिन्यातील गोष्ट आहे. मराठवाड्यातून एक रुग्ण माझ्याकडे आला. त्याला डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर असे दोन्ही आजार होते. त्याचे वजनही भरपूर होते. रक्तातील साखर २२० च्या खाली येतच नाही, अशी त्याची तक्रार होती. बाजारात मिळणारी अनेक औषधे आणि विविध नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांच्या कसल्याकसल्या पावडरी खाऊनही त्याचे वजन शंभर ग्रॅमही कमी झाले नव्हते. अनेक डॉक्टर झाले, विविध औषधांवर हजारो रुपये खर्च केले, दरमहा तीन हजाराच्या मधुमेहाच्या गोळ्या घेतो पण काहीच फरक नाही, अशा तक्रारी तो सांगत होता. त्याला सुमारे अर्धातास प्रश्न विचारुन त्याचा इतिहास समजून घेतल्यावर काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. मी त्याला माझ्याकडील निसर्गोपचाराची दशसूत्री दिली. महिनाभर त्याला निष्ठेने करायला सांगितले. परवाच त्याचा फोन आला होता. रक्तातील साखर जेवणानंतर १८० आणि उपाशी पोटी १०० आहे. वजनही एक किलो कमी झाले आहे. ब्लडप्रेशरही नॉर्मल आहे, असे तो म्हणाला. खूप उत्साहात होता. काय आहे ही दशसूत्री ? १) १०० ग्रॅम हिरडा चूर्ण, २०० ग्रॅम बेहडा चूर्ण आणि ३०० ग्रॅम आवळा चूर्ण आणावे. घरामध्ये ते चांगले एकत्र करावे आणि काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री एक चमचा हे चूर्ण आणि ज्या चमच्याने हे चूर्ण घेतले त्याच चमच्याने अर्धा चमचा मेथी घ्यावी. हा चमचा कायमस्वरुपी यासाठीच वापरावा. हे दोन्ही एक ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजत घालावे. सकाळी उठल्यावर ब्रश झाला की हे पाणी प्यावे आणि खाली राहिलेली मेथी चावून चावून खावी. यानंतर अर्धा तास काही खाऊ नये. २) या अर्ध्या तासात चालण्याचा व्यायाम करावा. व्यायाम आपल्या शरीराला सोसेल इतकाच असावा. याबाबत कुणाचे ऐकून काही करु नये. त्यामुळे चालताना नेहमीच्या गतीनेच चालावे तसेच काखेत आणि डोक्यात घाम आला की चालणे थांबवावे, हे सूत्र लक्षात ठेवावे. ३) सकाळी आणि रात्री जेवणानंतर मोड आणलेल्या जवसाची पावडर ३ ग्रॅम आणि शेवग्याच्या पानांची पावडर ३ ग्रॅम पाण्यासोबत घ्यावी. आता याच्या कॅप्सूल्सही मिळतात. कॅप्सूल्स घेणार असाल तर दोन्हीची एक एक कॅप्सूल सकाळी आणि रात्रीच्या जेवणानंतर घ्यावी. तसेच स्पिरुलिनाची एक कॅप्सूल सकाळी आणि एक रात्री जेवणानंतर घ्यावी. ४) सकाळचे जेवण १० च्या आधी आणि रात्रीचे जेवण ८ च्या आधी घ्यावे. दोन जेवणाच्यामधे दुपारी भूक लागली तर हलकासा नाष्टा अथवा सफरचंद खावे. रात्रीच्या जेवणानंतर सुमारे एक तासाने झोपावे. ५) तुमचे वजन भागिले दहा वजा दोन या फॉर्म्युलॅने गणित करावे आणि जितके उत्तर येते तितके लिटर पाणी दिवसभरात प्यावे. याबाबत उलटसुलट मतप्रवाह ऐकवून गोंधळ केला जातो. पण हा योग्य फॉर्म्युला आहे. पाणी खाली बसूनच प्यावे. घोट घोट प्यावे. जेवणाच्या आधी एक तास आणि जेवताना तसेच जेवणानंतर दीड तास पाणी पिऊ नये. पाणी शक्यतर कोमट प्यावे अथवा रुम टेम्परेचरचे प्यावे. फ्रिजमधले पिऊ नये. थंड पाणीच प्यायचे असेल तर मातीच्या मडक्यातील प्यावे. ६) बटाटा, बीट, रताळे, गाजर, साबूदाणा, मका, ज्वारी, मसालेदार पदार्थ, मांसाहार, गोड पदार्थ, चहा कॉफी, साखर, आंबा, चिक्कू अशी गोड फळे, कडधान्ये, तूरडाळ, आंबाडी, दोडका, बेकरीचे पदार्थ, मिठाई, मैद्याचे पदार्थ पूर्णपणे बंद करावेत. ७) गहू, पालेभाज्या, फळभाज्या, जांभूळ, कारले, कोंडायुक्त पदार्थ यांचा आहारात वापर करावा. रोजच्या जेवणात सकाळी आणि संध्याकाळी एक वाटी भात खाल्ला तरी चालेल. ताजे ताक एक वाटी जेवणानंतर प्यावे. जेवणात दही घ्यावे. गव्हाचे पदार्थ (पोळी अथवा चपातीसारखे) खाताना त्यावर एक छोटा चमचा तूप घ्यावे. साखरेऐवजी थोड्या प्रमाणात गुळ वापर तर चालतो. ८) जेवणासाठी खाली मांडी घालून बसावे. जेवताना टीव्ही बंद ठेवावा. मोबाईलवर बोलत जेवू नये. जेवताना लक्ष पूर्णपणे जेवणाकडे असावे. सकाळचे जेवण पोटभर घ्यावे पण रात्री कमीच जेवावे. जड पदार्थ रात्री खाऊ नयेत. हलका आहार घ्यावा. ९) शौचाला साफ होत नसल्याची तक्रार असेल तर पंधरा दिवसातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा तूप टाकून ढवळून प्यावे. १०) हे उपचार सुरु केल्यावरही सध्या सुरु असलेली डॉक्टरांची औषधे बंद करु नयेत. दर महिन्याला रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे तसेच रक्तदाबही तपासावा. त्याचे रीपोर्टस डॉक्टरांना दाखवावेत. त्यानुसार डॉक्टरांच्या औषधांचे प्रमाण कमी कऱणे अथवा ती बंद करणे बाबत ते सल्ला देतील तसेच करावे. या दशसूत्रीचा उपयोग केल्यास मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. त्यासाठी घ्यावी लागणारी आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधे कमी होतात आणि त्यांच्या साईड इफेक्टसपासून बचाव होतो. जवस, शेवगा या फूड सप्लिमेंटचा मधुमेह आणि रक्तदाबाशिवाय कॅन्सर, रक्तवाहिन्यांचे विकार, हृदयरोग, अस्थमा, संधीवात, थायरॉईड, सूज, किडनीचे आजार, बध्दकोष्ठता, पोटाचे विकार, लैंगिक क्षमता, लठ्ठपणा अशा विविध आजारातही खूपच चांगला फायदा होतो. फक्त हे आजार क्रॉनिक असल्याने या आजारात निसर्गोपचार सल्लागारांच्या सल्ल्यानेच याचा उपयोग करणे योग्य ठरेल. उत्तम प्रतिची जवसाची कॅप्सूल, शेवग्याच्या पानांच्या पावडरची कॅप्सूल आणि स्पिरुलिना कॅप्सूल मी उपलब्ध करुन देत असतो. ज्यांना याबाबत अधिक माहिती हवी असेल त्यांनी माझ्याशी फोनवर अथवा ई मेलवर जरुर संपर्क साधावा. डॉ. आनंद कुलकर्णी, निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर मोबाईल - ७७४४९६४५५० ई मेल - asknaturopathy@gmail.com

वरुन साधा पण गंभीर आजार - असिडिटी


सलग चार दिवस कोल्हापुरातून एका रुग्णाचा मला सतत फोन येत होता. 'मला प्रचंड पित्ताचा त्रास होत आहे, अनेक उपाय केले पण काही फायदा नाही. निसर्गोपचारात यासाठी काही औषध आहे का ?' त्यांचा प्रश्न साहजिकच होता. नैसर्गिक होता. आजारी पडले की औषध घ्यायचे असा पायंडाच पडला आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रश्न आला. आजार हे आपल्या कर्तृत्वाचे फळ असते आणि तो औषधांशिवाय बरा होऊ शकतो, हे त्यांच्या कल्पनेतही न बसणारे होते. म्हणूनच ते औषधाच्या मागे धावत होते. मी ही त्यांना औषधच देणार अशी त्यांची ठाम समजूत होती. प्रत्यक्षात जेव्हा मी त्यांना सांगितले की, मी कसलेही औषध देत नाही, तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. औषध न घेता मी बरा कसा होणार? असा एक प्रश्न त्यांच्या चेहर्यावर मला जाणवला. आजार हे जर आपल्या कर्तृत्वाचे फळ असेल तर कर्तृत्व सुधारल्यावर आपण ठणठणीत व्हायला हवे, हे मला त्यांना पटवून सांगावे लागले. प्रत्येक माणसाच्या शरीरात एक नैसर्गिक शक्ती असते ती त्याला बरे करीत असते, या शक्तीला तिचे रोग निवारणाचे काम करण्यास जो वेळ लागतो तो सुसहाय्य करण्यासाठी औषधे असतात हा निसर्गोपचाराचा सिध्दांत आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागले. त्यानंतर त्यांनी माझे ऐकण्याचे मान्य केले. पित्त, त्याचे त्रास आणि त्यावरचे उपाय या सगळ्यांचा विचार करण्यापूर्वी आपणाला पित्त म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्याचे पचन होऊन त्यातील उपयुक्त भाग बाजूला करण्याचे, त्याचे रक्तात शोषण करण्याचे आणि उरलेला चोथा शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पोटात होत असते. या सगळ्या प्रक्रियेत पोटातील विविध अवयव आपापली भूमिका पार पाडत असतात. पचनासाठी आवश्यक असणार्या हायड्रोक्लोरिक आम्लाची निर्मिती पोटात होत असते. भुकेच्या वेळी अनेकांच्या पोटात जो आगडोंब उसळतो तो याच आम्लामुळे. अनैसर्गिक जीवन जगण्याच्या सततच्या प्रकारामुळे या आम्लाची अधिकप्रमाणात निर्मिती होते आणि त्यातूनच ऍसिडिटीची लक्षणे दिसू लागतात. आयुर्वेदाच्या तत्वज्ञानानुसार पचन करणार्या स्त्रावांमध्ये पाचक पित्त असते. ते जेव्हा द्रव आणि सरगुणांनी वाढते तेव्हा आम्लपित्त होते. शरीरातील रक्ताची आम्लता ज्यात मोजली जाते त्याला पीएच असे म्हणतात. हा पीएच सात असेल तर रक्त नॉर्मल असते. पण, पीएच सात पेक्षा कमी होणे म्हणजे रक्तात आम्लतेचे प्रमाण वाढणे होय. शरीर नेहमी निरोगी रहायचे असेल तर रक्त नेहमी अल्कलीप्रधान असणे आवश्यक आहे. शरीरात आम्लता वाढली की त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीरातील अनेक उपयुक्त क्षारांचा उपयोग केला जातो. त्यामुळे क्षारांचा शरीरातील साठा कमी होतो आणि त्यातून चिडखोरपणा वाढणे, स्मरणशक्ती कमी होणे, सर्दी, झोप न लागणे, सांधेदुखी, रक्तदाबाचे विकार, एकाग्रता कमी होणे असे विकार मागे लागतात. त्याशिवाय अकाली वृध्दत्वही येते. ऍण्टासीडच्या काही गोळ्या चघळल्या की तात्पुरता आराम मिळतो. पण, अधिक पित्त तयार होण्याची प्रक्रिया थांबत नाही. यातून पुढे अल्सरसारखे आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पित्ताचा विकार हा साधासुधा आजार नाही तर रुग्णाचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरावर शोषण करणारा आजार असल्याने तो गांभीर्यानेच घ्यायला हवा. मरण ही दीर्घकालीन रक्ताम्लतेची अंतिम स्थितीच असते. त्यामुळे असिडिटी ही साधी शिक्षा नाही तर ती जन्मठेपच आहे, असे म्हणावे लागेल. खरे तर पित्ताचा त्रास सुरु झाल्यानंतर कोणती औषधे घेऊन तो कमी करायचा याचे चिंतन करण्यापेक्षा त्रास सुरु का झाला? हे शोधणे गरजेचे आहे. औषधाने त्रास कमी होईल पण, मूळ कारण तसेच राहिल्याने आजार बरा होणार नाही. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचे झाले तर, 'लक्षणे कमी होतील पण, व्याधी तशीच राहिल'. जोपर्यंत व्याधी शरीरात आहे तोपर्यंत औषधांनी लक्षणे कितीदाही कमी केलीत तरी ती पुन्हा पुन्हा उद्भवत राहतील. त्यामुळे ऍण्टासीडच्या गोळ्या हा यावरचा उपाय नाही, ती तात्पुरती मलमपट्टी आहे. त्या घेत दिवस ढकलण्यापेक्षा पित्ताचा त्रास होण्याची कारणे शोधून ती दूर करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे ढोबळमानाने विचार केला तर पित्ताचा (असिडिटी) त्रास सुरु झाल्यानंतर खालील लक्षणे जाणवतात. १) मळमळणे आणि उलट्या होणे. उलटी होताना तोंडात आंबट-कडवट चव असते. २) तोंडात पाणी सुटणे, आंबट गुळण्या येणे ३) डोके दुखणे, चक्कर येणे. ४) पोटात दुखणे, छातीत जळजळल्या सारखे होणे. ५) अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे. अंगाला खाज सुटणे. ६) निरुत्साही वाटणे. ७) यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर पुढे केस गळणे, अकाली पांढरे होणे यासह यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात. पित्ताचा त्रास होण्याची कारणे- १) मद्यपान, धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे व्यसन. २) व्यायामाचा अभाव ३) रात्री उशीरापर्यंत जागण्याची आणि सकाळी उशीरा उठण्याची सवय ४) चहा आणि कॉफीसारख्या पेयांचा अतिरेक ५) मसालेदार, अति तिखट, तेलकट, चमचमीत खाण्याची आवड. विशेषत्वाने फास्ट फूड, भेळ, आंबवलेले पदार्थ, वडापाव, हॉटेलमधील पदार्थ यांचे नियमित सेवन, ६) मांसाहाराचे अधिकप्रमाणात सेवन ७) योग्य प्रमाणात पाणी पिण्याची टाळाटाळ ८) सकाळी शौचाला जाण्याचा कंटाळा करणे, बध्दकोष्ठता म्हणजे शौचाला साफ न होणे. ९) अलोपॅथिच्या औषधांचे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर सेवन करणे. विशेषत्वाने वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा सतत आणि प्रमाणाबाहेर उपयोग करणे. १०) खाण्याच्या आणि जेवणाच्या वेळेतील अनियमितता आणि अस्ताव्यस्तता किंवा भूक नसताना खाण्याची सवय. ११) असमतोल आहार १२) सततची धावपळ, ताणतणावयुक्त जीवनपध्दती. या बारा कारणांचा विचार केला तर हे नक्की लक्षात येईल की, पित्ताच्या त्रासाचे मूळ आपल्या जीवनपध्दतीत म्हणजेच लाईफ स्टाईलमध्ये आहे. साहजिकच या त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर आपणाला आपली जीवनपध्दती बदलावी लागणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जगणार्या कुणालाही हा मान्य नसणारा विचार आहे. कारण, या सगळ्या जीवनपध्दतीतून मी एकटाच बाहेर पडलो तर मला पैसा कसा मिळणार आणि माझे घर कसे चालणार ? मी सुखी, समृध्द कसा होणार ? असे प्रश्न निर्माण होतात. या स्वयंनिर्मित भ्रमाला कवटाळून आपण स्वतःला या जीवनपध्दतीत सतत ढकलत राहतो. याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि नको त्या व्याधी लहान वयात मागे लागतात. मग डॉक्टरांचे उंबरठे झिजवत मिळवलेल्या पैशाचा उपयोग औषधांच्या खरेदीसाठी आणि दवाखान्यांची बिले भरण्यासाठी करावा लागतो. त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्याशिवाय कुटूंबाचे स्वास्थ्य बिघडते हे वेगळेच ! पण, एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, जर आपण पैसा आपल्या सुखासाठी मिळवत असू तर त्या सुखाचा बळी देऊन मिळणार्या पैशाला काय अर्थ आहे? म्हणजेच पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवायचे आणि नंतर पुन्हा आरोग्य मिळवण्यासाठी मिळवलेला पैसा पाण्यासारखा खर्च करायचा, असा हा शुध्द वेडेपणाच नाही का ? आणि करोडो रुपये खर्चुन जरी नंतर आपणाला आरोग्य मिळाले तरी ते निसर्गाने सुरुवातीला दिलेल्या आरोग्याइतके शुध्द थोडेच असणार आहे? याचा अर्थ पैसे मिळवणे वाईट आहे किंवा ते मिळवूच नयेत असा अजिबात नाही. जगण्यासाठी आजकाल पैसा ही गरज आहे. पण, सर्वस्व नाही. आपण काय मिळवण्यासाठी कशाचा बळी देतोय हे पाहणे आवश्यक आहे. पैशासाठी आरोग्याचा बळी द्यावा लागत असेल तर ते सर्वस्वी चुकीचेच नव्हे तर घातक आहे, असे माझे मत आहे. त्यामुळे पित्ताच्या त्रासाची तक्रार करणार्या सगळ्यांनीच पुढचे गंभीर परिणाम टाळायचे असतील तर पैशापेक्षा आरोग्याला महत्त्व देऊन आपली जीवनशैली बदलण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. त्यामुळेच निसर्गोपचाराने दिलेली जीवनशैली या आजारात प्रभावीपणे काम करताना दिसते. कारण त्यात अजिबात औषध नाही. आपल्या जीवनशैलीतील बदल आणि निसर्गातील काही घटकांचा वापर करुन या व्याधीवर उपचार केले जात असल्याने हा आजार मुळातूनच उखडण्याची क्षमता त्यात आहे. पित्ताच्या त्रासाने त्रस्त असणार्यांनी खालीलप्रमाणे उपाय केल्यास त्यांना लाभ होऊ शकतो - १) सगळ्यात प्रथम 'लवकर निजे लवकर उठे' हे सूत्र लक्षात घेऊन रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी किमान तासभर आधी उठण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. हे करत असताना किमान सहा तासांची झोप मिळेल असे नियोजन करणे आवश्यक आहे. २) त्यापाठोपाठ मद्यपान, धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, व्यसने या सगळ्यांपासून कटाक्षाने दूर रहावे. ३) चहा आणि कॉफी यासारख्या पेयांवर नियंत्रण ठेवावे. आजच्या जगात त्यापासून दूर राहणेे थोडेसे अडचणींचे असले तरी त्यावर नियंत्रण जरुर ठेवावे. ४) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. शक्यतो घरचेच पदार्थ खावेत. बाहेर जेवणे टाळावेच. भूक नसताना आहार घेऊ नये. तेलकट, मसालेदार पदार्थ प्रमाणातच घ्यावेत. जेवल्यावर चहा, कॉफी किंवा आईस्क्रिम खाऊ नये. अन्न खूप चावून खावे. मानसिक ताण असताना जेवण टाळावे. जेवताना पाणी पिऊ नये. रात्रीचे जेवण ८ पूर्वी घ्यावे. ५) विरुध्द अन्नाचा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा, फास्ट फूडचा, बेकरीच्या पदार्थांचा, हवाबंद डब्यातील पदार्थांचा, कोल्डींक्सचा त्याग करावा. ६) पाश्चराईज्ड दुधापेक्षा ताजे दूध घ्यावे. ७) आहारात क्षारांत पदार्थांचा वापर वाढवावा. 1) पहाटे - एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यात एक चमचा मध टाकावा आणि हे पाणी प्यावे. त्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने एक चमचा (तीन ग्रॅम) गव्हांकूराचे चूर्ण एक ग्लास साध्या पाण्यासोबत घ्यावे. यानंतर साधारण एक तास काही खावू नये. 2) सकाळी 8 वाजता - २ केळी, १ गालास संत्र्याचा रस, १ फुलका आणि घरचे लोणी अगर एक खाकरा, चार ते पाच खजूराच्या बिया आणि सुंठ टाकून केलेला एक कप चहा घ्यावा. 3) दुपारच्या जेवणात - जेवणापूर्वी एक कप कोकम सरबत आणि थोडेसे गूळ - आले घ्यावे. जेवणात कोंडायुक्त कणकेचे फुलके, एक पालेभाजी, एक फळभाजी, कोशिंबीर, कवठाची चटणी, मुगाचे वरण अगर मोड आलेल्या मुगाची भाजी, हातसडीचा भात, जेवणाच्या शेवटी एक कप गोड ताक आणि जेवणानंतर थोडीशी आवळा सुपारी 4) दुपारी 4 वाजता - एक सफरचंद, तीन ते चार बदामबिया, दोन ते चार अंजीरे आणि अर्धाकप आल्याचा चहा घ्यावा. 5) रात्रीचे जेवण - हे दुपार प्रमाणेच असावे. बदल हवा असेल तर हिरव्या भाज्यांचे सूप, ग्रीन सॅलेड, दूध पोळी आणि थोडी मुगाची खिचडी घ्यावी. 6) रात्री झोपताना - एक ग्लास थंड दूध घ्यावे. या प्रमाणे आहार योजना केली तर पित्ताच्या विकारावर आपण विजय मिळवू शकतो. याप्रमाणे ज्यांना आपला दिनक्रम पाळणे शक्य नसेल त्यांनी सकाळी आणि रात्री जेवणानंतर स्पिरुलिना ची प्रत्येकी एक कॅप्सूल घ्यावी. तसेच रात्री झोपताना गव्हांकूर पावडरच्या दोन कॅप्सूल्स घ्याव्यात. यामुळे पित्ताच्या शमनाचे आणि पित्त विकारांच्या नाशाचे काम जलद गतीने होते. रुग्णाला आराम मिळतो आणि पित्तामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळता येतात. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर, जि. कोल्हापूर मोबाईल - 7744964550 ई मेल - asknaturopathy@gmail.com

कॅन्सरसह विविध क्रॉनिक आजारांवर प्रभावी - डॉ. बुडविग उपचार पध्दती


कॅन्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह आणि लठ्ठपणा हे आजार सध्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. या आजारांनी ग्रासणा-या रुग्णांची सतत वाढणारी संख्या नक्कीच चिंताजनक आहे. कष्टाचा अभाव, सुखासीन जीवनशैली, व्यायामाकडे दुर्लक्ष, अन्न पिकवण्याची, शिजवण्याची आणि खाण्याची रासायनिक पदार्थांचा अतिरेक असणारी चुकीची पध्दत, प्रगतीच्या अवास्तव कल्पनांमागे धावणाच्या नादात गमावलेले मनस्वास्थ आणि आलेले ताणतणाव अशी यामागची काही ठळक कारणे देता येतील. हवा आणि पाण्याचे होणारे प्रचंड प्रदूषण आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर हेही यामागचे कारण आहे. पण, आता आपण इतके पुढे गेलो आहोत की, या सगळ्यातून मागे येणे आणि पुन्हा निसर्गाशी समरस असणारी जीवनशैली स्विकारणे आपणाला शक्य होईल असे वाटत नाही. शक्य असले तरी पचेल आणि पटेल असेही नाही. अशा परिस्थितीत आजार होवूच नये यासाठी काळजी घेणे आणि झालाच तर त्यावर अधिकाधिक नैसर्गिक उपचार करणे इतकेच आपल्या हातात आहे. आधुनिक वैद्यकाने (अलोपॅथी) अनेक आजारांवर प्रभावी औषधे जरुर दिली पण, त्याचे साईड इफेक्टस इतके आहेत की अनेकदा एका आजारातून बरा झालेला रोगी दुस-या आजाराचा शिकार कधी झाला हे कळत नाही. त्यातून वर उल्लेख केलेल्या आजारातील एखादा आजार झाला तर माणसाचे शारीरिक आरोग्य जितके धोक्यात येते त्यापेक्षा अधिक पटीने त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. कुटूंबाचे स्वास्थ बिघडते. अशा स्थितीत या आजारातून रिलिफ देण्याचे काम काही फूड सप्लिमेंटस करतात. अलोपॅथीच्या औषधांना त्यांचे काम करण्यासाठी मदत करतात. फूड सप्लिमेंटस मधील ही ताकद डॉ. बुडविग या शास्त्रज्ञ महिलेने ओळखली आणि त्यावर संशोधन करुन त्यांनी कॅन्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह आणि लठ्ठपणा यांच्यावर प्रभावीपणे काम करणा-या फूड सप्लिमेंटसवर आधारित एक उपचार पध्दती विकसित केली. डॉ. बुडविग प्रोटोकॉल या नावाने ही उपचार पध्दती युरोपियन देशात कॅन्सरसह विविध आजारांवर उपचार म्हणून आणि या आजारापासून संरक्षण होण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वापरण्यात येते. डॉ. बुडविग यांच्या विषयी थोडेसे..... डॉ. जोहाना बुडविग या जर्मनीतील आघाडीच्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सात वेळेस नॉमिनेट करण्यात आले होते. जर्मन फार्माकोलॉजिस्ट, केमिस्ट आणि फिजिसिस्ट यात त्यांनी डॉक्टरेट केली आहे. फेडरल इन्स्टिट्यूट फॉर फॅटस रीसर्च या संस्थेत त्या मुख्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करतात. फॅटस आणि ऑईल्समधील जगातील आघाडीच्या तज्ज्ञ म्हणून त्यांच्या नावाला मान्यता आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी पेशीजन्य ऑक्सिजनेशन आणि पेशींमधील ऑक्सिजन वाढविणारा शास्त्रिय पण नैसर्गिक फॉर्म्युला विकसित केला आहे. त्यासाठी त्यांनी खूप रुग्णांवर विविध प्रयोग केले आहेत. एका कॅन्सरचे उदाहरण घेतले तर या आजारातील विविधप्रकारच्या एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करुन त्यांनी आपली निरिक्षणे नोंदवली आहेत. या सगळ्या अभ्यासातून त्यांनी कॅन्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह ,लठ्ठपणा , जठराचा अल्सर, संधीवात, त्वचारोग अशा अनेक आजारांवर उपयोगी ठरणारे फूड सप्लिमेंटसचे फॉर्म्युले तयार केले आहेत. कसलेही साईड इफेक्ट नसणारी आणि अत्यंत प्रभावीपणे काम करणारी ही उपचार पध्दती अशा क्रॉनिक आजारांशी झुंजणा-यांना वरदानच म्हणावी लागेल. काही आजार आणि या उपचार पध्दतींची वैशिष्ट्ये 1. कॅन्सर - सगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी आणि सगळ्या अवस्थेतील कॅन्सरसाठी ही उपचार पध्दती उपयुक्त असल्याचे डॉ. बुडविग यांचे निरिक्षण आहे. यामध्ये त्यांनी दोन फूड सप्लिमेंटस एकत्रितपणे विशिष्ट प्रमाणात देण्यास सांगितले आहे. हे उपचार सुरु केल्यानंतर साधारण पंचवीस दिवसांनी हिमोग्लोबिन, पांढ-या पेशी आणि चपट्या पेशी (प्लेटलेटस) वाढलेल्या दिसतील. रुग्णाची एनर्जी लेव्हल वाढलेली दिसेल. रुग्णाचे वजन कमी होत असेल तर त्याचे प्रमाण कमी झालेले दिसेल. कॅन्सरच्या गाठींची वाढ होण्याचा वेगही कमी झालेला दिसेल. रुग्णामध्ये असा बदल पंचवीस दिवसांनी आढळला की ही उपचार पध्दती किमान दीड वर्षे सुरु ठेवावी, असे त्यांनी सांगितले आहे. 2. मधुमेह ( डायबेटीस ) - ज्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) 250 - 300 अथवा त्यापेक्षा अधिक आहे अशांसाठी ही उपचारपध्दती वरदान आहे. यामध्ये त्यांनी चार फूड सप्लिमेंटस एकत्रितपणे विशिष्ट प्रमाणात देण्यास सांगितले आहे. ही फूड सप्लिमेंटस सुरु केल्यानंतर साधारण एक महिन्याभरात रक्तातील साखर नॉर्मल लेव्हलला येते असे त्यांनी नमूद केले आहे. हा बदल दिसला की हे उपचार किमान दीड वर्षे सुरु ठेवावेत असे त्यांनी म्हटले आहे. 3. हाय ब्लड प्रेशर, नर्व्हस सिस्टिमचे आजार, हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांचे आजार - या सगळ्यांसाठी त्यांनी तीन फूड सप्लिमेंटस एकत्रितपणे आणि विशिष्ट प्रमाणात देण्यास सांगितले आहे. ही फूड सप्लिमेंटस सुरु केल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागते. अशी सुधारणा दिसली की, किमान दोन वर्षे हे उपचार सुरु ठेवावेत असे त्यांनी सुचविले आहे. 4. लठ्ठपणा - ही सगळ्यात मोठी समस्या आहे. अनेक आजारांची जननी असणारी ही समस्या वेळीच नियंत्रणात आणली नाही तर घातक ठरते. ह्दयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, सांधेदुखी यासारखे गंभीर आजार यामुळे होवू शकतात. डॉ. बुडविग यांनी म्हणूनच यावर फार गांभीर्याने विचार केला आहे. अनेक व्याधींची जननी ठरु शकणारा हा लठ्ठपणा संपविण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी त्यांनी तीन फूड सप्लिमेंटस एकत्रित आणि विशिष्ट प्रमाणात देण्यास सुचविले आहे. यामुळे एक महिन्यात साधारण एक ते दोन किलो वजन कमी होते. त्यानंतर हा उपचार किती दिवस सुरु ठेवावा हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे आवश्यक आहे. 5. महिलांचे आरोग्य - महिलांना मासिक पाळी सुरु होताना आणि बंद होताना अधिक त्रास होतात. याशिवाय मासिक पाळीच्या अनियमिततेमुळेही अनेक व्याधी निर्माण होतात. बाळंतपणानंतरही अनेक व्याधींना सामोरे जाण्याची वेळ येते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे डॉ. बुडविग यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे. महिलांच्यामध्ये आढळणा-या सर्वसाधारण आरोग्य समस्य़ा विचारात घेवून त्यांनी महिलांसाठी तीन सप्लिमेंटस एकत्रित विशिष्ट पध्दतीने घेण्याचा सल्ला दिला आहे. याच पध्दतीने पुरुषांच्या लैंगिक समस्यांसह वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर त्यांनी फूड सप्लिमेंट फॉर्म्युले दिले आहेत. हे आजार क्रॉनिक स्वरुपाचे असल्याने स्वतःच निर्णय घेवून कुणी प्रयोग केले तर काही विपरित घडू शकेल म्हणून या लेखात या सप्लिमेंटसची नावे आणि त्यांचे डोस दिलेले नाहीत. ज्यांना या उपचार पध्दतीचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी जरुर माझ्याशी मंपर्क साधावा. त्यांच्या आजाराशी संबंधित फॉर्म्युल्यानुसारची फूड सप्लिमेंटस आणि ती घेण्याबाबत डॉ. बुडविग यांनी केलेले मार्गदर्शन त्यांना लिखित स्वरुपात पाठविले जाईल. अन्न हेच औषध आहे आणि अन्न हेच विष आहे, असे म्हटले जाते. याचाच अर्थ योग्यवेळी, योग्यप्रकारचे आणि योग्यप्रमाणात अन्न घेतले तर ते औषधासारखे काम करते पण, अयोग्यवेळी, अयोग्यप्रकाचे आणि अयोग्य प्रमाणात अन्न घेतले तर ते विषासारखे असते. डॉ. बुडविग यांनी अन्न पदार्थांचा औषधांसारखा उपयोग करण्याचे हे ज्ञान आपल्यासाठी उपलब्ध केले आहे. त्याचा अधिकाधिक चांगला उपयोग करुन घेवून रोगमुक्त होण्यासाठी पावले उचलण्याचे काम आता आपल्यालाच करावे लागणार आहे. शेवटी निरोगी राहण्यासाठी अथवा होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि झालेला खर्च हा आजारातून बरा होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि होणारा खर्च यापेक्षा नक्कीच कमी असतो. नाही का ? डॉ. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर जि. कोल्हापूर मोबाईल - 7744964550 ई मेल - asknaturopathy@gmail.com

निरोगी आयुष्याची गुरु किल्ली .......


गवत सगळीकडे आणि सर्वदूर आढळते. पण, त्यातील रोगनिवारक घटक आणि जादूच्या खजिन्याचा शोध लावला तो डॉ. एन. विग्मोर या अमेरिकेतील महिला निसर्गोपचार तज्ज्ञाने.... डॉ.विग्मोर यांचा जन्म सन १९१० मध्ये लिथूयानात झाला. जन्मतःच आजारी बाळ अशी त्यांची अवस्था होती. त्यांच्या नशीबाने त्यांच्या आजीला फळे, फुले, पाने, वनस्पती यांच्यातील औषधी गुणधर्माचे बरेचसे ज्ञान होते. पहिल्या महायुध्दाच्या काळात जखमी सैनिकांना वनस्पती वापरुन आजीने बरे केल्याचे डॉ. विग्मोर यांनी पाहिले होते. त्यामुळे नैसर्गिक उपचाराचे बाळकडू त्यांना मिळाले होते. वयाच्या सोळाव्या वर्षी डॉ. विग्मोरना अपघात झाल्याने घोट्याजवळ दुखापत झाली. त्याचे नंतर गँगरिनमध्ये रुपांतर झाले. डॉक्टरांनी पाय कापून टाकण्याचा सल्ला दिला. आई, वडिल आणि डॉक्टरांच्या इच्छेविरुध्द जाऊन डॉ. विग्मोर यांनी हॉस्पिटलला रामराम ठोकला. बालपणापासूनच वनस्पतींच्या औषधी गुणधर्माशी परिचित असलेल्या डॉ. विग्मोरनी त्या जखमेवर गव्हाच्या तृणांकुराचा प्रयोग केला आणि त्या ब-या झाल्या. पाय कापण्याचा सल्ला देणा-या डॉक्टरांनीच त्यांना गँगरिन पूर्ण बरा झाल्याचे प्रमाणपत्र दिले. नंतर त्यांनी बोस्टनमधील एका मॅरेथॉनमध्ये भागही घेतला. गँगरिनसाठी गव्हाच्या तृणांकुराचा वापर केल्याने आपले बाकीचे शारीरिक आजारही बरे झाले असल्याचे त्यांच्या त्यावेळी लक्षात आले. त्यानंतर गवताच्या अनेक प्रकारांवर अभ्यास करुन त्यांनी असा निष्कर्ष काढला की, गव्हाचे गवत हे पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ गवत आहे. त्यानंतर त्यांनी गव्हाच्या तृणांकुराचा उपचार करणारे केंद्र काढून हजारो लोकांना रोगमुक्त केले. या ठिकाणी आलेल्या अनुभवांवर आधारित विविध पुस्तके लिहिली. भारतातही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांनी विविध प्रयोग केले. या प्रयोगांचे निकालही उत्साहवर्धक आहेत. अशा प्रकारची पृथ्वीवरील संजीवनी शोधणा-या डॉ.विग्मोर यांचे दि. ६ फेब्रुवारी १९९४ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी उपचार केंद्राला लागलेल्या आगीत धुरात घुसमटल्याने निधन झाले. गव्हांकुरातील महत्त्वाचे घटक – १) जीवनसत्व ए – या जीनसत्वामुळे डोळ्याचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. रातांधळेपणा टळतो. नाक, कान, घशात वारंवार होणारा जंतुस्पर्श टळतो. डोळ्याखालची काळी वर्तुळे, राठ केस, सुरकुत्या अशा तक्रारी या जीवनसत्वामुळे टळतात. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी हे जीवनसत्व अत्यावश्यक आहे. २) जीवनसत्व बी – मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्या विकारात उपयुक्त जीवनसत्व, भूक न लागणे, बेरीबेरी, वारंवार तोंड येणे, अकाली वृध्दत्व, मानसिक स्वास्थ बिघडणे, निद्रानाश या तक्रारीत हे जीवनसत्व उपयुक्त आहे. काही तज्ज्ञांच्या मते बी जीवनसत्वातील बी १७ (लिट्राइल) हा कॅन्सरसारख्या रोगात उपयोगी पडणारा महत्त्वाचा घटक आहे. ३) जीवनसत्व सी – दात, हिरड्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व, रोग प्रतिकारशक्ती वाढवते, उत्कृष्ठ नैसर्गिक अँण्टीबायोटिक, हे जीवनसत्व यौवनाला उत्साह देते, जखमा लवकर भरुन निघण्यास मदत करते. ४) जीवनसत्व ई – प्रजननासाठी उपयुक्त जीवनसत्व, यामुळेच वंध्यत्व आणि गर्भपात टाळता येतो. चरबीचे चयापचय होते. पुरुषबीजाची कार्यक्षमता वाढवते. मधुमेह, कॅन्सर, हृदयविकार यासारख्या डिजनरेटीव डिसीजेसमध्ये उपयोगी. निरोगी वृधत्वासाठी आवश्यक जीवनसत्व. मासिक पाळीच्या विविध तक्रारी दूर करणारे जीवनसत्व. ५) क्षार – क्षारांशिवाय जीवन अशक्य असे क्षारांचे आपल्या शरीरातील महत्त्व आहे. पेशींना आवश्यक असणा-या क्षारांमुळे शरीरातील आम्ल अल्कली समतोल टिकतो. हाडांचे आरोग्य, वृध्दावस्था, शरीरावर सूज, रक्तस्त्राव, रक्ताभिसरण मंदावणे, बेचैनी, रक्त लवकर न गोठणे, संथचाल, व्हेरिकोज व्हेन्स यासाठी उपयुक्त असणारा कॅल्शियम क्षार, अँनेमिया, गर्भावस्था, थकवा, थंड घाम येणे, त्वचा पिवळसर दिसणे, धाप लागणे, आळस, निद्रानाश अशा तक्रारीत उपयुक्त असणारा लोह क्षार. पचन आणि शरीरशुध्दी, आम्ल अल्क समतोल, मूतखड्यांचा त्रास यासाठी उपयुक्त सोडियम क्षार, यौवन, सौंदर्य, निद्रानाश, उच्च रक्तदाब, स्मरणशक्तीचा नाश, थकवा, आत्महत्त्येची मानसिकता यात उपयुक्त असणारा पोटॅशियम क्षार, आतडे, स्नायू यांचे आजार, कावीळ, पाळी उशीरा येणे, हगवण, बध्दकोष्ठता, दातांच्या तक्रारी, सर्दी पडसे, दुर्गंधीयुक्त शौच यासाठीचा मॅग्नेशियम क्षार, केसांचे आरोग्य, प्रोस्टेट ग्रंथींचे आरोग्य, सुदृढ ठेवणारा झिंक क्षार, विविध प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपयोगी ठरलेला सेलेनियम क्षार यांचा यात भरपूर साठा आहे. ६) पाचक रस (एन्झाइम्स) – गव्हाच्या तृणांकुरात अनेक प्रकारचे एन्झाइम्स आहेत. हा उद्दीपक घटक असल्याने शरीरातील प्रत्येक क्रियेत त्याची गरज असते. याच्या अभावाने शरीर कमकुवत आणि क्षीण दिसते. गव्हांकुर म्हणजे एन्झाइम्स पुरवणारी बँकच आहे. ७) प्रोटिन्स आणि अमायनो असिडस – प्रोटिन्सला आहारशास्त्रात मानाचे स्थान आहे. पेशींची निर्मिती, शरीराची वाढ यासाठी प्रोटिन्स उपयुक्त ठरतात. अन्टीबॉडी, प्लाजमा, हार्मोन्स हे प्रोटिन्सपासून बनतात. गव्हाच्या तृणाकडे वनस्पतीजन्य प्रोटिन्स मिळण्याचे प्रभावी स्थान म्हणून आहार तज्ज्ञ पहात आहेत. क्लोरोफील – निसर्गातील जादूच गव्हाच्या तृणातील हा महत्त्वाचा घटक म्हणजे निसर्गाची किमयाच आहे. सत्तर टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला हा घटक हिमोग्लोबिनमधील हेमिन नावाच्या घटकाशी प्रचंड साधर्म्य असणारा घटक आहे. म्हणूनच गव्हाच्या तृणांकुराला हिरव्या रक्ताची उपमा देतात. पांडूरोगात म्हणूनच ते खूप उपयुक्त आहे. नोबेल पुरस्कारप्राप्त डॉ. हन्स फिसचर यांनी माणसाचे रक्त आणि क्लोरोफील यांचा अणू जवळपास सारखाच असतो हे सिध्द केले आहे. अमेरिकन जर्नल ऑफ मेडिसीन, अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरी यामधील वृत्तानुसार क्लोरोफील उत्तम जंतुनाशक असल्याने ते रक्तशुध्दी करुन अनेक रोगांचा नायनाट करते. पांडूरोग, क्षय, आतड्याची सूज, जठराचा अल्सर यात ते उपयोगी ठरते. अमेरिकेच्या लोमालिंडा विद्यापीठाच्या मायक्रो बायोलॉजी विभागाने केलेल्या संशोधनानुसार क्लोरोफील किरणोत्सर्ग, गाड्यांचा धूर, सिगारेटचा धूर यांचा शरीरावर दुष्परिणाम होऊ देत नाही. डॉ. बर्चर यांच्या मते क्लोरोफीलने हृदयाचे, आतड्याचे मूत्राशयाचे फुफ्फुसाचे कार्य सुधारत असल्याने कुठल्याही महागड्या कृत्रिम टॉनिकपेक्षा ते सर्वोत्तम टॉनिक आहे. अमेरिकन जर्नल ऑफ जेरियाट्रिक सोसायटी यात आर.डब्ल्यू.यंग यांनी १९८० मध्ये लिहिलेल्या लेखानुसार क्लोरोफिलमुळे शरीराची दुर्गंधी कमी होते. डॉ.मॉरीसिटा आणि डॉ.कॅनो होटा या जपानी शास्त्रज्ञांनी हे सर्वोत्तम जंतुनाशक आणि दुर्गंधीनाशक असल्याचे लिहिले आहे. क्लोरोफिल- नेचर ग्रीन मॅजिक या पुस्तकात डॉ. रुडॉल्फ यांनी हिरड्यातून रक्त येणे, तोंडातील व्रण, पायोरिया .यात क्लोरोफिल गुणकारी असल्याने त्याचा दंतमंजनासाठी उपयोग होऊ शकतो असे नमूद केले आहे. जी. ग्रुसकीन यांनी जर्नल ऑफ सर्जरी मध्ये लिहिलेल्या लेखानुसार श्वसनसंस्थेतील जंतुसंसर्ग आणि सायनसचा त्रास क्लोरोफिलने कमी होतो. अमेरिकन जर्नल ऑफ सर्जरीमध्ये डॉ. गोल्डबर्ग यांनी यूज ऑफ क्लोरोफिल इन सेप्सीस या आपल्या लेखात क्लोरोफिलने जखमा लवकर भरतात असे लिहिले आहे. यूरोलॉज या जर्नलमध्ये १९८२ साली आलेल्या वृत्तानुसार क्लोरोफिल मूतखड्याच्या रुग्णांना उपयुक्त असल्याचे तर मुटेशन रीसर्च या जर्नलमध्ये डॉ. ऑलव्हेश यांनी त्यामुळे किरणोत्साराची तीव्रता कमी होते असे म्हटले आहे. क्लोरोफिल हे कॅन्सर विरोधी असल्याचे डॉ.सी.एन.लाय या तज्ज्ञाने न्यूट्रीशन अँड कॅन्सर या पुस्तकात सन १९७९ मध्ये लिहून ठेवले आहे. टेंपल युनिव्हर्सिटी, फिलाडेपीयाच्या डर्माटॉलॉजी विभागाचे प्रो, राईट यांच्या मतानुसार त्वचारोगात क्लोरोफिल उपयोगी सिध्द झाले आहे. पॅरिस हॉस्पिटलचे डेन्टीस्ट डॉ. होमर जुडकिन यांनी हिरड्यात क्लोरोफिलची इंजेक्शने देऊन पायोरियाचे रुग्ण बरे केले आहेत. जनरल मोटर्सच्या चार्लस केटरिंग यांनी एका महाविद्यालयात क्लोरोफिलवर संशोधन करण्यासाठी दरवर्षी तीन हजार अमेरिकन डॉलर याप्रमाणे सलग चार वर्षे खर्च केला होता. अशा या क्लोरोफिलच्या प्राप्तीसाठी गव्हाच्या तृणांकुराचा पर्याय सर्वश्रेष्ठ आहे. विशेष म्हणजे ते नैसर्गिक असल्याने पूर्ण सुरक्षित आहे. गव्हाचे तृणांकूर कुणासाठी ? गव्हांकूर फक्त आजारी आणि रोगी यांच्यासाठी आहे, हा एक गैरसमज आहे. रोगी आणि निरोगी अशा दोघांसाठी ते उपयुक्त असल्याचे डॉ. विग्मोर यांचे म्हणणे आहे. रोगनिवारण करीत असल्याने रुग्णांसाठी तर रोगप्रतिबंधात्मक असल्याने निरोगी असणा-यांसाठी ते आहे. दुधासारखाच तो एक संपूर्ण आहार आहे. विविध आजार आणि गव्हांकूर १) लैंगिक कमजोरी – गव्हांकूर नैसर्गिक व्हिएग्रा सिध्द होत आहे. मेंदूतील लिम्बिक सिस्टीम ला ते उत्तेजित करते. त्यामुळे लैंगिक आरोग्य सुधारते. त्यातील ए, बी, ई जीवनसत्व आणि झिंक हा क्षार लाभदायक आहे. ए जीवनसत्व कोलेस्ट्रॉल चरबीचे लैंगिक हार्मोन्समध्ये रुपांतर करते. बी जीवनसत्व मानसिक ताण कमी होण्यास मदत करते. त्यामुळे लैंगिक हार्मोन्सचा स्त्राव वाढतो आणि कामजीवन सुधारते. अँटी स्टरीलीटी विटामीन्स म्हणून प्रसिध्द असणारे ई जीवनसत्व लैंगिक शक्ती वाढवते. कामशक्ती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी आणि कामजीवनाच्या नियमनासाठी प्रोस्टेट ग्रंथी निकोप राहणे आवश्यक असते. यासाठी लागणारा झिंक हा क्षार यात आहे. २) मधुमेह – आहारातील पथ्ये, थोडासा व्यायाम, दोन्ही जेवणाच्या अगोदर योग्य प्रमाणात गव्हांकूर या प्रयोगाने अनेकांनी आपला मधुमेह अटोक्यात ठेवला आहे. गव्हाच्या तृणांकुरात जो चोथा असतो त्यामुळे अन्नाची चावण्यापासून शौचापर्यंत शरीरात व्यवस्थित रवानगी होते. त्यामुळे पिष्टमय पदार्थांचे शेवटपर्यंत पचन होऊन रक्तातील साखरेची पातळी कमी होते. याशिवाय चयापचय आणि इन्शुलिनच्या निर्मितीला हातभार लावणारे झिंक, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम हे क्षारही गव्हांकुरातून मिळतात. ३) हृदयरोग – पोटॅशियम, मँग्नेशियम ही खनिजे, अ, ब आणि ई ही जीवनसत्वे यामुळे गव्हांकुराचा हृदयरोगात फायदा होतो. ४) कोलेस्ट्रॉल – जीवनसत्व ई आणि गव्हांकुरात असणारा लिव्हरची कार्यशक्ती सुधारण्याचा गुणधर्म यामुळे गव्हांकूर घेणा-यांचे कोलेस्ट्रॉल सामान्य रहात असावे. ५) मूतखडा – लघवीतील आम्ल आणि अल्कलीचा समतोल साधला जात असल्याने खनिजे प्रवाही स्वरुपात राहून लघवीवाटे शरीराबाहेर टाकली जातात. त्यामुळे आणि गव्हांकुरातील अ जीवनसत्वामुळे वारंवार होणा-या मूतखड्याच्या त्रासाला प्रतिबंध होतो. ६) कॅन्सर – कॅन्सर प्रतिबंधक म्हणून गव्हाकूर जगभर प्रसिध्द झाला आहे. गव्हांकुरातील लिट्राईल –बी, चोथा आणि पोटॅशियम यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पोटॅशियमचा अभाव आणि चोथाविरहित अन्नाचे सेवन हे कर्करोगाचे कारण मानले जाते. ७) तारुण्यपीटिका – गव्हांकुरातील चोथा, जीवनसत्व अ आणि सी यामुळे तसेच रक्त शुध्द करणा-या क्लोरोफिलमुळे या तक्रारी दूर होतात. ८) केसांच्या तक्रारी – बाजारात उपलब्ध असलेल्या कुठल्याही तेलास दाद न देणा-या केसांच्या तक्रारी गव्हांकुराच्या नियमित सेवनाने नष्ट होतात. तृणरसातील प्रोटिन्स, अ आणि ब ही जीवनसत्वे, लोह, झिंक, सेलेनियम हे क्षार यामुळे हे घडते. ९) सुरकुत्या – कुठल्याही क्रीममधून प्राप्त न होणारे ए, सी, ई जीवनसत्व आणि झिंक क्षार हे सुरकुत्या प्रतिबंधक घटक गव्हांकुरातून मिळतात. १०) जळवात – अ आणि ई या गव्हांकुरातील जीवनसत्वामुळे जळवातात आराम मिळतो. ११) मुखदुर्गंधी – गव्हांकुरातील क्लोरोफिलमुळे ही दुर्गंधी दूर होते. १२) आम्लपित्त आणि पोटाचे विकार – बी जीवनसत्व, सोडियम क्षार यांच्या कमतरतेने आम्लपित्त वाढते. गव्हांकुरातून या दोन्हीचा पुरवठा होतो. याशिवाय कॅल्शियम, चोथा आणि विविध पाचक रसांमुळे आतड्याची शिथिलता कमी होते आणि अन्नाचे पचन सुधारते. १३) बध्दकोष्ठता – गव्हांकुरातील चोथा, अ जीवनसत्व, कॅल्शियम यामुळे आतड्यांच्या स्नायूंची शिथिलता कमी होऊन अन्नाचे रगडणे चांगले होते. परिणामी बध्द कोष्ठता दूर होते. १४) जठराचा अल्सर – आम्लता कमी करणारे सोडियम आणि पाचक रसांमुळे या विकारात गव्हांकुराचे अनुभव खूपच प्रभावी आहेत. १५) मासिक पाळीचे विकार – कॅल्शियम, लोह, प्रोटिन्स, ए, सी आणि ई ही जीवनसत्वे गव्हांकुरातून निश्चितपणे प्राप्त होत असल्याने या विकारात गव्हांकूर फायद्याचे ठरते. १६) निद्रानाश – कॅल्शियम, पोटॅशियम, बी जीवनसत्व हे निद्रादेवीला प्रसन्न करणारे घटक गव्हाकुरात असल्याने या विकारात फायदा होतो. १७) सांधेदुखी – सी जीवनसत्व, कॅल्शियम या गव्हांकुरातील घटकांमुळे रक्तांम्लता कमी होत असल्याने गव्हांकूर या आजारात फायद्याचे आहे. १८) ताप-इन्फेक्शन-सर्दी-खोकला – ए आणि सी या जीवनसत्वामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याने या आजारात फायदा होतो. १९) जखमा आणि फ्रॅक्चर – जखम लवकर भरणे, हाड लवकर जुळणे यासाठी गव्हांकुरातील क्लोरोफिल आण कॅल्शियम चा उपयोग होतो. २३ किलो ताज्या पालेभाज्यातून माणसाच्या शरीराला जे पोषक घटक मिळतात तेवढेच पोषक घटक अवघ्या एक किलो गव्हांकुरातून मिळतात. म्हणून गव्हांकूर हे पूर्णांन्न आहे.... ती एक पृथ्वीवरील संजीवनी आहे. गव्हांकुराचा रस घ्यावा की चूर्ण – खरेतर गव्हांकुराचा ताजा रस घेणे अधिक चांगले आहे. त्यासाठी रोज थोडे याप्रमाणे सलग सात दिवस गहू पेरुन त्याची नीट निगा राखावी लागते. सातव्या दिवशी पहिल्या दिवशी पेरलेल्या गव्हाच्या रोपांना कापून त्याचा रस काढायचा असतो. हा सगळा प्रकार आजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात शक्य नाही. म्हणून आपण बाजारात मिळणारा रस पितो. हा रस काढण्यासाठी वापरण्यात आलेले पाणी शुध्द असतेच असे नाही, रस काढताना योग्य दक्षता घेतली जाईलच असे नाही. त्याशिवाय रस काढल्यानंतर दहा मिनिटात पिणे गरजेचे आहे. बाजारात मिळणारा गव्हांकुराचा रस दहा मिनिटांपेक्षा नक्कीच अधिक जुना असतो. दररोज आपल्याला रस केंद्रावर जाऊन रस पिणे कामामुळे शक्य होत नाही. परिणामी खंड पडतो आणि अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. या सगळ्याचा विचार केला तर घरी रस काढणे शक्य नसल्याने बाजारातील रस पिण्यापेक्षा गव्हांकुराचे चूर्ण घेणे कधीही चांगले. सावलीत आणि विशिष्ट पध्दतीने वाळवून हे चूर्ण केले असल्याने त्यातील घटक योग्य प्रमाणात मिळतात. रस काढताना चोथा फेकला जातो. चूर्ण घेतले तर चोथा पोटात जातो. त्यामुळे चोथ्याचे फायदे सगळे मिळतात. चूर्ण घेताना आपण पाणी स्वतःजवळे वापरत असल्याने त्याच्या शुध्दतेची चिंता नसते. चूर्ण घरीच असल्याने किंवा सोबत घेऊन परगावी जाता येत असल्याने गव्हांकुराच्या सेवनात खंड पडत नाही आणि त्याचे संपूर्ण फायदे मिळतात. गव्हांकूर आता कॅपसूलमध्ये उपलब्ध आहे..सकाळी अनुषापोटी (काही खाण्याच्या अथवा पिण्याच्या आधी) दोन कॅपसूल्स घेतल्यास खूपच फायदा होतो. गव्हांकुर सुरु केल्यास एका माणसाचा महिन्याचा खर्च साधारण 300 रुपये आहे. म्हणजे साधारण रोज 10 रुपये आपण चहा कॉफीवर आणि कोल्ड्रिंक्सवर दररोज सरासरी दहा पंधरा रुपये खर्च करतो. त्याचा शरीराला काहीच फायदा नसतो. उलट त्यातून निरनिराळ्या व्याधीच मागे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असे व्याधी विकत घेण्यासाठी पैसे गमावण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी ते गव्हांकुरावर खर्च करणे अधिक चांगले नाही का ?..... हा सकारात्मक विचार नक्कीच तुमचे आरोग्य चांगले ठेवेल यात शंकाच नाही, म्हणूनच हा इतका मोठा लेख प्रपंच केला आहे. अत्यंत उच्च प्रतिचे गव्हांकूर चूर्ण असलेल्या कॅपसूल्स आपणास हव्या असल्यास माझ्याशी संपर्क करावा. डॉ. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर जि.कोल्हापूर मो. 7744964550 E Mail - asknaturopathy@gmail.com

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog