कॅन्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह आणि लठ्ठपणा हे आजार सध्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. या आजारांनी ग्रासणा-या रुग्णांची सतत वाढणारी संख्या नक्कीच चिंताजनक आहे. कष्टाचा अभाव, सुखासीन जीवनशैली, व्यायामाकडे दुर्लक्ष, अन्न पिकवण्याची, शिजवण्याची आणि खाण्याची रासायनिक पदार्थांचा अतिरेक असणारी चुकीची पध्दत, प्रगतीच्या अवास्तव कल्पनांमागे धावणाच्या नादात गमावलेले मनस्वास्थ आणि आलेले ताणतणाव अशी यामागची काही ठळक कारणे देता येतील. हवा आणि पाण्याचे होणारे प्रचंड प्रदूषण आणि कीटकनाशकांचा वारेमाप वापर हेही यामागचे कारण आहे. पण, आता आपण इतके पुढे गेलो आहोत की, या सगळ्यातून मागे येणे आणि पुन्हा निसर्गाशी समरस असणारी जीवनशैली स्विकारणे आपणाला शक्य होईल असे वाटत नाही. शक्य असले तरी पचेल आणि पटेल असेही नाही.
अशा परिस्थितीत आजार होवूच नये यासाठी काळजी घेणे आणि झालाच तर त्यावर अधिकाधिक नैसर्गिक उपचार करणे इतकेच आपल्या हातात आहे. आधुनिक वैद्यकाने (अलोपॅथी) अनेक आजारांवर प्रभावी औषधे जरुर दिली पण, त्याचे साईड इफेक्टस इतके आहेत की अनेकदा एका आजारातून बरा झालेला रोगी दुस-या आजाराचा शिकार कधी झाला हे कळत नाही. त्यातून वर उल्लेख केलेल्या आजारातील एखादा आजार झाला तर माणसाचे शारीरिक आरोग्य जितके धोक्यात येते त्यापेक्षा अधिक पटीने त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. कुटूंबाचे स्वास्थ बिघडते. अशा स्थितीत या आजारातून रिलिफ देण्याचे काम काही फूड सप्लिमेंटस करतात. अलोपॅथीच्या औषधांना त्यांचे काम करण्यासाठी मदत करतात. फूड सप्लिमेंटस मधील ही ताकद डॉ. बुडविग या शास्त्रज्ञ महिलेने ओळखली आणि त्यावर संशोधन करुन त्यांनी कॅन्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह आणि लठ्ठपणा यांच्यावर प्रभावीपणे काम करणा-या फूड सप्लिमेंटसवर आधारित एक उपचार पध्दती विकसित केली. डॉ. बुडविग प्रोटोकॉल या नावाने ही उपचार पध्दती युरोपियन देशात कॅन्सरसह विविध आजारांवर उपचार म्हणून आणि या आजारापासून संरक्षण होण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून वापरण्यात येते.
डॉ. बुडविग यांच्या विषयी थोडेसे.....
डॉ. जोहाना बुडविग या जर्मनीतील आघाडीच्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सात वेळेस नॉमिनेट करण्यात आले होते. जर्मन फार्माकोलॉजिस्ट, केमिस्ट आणि फिजिसिस्ट यात त्यांनी डॉक्टरेट केली आहे. फेडरल इन्स्टिट्यूट फॉर फॅटस रीसर्च या संस्थेत त्या मुख्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करतात. फॅटस आणि ऑईल्समधील जगातील आघाडीच्या तज्ज्ञ म्हणून त्यांच्या नावाला मान्यता आहे.
अनेक वर्षांच्या संशोधनानंतर त्यांनी पेशीजन्य ऑक्सिजनेशन आणि पेशींमधील ऑक्सिजन वाढविणारा शास्त्रिय पण नैसर्गिक फॉर्म्युला विकसित केला आहे. त्यासाठी त्यांनी खूप रुग्णांवर विविध प्रयोग केले आहेत. एका कॅन्सरचे उदाहरण घेतले तर या आजारातील विविधप्रकारच्या एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करुन त्यांनी आपली निरिक्षणे नोंदवली आहेत. या सगळ्या अभ्यासातून त्यांनी कॅन्सर, ब्लडप्रेशर, हृदयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह ,लठ्ठपणा , जठराचा अल्सर, संधीवात, त्वचारोग अशा अनेक आजारांवर उपयोगी ठरणारे फूड सप्लिमेंटसचे फॉर्म्युले तयार केले आहेत. कसलेही साईड इफेक्ट नसणारी आणि अत्यंत प्रभावीपणे काम करणारी ही उपचार पध्दती अशा क्रॉनिक आजारांशी झुंजणा-यांना वरदानच म्हणावी लागेल.
काही आजार आणि या उपचार पध्दतींची वैशिष्ट्ये
1. कॅन्सर - सगळ्या प्रकारच्या कॅन्सरसाठी आणि सगळ्या अवस्थेतील कॅन्सरसाठी ही उपचार पध्दती उपयुक्त असल्याचे डॉ. बुडविग यांचे निरिक्षण आहे. यामध्ये त्यांनी दोन फूड सप्लिमेंटस एकत्रितपणे विशिष्ट प्रमाणात देण्यास सांगितले आहे. हे उपचार सुरु केल्यानंतर साधारण पंचवीस दिवसांनी हिमोग्लोबिन, पांढ-या पेशी आणि चपट्या पेशी (प्लेटलेटस) वाढलेल्या दिसतील. रुग्णाची एनर्जी लेव्हल वाढलेली दिसेल. रुग्णाचे वजन कमी होत असेल तर त्याचे प्रमाण कमी झालेले दिसेल. कॅन्सरच्या गाठींची वाढ होण्याचा वेगही कमी झालेला दिसेल. रुग्णामध्ये असा बदल पंचवीस दिवसांनी आढळला की ही उपचार पध्दती किमान दीड वर्षे सुरु ठेवावी, असे त्यांनी सांगितले आहे.
2. मधुमेह ( डायबेटीस ) - ज्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) 250 - 300 अथवा त्यापेक्षा अधिक आहे अशांसाठी ही उपचारपध्दती वरदान आहे. यामध्ये त्यांनी चार फूड सप्लिमेंटस एकत्रितपणे विशिष्ट प्रमाणात देण्यास सांगितले आहे. ही फूड सप्लिमेंटस सुरु केल्यानंतर साधारण एक महिन्याभरात रक्तातील साखर नॉर्मल लेव्हलला येते असे त्यांनी नमूद केले आहे. हा बदल दिसला की हे उपचार किमान दीड वर्षे सुरु ठेवावेत असे त्यांनी म्हटले आहे.
3. हाय ब्लड प्रेशर, नर्व्हस सिस्टिमचे आजार, हृदयरोग आणि रक्तवाहिन्यांचे आजार - या सगळ्यांसाठी त्यांनी तीन फूड सप्लिमेंटस एकत्रितपणे आणि विशिष्ट प्रमाणात देण्यास सांगितले आहे. ही फूड सप्लिमेंटस सुरु केल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसू लागते. अशी सुधारणा दिसली की, किमान दोन वर्षे हे उपचार सुरु ठेवावेत असे त्यांनी सुचविले आहे.
4. लठ्ठपणा - ही सगळ्यात मोठी समस्या आहे. अनेक आजारांची जननी असणारी ही समस्या वेळीच नियंत्रणात आणली नाही तर घातक ठरते. ह्दयरोग, रक्तवाहिन्यांचे आजार, मधुमेह, सांधेदुखी यासारखे गंभीर आजार यामुळे होवू शकतात. डॉ. बुडविग यांनी म्हणूनच यावर फार गांभीर्याने विचार केला आहे. अनेक व्याधींची जननी ठरु शकणारा हा लठ्ठपणा संपविण्यासाठी आणि वजन नियंत्रित करण्यासाठी त्यांनी तीन फूड सप्लिमेंटस एकत्रित आणि विशिष्ट प्रमाणात देण्यास सुचविले आहे. यामुळे एक महिन्यात साधारण एक ते दोन किलो वजन कमी होते. त्यानंतर हा उपचार किती दिवस सुरु ठेवावा हे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठरवणे आवश्यक आहे.
5. महिलांचे आरोग्य - महिलांना मासिक पाळी सुरु होताना आणि बंद होताना अधिक त्रास होतात. याशिवाय मासिक पाळीच्या अनियमिततेमुळेही अनेक व्याधी निर्माण होतात. बाळंतपणानंतरही अनेक व्याधींना सामोरे जाण्याची वेळ येते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे डॉ. बुडविग यांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे. महिलांच्यामध्ये आढळणा-या सर्वसाधारण आरोग्य समस्य़ा विचारात घेवून त्यांनी महिलांसाठी तीन सप्लिमेंटस एकत्रित विशिष्ट पध्दतीने घेण्याचा सल्ला दिला आहे.
याच पध्दतीने पुरुषांच्या लैंगिक समस्यांसह वेगवेगळ्या आरोग्य समस्यांवर त्यांनी फूड सप्लिमेंट फॉर्म्युले दिले आहेत. हे आजार क्रॉनिक स्वरुपाचे असल्याने स्वतःच निर्णय घेवून कुणी प्रयोग केले तर काही विपरित घडू शकेल म्हणून या लेखात या सप्लिमेंटसची नावे आणि त्यांचे डोस दिलेले नाहीत. ज्यांना या उपचार पध्दतीचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी जरुर माझ्याशी मंपर्क साधावा. त्यांच्या आजाराशी संबंधित फॉर्म्युल्यानुसारची फूड सप्लिमेंटस आणि ती घेण्याबाबत डॉ. बुडविग यांनी केलेले मार्गदर्शन त्यांना लिखित स्वरुपात पाठविले जाईल.
अन्न हेच औषध आहे आणि अन्न हेच विष आहे, असे म्हटले जाते. याचाच अर्थ योग्यवेळी, योग्यप्रकारचे आणि योग्यप्रमाणात अन्न घेतले तर ते औषधासारखे काम करते पण, अयोग्यवेळी, अयोग्यप्रकाचे आणि अयोग्य प्रमाणात अन्न घेतले तर ते विषासारखे असते. डॉ. बुडविग यांनी अन्न पदार्थांचा औषधांसारखा उपयोग करण्याचे हे ज्ञान आपल्यासाठी उपलब्ध केले आहे. त्याचा अधिकाधिक चांगला उपयोग करुन घेवून रोगमुक्त होण्यासाठी पावले उचलण्याचे काम आता आपल्यालाच करावे लागणार आहे. शेवटी निरोगी राहण्यासाठी अथवा होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि झालेला खर्च हा आजारातून बरा होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि होणारा खर्च यापेक्षा नक्कीच कमी असतो. नाही का ?
डॉ. आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार, जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मोबाईल - 7744964550
ई मेल - asknaturopathy@gmail.com
No comments:
Post a Comment