Namaskar, Thanks for visiting Our Blog. I am Anand Vaman Kulkarni, Working as Naturopathy Consultant from 2006 at Jaysingpur Dist. Kolhapur (Maharashtra - India). We provide advise to cure your Health Problems. We use Food Supplements for Treatment. We launched Our own Brand Food Supplements in Capsule form. We can send it to any place in India. So you can get Trusted, Pure & proven Food Supplements.
News From Us
Monday, 10 December 2018
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी
Tuesday, 4 December 2018
पहिला निसर्गोपचार दिन आणि निसर्गोपचाराबाबत थोडक्यात माहिती
भारत
सरकारच्या आयुष मंत्रालयाने 18 नोव्हॆंबर हा नॅचरोपॅथी डे म्हणून साजरा करण्याचा
निर्णय जाहीर केला. त्यानुसार सध्या देशभरात 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा
निसर्गोपचार सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त निसर्गोपचाराचा परिचय करुन घेणे
आणि त्याचा उपयोग आपल्या निरोगी आयुष्यासाठी करणे नक्कीच फायद्याचे आहे. साधे,
सोपे, अत्यल्प खर्चाचे आणि कसलाही धोका नसलेले प्रभावी उपचार म्हणून निसर्गोपचार
आता जगात मोठ्य़ा प्रमाणात स्वीकारले जात आहेत.
प्रश्न – नॅचरोपॅथी डे साजरा करण्यामागील कारण काय असावे
?
उत्तर - निसर्गोपचार ही माणसाचा निसर्गाशी तुटलेला संबंध पुन्हा जोडणारी पध्दती
आहे. हा केवळ आजारावरचा उपचार नाही तर आजार निर्माणच होवू नये यासाठी शरीर सुदृढ
बनविणारी निसर्गोपचार ही जीवनशैली आहे. यामध्ये औषधांचा वापर केला जात नाही
त्यामुळे निसर्गोपचार स्वस्त आणि सुरक्षित आहे. अशा या उपचारपध्दतीचा प्रसार आणि
प्रचार भारतात फारसा झालेला दिसत नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या
तत्वानुसार आजारी पडल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आजार निर्माणच होवू नये अशी
व्यवस्था करणे कधीही फायद्याचेच आहे. यामुळे सरकारला निसर्गोपचाराचे महत्व पटले
आहे. या सर्वसामान्यांना परवडणा-या उपचार पध्दतींचा प्रचार आणि प्रसार भारतात
व्हावा यासाठी जागृती करणे हा या नॅचरोपॅथी डे मागील मुख्य उद्देश आहे.
प्रश्न - निसर्गोपचार म्हणजे नेमके काय ?
उत्तर - ही सृष्ठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या
पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आपले शरीरही याच पंचमहाभूतांपासून बनलेले आहे.
त्यामुळे शरीरातील कोणताही बिघाड या पंचमहाभूतांच्या उपयोगाने दुरुस्त करता येतो
असे निसर्गोपचार मानतो. थोडक्यात सांगायचे झाले तर पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे
पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे शुध्द हवा आणि आकाश म्हणजे मोकळी जागा यांचा
उपयोग करुन केलेले उपचार म्हणजे निसर्गोपचार असे म्हणता येईल. या पंचमहाभूतांचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर
करुन हे उपचार केले जातात.
प्रश्न – निसर्गोपचार पध्दतीचा शोध कुणी लावला आणि ती भारतात कशी आली ?
उत्तर – निसर्गोपचार पध्दती
नवीन नाही. निसर्गोपचारातील अनेक उपचार भारतातही प्राचीन काळात वापरले जात होते.
पण त्याला निसर्गोपचार असे नाव नव्हते. उपचार पध्दती म्हणून निसर्गोपचाराला विकसित
करण्याचे काम साधारण दीडशे वर्षांपूर्वी झाले. सन 1826 मध्ये जर्मनीतील ग्रॅफेनबर्ग
इथे डॉ. विन्सेन्ट प्रिसनिझना यांनी पहिले निसर्गोपचार चिकित्सागृह सुरु केले.
पाण्याचा विविध प्रकारानी उपयोग करुन त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले.
नंतरच्या काळात जगभरातील विविध अभ्यासकांनी यात आपल्या प्रयोगांनी भर घालून
निसर्गोपचार समृध्द बनवला. जर्मनीचे डॉ. जोहानिस स्कॉथ, फादर सॅबॅस्टियन नीप, डॉ.
हॅब्रिक लेमॅन, लुई कुह, डॉ. अडॉल्फ जस्ट, ऑस्ट्रीयाचे बॉरनॉल्ड स्किली, अमेरिकेचे डॉ.
जेम्स जॅक्सन, डॉ. रसेल ट्राल, डॉ. जे. एच. कॅलॉग, डॉ. हेनरी लिंडल्हेर, डॉ. जे.
एच. टिल्डंजना, डॉ. बर्जार मॅकपोड, डॉ. बेनेडिक्ट लस्ट, डॉ. विग्मोर अशा अनेकांचा
यात समावेश आहे.
भारतात महात्मा गांधी यांनी सन 1913 ते 1916 या काळात दक्षिण अफ्रिकेत
निसर्गोपचाराचा आश्चर्यकारक अनुभव घेतला होता. त्याचवेळी भारतातील या
उपचारपध्दतींचे अनन्यसाधारण महत्व त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे भारतात
परतल्यावर त्यांनी निसर्गोपचाराचा जोरदार प्रसार केला. पुणे सोलापूर रस्त्यावर
उरळीकांचन इथे 1946 मध्ये त्यांनी निसर्गोपचार आश्रम सुरु केला. त्यानंतर
मोरारजीभाई देसाई, डॉ. दिनशा मेहता, डॉ. लक्ष्मण शर्मा, डॉ. जानकीशरण शर्मा, डॉ.
कुलरंजन मुखर्जी, डॉ. विठ्ठलदास मोदी, डॉ. जे. एस. जासावाला, डॉ. एम. एम. भमगरा,
डॉ. एस. जे. सिंध, डॉ. रमणलाल एंजिनियर, डॉ. कृष्ण वर्मा, डॉ. शंकरभाई दवे, डॉ.
भूपतराय दवे यांनीही आपल्या अभ्यास आणि प्रयोगातून या उपचारपध्दतीत मोलाची भर
घातली.
प्रश्न - प्रत्येक उपचारपध्दतीचा सिध्दांत असतो. तसा निसर्गोपचार पध्दती
नेमक्या कोणत्या सिध्दांतावर
कार्य करते ?
कार्य करते ?
उत्तर - निसर्गोपचार पध्दती तीन प्रमुख सिध्दांतावर
कार्य करते. शरीरात साठलेली विषद्रव्ये हे सगळ्या रोगांच्या मागचे कारण आहे, हा या
उपचार पध्दतीचा मूळ सिध्दांत आहे.
त्यामुळेच साथीच्या रोगात विषाणूंना अँटीबायोटिक्सने मारुन तात्पुरता उपाय
करण्यापेक्षा विषाणूंच्या वाढीला पोषक विषद्रव्यांचा शरीरातून निचरा करुन शरीर
आतून स्वच्छ करण्यावर निसर्गोपचारात भर दिला जातो.
रोगाचे निवारण निसर्गच करतो, औषधे किंवा डॉक्टर रोगनिवारण करीत नाही हा या
उपचार पध्दतीचा दुसरा सिध्दांत आहे. त्यामुळेच आजारांवर भरमसाठ औषधांचा मारा
करण्यापेक्षा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे निसर्गोपचाराचा कल आहे.
अन्न हेच औषध आणि अन्न हेच विष आहे हा निसर्गोपचाराचा तिसरा सिध्दांत आहे.
योग्य वेळी, योग्य पध्दतीने आणि योग्य प्रमाणात घेतलेले अन्न औषधांसारखे काम करते
असे निसर्गोपचार मानतो. त्यामुळे निसर्गोपचारात आहाराला खुप महत्व आहे.
प्रश्न – निसर्गोपचार कोणकोणत्या आजारात उपयुक्त आहे ?
उत्तर – ज्या आजारांमध्ये
शस्त्रक्रिया टाळताच येत नाही असे आजार वगळता बाकी बहुतेक सगळ्या आजारात
निसर्गोपचार उपयुक्त आहे. मुळातच सगळे दवाखाने करुन झाले की रुग्ण आता हे करुन
पाहू म्हणून निसर्गोपचाराकडे वळतात आणि आश्चर्यकारकपणे बरे होतात. याचे प्रमुख
कारण म्हणजे आधुनिक वैद्यकाने आजाराला वेगवेगळी नावे दिली असली तरी ही सगळी नावे
लक्षणांवर आधारित आहेत. निसर्गोपचारात या सगळ्या लक्षणांचे कारण एकच असले पाहिजे
असा विचार केला जातो. त्यामुळे रोगाच्या मुळावर उपचार होतो. शरीरातील पचनसंस्था,
उत्सर्जन संस्था आणि मज्जासंस्था यांना बळकट बनवले जाते त्यामुळे शरीरातील
विषद्रव्ये वेळेवर बाहेर पडतात, खालेले अन्न योग्य प्रकारे पचते आणि त्यातील
शरीरोपयोगी घटकांचा पूर्ण उपयोग होतो. मज्जासंस्था बळकट झाल्याने शरीरातील अंतर्गत
संदेशवहन चांगले होते म्हणून निसर्गोपचार बहुतेक सगळ्याच आजारात प्रभावी आहे.
प्रश्न – निसर्गोपासना आणि निसर्गोपचार यात फरक काय ?
उत्तर - निसर्गोपासना म्हणजे नैसर्गिक अवस्थेकडे परत
जाणे. आधुनिकतेचा त्याग करुन नैसर्गिक अवस्थेत जगणे. अधिकाधिक नैसर्गिक राहणे.
सध्याच्या युगात हे शक्य नाही. निसर्गोपचारात असा हट्ट नाही. निसर्गातील घटकांचा
उपयोग करुन आरोग्य राखण्यावर भर आहे. आधुनिकतेचा उपयोग करुन घेण्यास हरकत नाही पण
त्याचे गुलाम न होता अधिकाधिक निसर्गाशी जवळीक साधणारी जीवनशैली म्हणजे
निसर्गोपचार. अयोग्य आहार, शारीरिक श्रमाचा अभाव, अनियमित जीवन, व्यसने, मानसिक
ताण तणाव, औषधांचा अविचारी वापर या सहा कारणांनी माणसाच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक
शक्तीचा नाश होतो असे निसर्गोपचार मानतो. त्यासाठी सगळे सोडून जंगलात रहायला जायची
गरज नाही तर आधुनिक जगातही जीवनशैलीतील बदलातून या सहा कारणांना दूर ठेवता येते
असे निसर्गोपचार मानतो.
प्रश्न - निसर्गोपचार पध्दती
रोजच्या जीवनात कशी वापरावी ?
उत्तर - निसर्गोपचार पध्दती रोजच्या जीवनात
वापरण्यासाठी आपल्या दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहे. यासाठी हे मुद्दे
उपयुक्त ठरतील –
1.
शरीरात
विषद्रव्ये आम्लाच्या स्वरुपात असतात म्हणून शरीरात आम्लाचा साठा होवू देणे अयोग्य
आहे. यासाठी आहारातील क्षारांतक पदार्थांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
2.
रात्री
लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे आवश्यक आहे. जाग्रणे करु नयेत.
3.
आपल्याला
मानवेल आणि सोसेल असा व्यायाम दररोज करणे आवश्यक आहे. शरीराची अधिकाधिक हलचाल
करावी.
4.
जेवताना
पूर्ण लक्ष जेवणाकडे असावे. टी.व्ही. मोबाईल पहात जेवण करु नये.
5.
प्राणायाम,
ध्यानधारणा, निसर्गरम्य ठिकाणी काही काळ घालवणे, एखादा छंद जोपासणे आवश्यक आहे.
6.
चहा, कॉफी
अशा पेयांपासून दूर रहावे, व्यसनांपासून मुक्त व्हावे.
7.
पॉलिश
नसलेले धान्य, रिफाईंड नसलेली तेलं यांचा वापर करावा. पिशवीतील दुधापेक्षा शक्यतर
देशी गाईचे दूध धार काढल्यावर आणून घरात तापवून वापरावे. गाईचे उपलब्ध नसेल तर
म्हशीचे चालेल. जर्सीचे दूध अजिबात वापरू नये.
8.
निसर्गोपचार
तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपवास, सूर्यस्नान, वायुस्नान, बाष्पस्नान, मातीलेपन यांचा
उपयोग करावा
9.
मुलामुलींनी
मैदानी खेळांवर अधिक भर द्यावा.
10.
टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाईल आणि वाहने यांचा
वापर मर्यादित करावा.
Sunday, 8 July 2018
जीवनसत्वे आणि त्याबाबतची माहिती - ए आणि बी जीवनसत्व
*जीवनसत्वे आणि त्याबाबतची माहिती* *
1. जीवनसत्व ए –*
*प्रौढ व्यक्तीची रोजची गरज –* 4 हजार ते 5 हजार आंतरराष्ट्रीय एकम
*कार्य –* अनेक पेशींच्या रक्षणासाठी आणि विकासासाठी याची गरज असते. दृष्टी ,तेज ठेवते. हाडांचा विकास आणि दातांचे पोषण यासाठी गरजेचे आहे.
*अभावाने होणा-या समस्या –* शरीरीचा विकास चांगला होत नाही. डोळे आणि त्वचा रुक्ष बनते. रातांधळेपणा येतो. दातांचे आणि हाडांचे विकार होतात.
*नैसर्गिक प्राप्तीस्थाने –* दूध, लोणी, हिरव्या पालेभाज्या, कोबी, गाजर, लाल आणि पावळ्या रंगाची फळे आणि भाज्या, माश्यांच्या लिव्हरमधील तेल (कॉडलिव्हर ऑईल)
*2. जीवनसत्व बी –*
हा जीवनसत्वांचा समूह आहे. यात आठ जीवनसत्वांचा समावेश आहे. बी 1, बी 2, बी 6, बी 12, नियेसीन, पॅन्टोथिनिक असिड, बायोटिन, फॉलेसिन ही ती आठ जीवनसत्वे आहेत.
*प्रौढ व्यक्तीची रोजची गरज –* 0.5 ते 5 मिलिग्रॅम
*कार्य –* शरीराचा विकास होतो. भूक लागते. पचन सुधारते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते, ज्ञानतंतू सुदृढ होतात, त्वचा निरोगी राहते, पांडूरोगाला प्रतिबंध होतो.
*अभावाने होणा-या समस्या –* बेरीबेरी नावाचा विकार होतो, डोळे, नाक या भोवतीच्या त्वचेवर चिरा पडतात, पॅलाग्रा नावाचा रोग होतो, ज्ञानतंतूत विकृती तयार होते, पांडूरोग आणि त्वचारोग होतात, चयापचनाच्या क्रियेत बिघाड होतो, शरीराचा विकास थांबतो,
*नैसर्गिक प्राप्तीस्थाने –* दूध, गव्हाचा कोंडा, गव्हांकूर, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, कडधान्ये, अंडी, मांस ( विशेषत्वाने लिव्हर), आणि मासे
- आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550
शरीरक्रिया विज्ञान
*शरीरक्रिया विज्ञान*
ज्या विषयाच्या अभ्यासाने संपूर्ण सजीव शरीर आणि त्याचे सगळे अवयव यांच्यामध्ये होणा-या नैसर्गिक क्रियांचे आणि या क्रियांना कारणीभूत असलेल्या द्रव्यांचे निरुपण केले जाते त्याला शरीरक्रिया विज्ञान असे म्हणतात.
सजीव शरीरात दोष, धातू, आणि मल अशी तीन द्रव्ये असतात. शरीराची नैसर्गिक अवस्था समजण्यासाठी दोष, धातू आणि मल यांचे नैसर्गिक स्वरुप आणि कार्य याची माहिती असणे आवश्यक आहे.
*शरीराचे मुख्य आधार*
1. त्रिदोष – वात, पित्त, कफ
2. सप्त धातू – रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र
3. तीन मल – पुरीष, मूत्र आणि स्वेद चेतना धातू, मन, बुध्दी, अहंकार, चित्त,
पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेद्रिय यांचे मानवी शरीर पृथ्वी, पाणी, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामुळे या सगळ्यांचा संबंध मानवाच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे याची माहिती असणे आवश्यकच मानले जाते.
*जीवात्मा -* मन, इंद्रिय आणि भौतिक शरीर यामध्ये जीवात्मा हा प्रमुख घटक आहे. या तिन्ही गोष्टी जीवात्म्याचे साधन आहेत. जीवात्मा जेव्हा शरीरातून वेगळा होतो तेव्हा काहीच शिल्लक रहात नाही. म्हणून जीवात्म्याला प्रधान कर्ता असे म्हटले आहे.
*त्रिदोष -* वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष सर्व शरीर व्यापी आहेत. वाताचे कार्य ज्ञानकर्म, संवेदनात्मक आहे. पित्ताच्या कार्यात रासायनिक, अग्नि, पचन यासह अनेक कार्यांचा समावेश आहे. तर कफाचे कार्य संश्लेषणात्मक आहे. याबाबत आपण सविस्तर माहिती पुढे घेणारच आहोत.
शुक्र आणि शोणितांच्या (पुरुषबीज आणि स्त्रीबीज) संयोगातून शरीराची निर्मिती होते. तेव्हापासूनच हे त्रिदोष कार्यरत असतात. गर्भावस्थेत पहिल्या सहा महिन्यात गर्भ अंगप्रत्यंगाने वाढत असताना हे त्रिदोषही परिपुष्ट होत असतात. गर्भावस्थेत वायूकडून गर्भाचे दोष, धातू, मल, अंगप्रत्यंग यांचे विभजन होते. अग्निकडून पचन होते. पाण्याकडून क्लेदन आणि संश्लेषण होते तर पृथ्वीकडून मूर्तरुप देण्याचे कार्य होते. बाळ जन्माला येवून जेव्हा श्वासोच्छवास करायला लागते तेव्हा त्याच्या शरीरात पूर्वीपासून असलेले हे त्रिदोष सक्रिय होतात.
*धातू -* हे शरीराचे धारण आणि पोषण करतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र हे सात धातू आहेत. याशिवाय जे शरीराचे धारण करतात पण पोषण करीत नाहीत त्यांना उपधातू असे म्हणतात. त्रिदोष धातूंच्या आश्रयानेच राहतात आणि सप्तधातूंचे पोषण त्रिदोषांपासूनच होते.
*मल-* स्वेद, मूत्र आणि पुरीष हे तीन मल आहेत. सप्तधातूंचेही उपमल असतात. ही मलद्रव्ये किट्ट पाकापासून होतात. काही मर्यादेपर्यंतच मल शरीराला उपयुक्त असतात. नंतर त्यापासून शरीराला अपाय संभवतो म्हणूनच त्यांना बाहेर टाकण्याची क्रिया शरीर करीत असते.
*देहधारक तत्वे -*
1. शरीर तत्वे – वात, पित्त आणि कफ
2. मानस तत्वे – सत्व, रज, तम
*त्रिदोष हेच शक्तिशाली देहोत्पादक मूळ कारण द्रव्य आहे. त्रिदोष हेच सर्व शरीरक्रियांचे नियमन आणि संचलन करीत असतात. त्यामुळे स्वस्थ किंवा निरोगी दोषांच्या अवस्थेवर शरीर स्वास्थ्य टिकवून ठेवता येते.*
म्हणूनच आपण क्रमाक्रमाने या विचाराला धरुन या विषयाची माहिती घेत जाणार आहोत.
- आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550
Saturday, 2 June 2018
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की,
हे नवीन दोन्ही प्रॉडक्टस आणि त्याचे उपयोग खाली देत आहे. शंभर टक्के शुध्दता आणि विश्वासार्हता अशी ओळख असलेले आपले प्रॉडक्टस आजवर जसे हजारो रुग्णांना त्यांच्या व्याधींपासून आराम मिळण्यासाठी उपयुक्त ठरले तसेच हे नवीन दोन्ही प्रॉडक्टसही रुग्णांना लाभदायक ठरावेत ही प्रभू श्री रामरायाच्या चरणी मनापासून प्रार्थना ......!!
आजवर या कार्यात आपण सगळ्यांनी मला भरभरुन सहकार्य केलेत, यापुढेही असेच प्रेम आणि सहकार्य मिळत रहावी ही अपेक्षा ...... !!
आनंद वामन कुलकर्णी
ASK Natural Products
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 (Whats App)
महत्त्वाचा इशारा - या दोन्ही सप्लिमेंटसचा उपयोग सुरु केल्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे सुरुच ठेवावीत. साधारण पंधरा दिवसांनी त्यांच्या औषधांचा डोस कमी करणे अथवा बंद करणेबाबतचा निर्णय तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावा. याबाबत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर कोणताही निर्णय घेणे धोकादायक ठरु शकते.
कॅन्सरसह विविध आजारात प्रभावी - हरिद्रा कॅप्सूल्स
हरिद्रा कॅप्सूल्स (Cap. Haridra) –
हरिद्रा कॅप्सूल्स या संपूर्ण नैसर्गिक आणि शुध्द हळदीपासून बनविलेल्या आहेत. त्यामुळे घरातील नेहमीच्या वापरातील हळदीपेक्षा कितीतरी अधिक चांगले परिणाम या कॅप्सूल्समुळे मिळतात. हळदीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्त शुद्ध होते, त्वचेचा रंग उजळतो, हळद जंतुनाशक आहे ह्रदविकार, मधुमेह ,कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासून हळद प्रतिबंध करते. अन्नपचनाच्या दृष्टीने हळदीचा वापर महत्त्वाचा आहे. यकृतामधून पित्तरसाचे पुरेशा प्रमाणात स्रवण होण्यास हळद मदत करते. अन्नातील स्निग्ध पदार्थाचे पूर्णपणे पचन होण्यास यामुळे फायदा होतो. जेवणानंतर येणारे जडत्व, पोटात होणारी जळजळ, गॅसेस यांवर हळद उत्तम उतारा आहे. हळदीमुळे या तक्रारी कमी होण्यास मदत होते. हळद जंतूविरोधी असल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर (त्वचा, घसा, तारुण्यपीटिका इ.) हळद उपयोगी पडते.
हळदीत तीन ते साडेतीन टक्के कर्क्युमिन आढळते. कर्क्युमिन हे द्रव्य कर्करोगापासून बचाव करण्यास उपयुक्त असल्याचे आधुनिक संशोधनात स्पष्ट झाले आहे. या संशोधनाला 'अमेरिकन असोसिएशन ऑफ कॅन्सर रीसर्च' या संस्थेनेदेखील दुजोरा दिला असून, 'क्लिनिकल कॅन्सर रीसर्च ' या विज्ञान नियतकालिकेत हे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध झाले आहे. प्रयोगशाळेतील नमुन्यात आतडय़ातील पेशींचा अभ्यास करण्यात आला. क्युरक्युमिनमुळे पेशीवर चांगला परिणाम दिसून येतो, कर्करोगाच्या पेशींशी झुंजण्यात या फायटोकेमिकलचा उपयोग होतो असे त्यात स्पष्ट झाले. सेंट लुईस विद्यापीठाचे उदयशंकर इझिकेल यांनी म्हटले आहे की, फायटोकेमिकल आतडय़ाच्या कर्करोगाची वाढ रोखतो व प्रसारही होत नाही. जेव्हा आतडय़ाचा कर्करोग असलेल्या पेशींवर कर्क्युमिनचा वापर केला जातो तेव्हा त्या मरतात. फायटोकेमिकल्स हे कर्करोग उपचारावर आश्वासक आहेत व त्यामुळे केमोथेरपीचे परिणामही टळतात. इझिकेल यांनी सांगितले की, आतडय़ाचा कर्करोग टाळण्यासाठी हळदीतील घटकांचा उपयोग होतो, त्यामुळे कर्करोगावरील उपचारात आता कर्क्युमिन एक्स्ट्रॅक्टच्या स्वरुपात वापरले जाते. पण, अयोग्य प्रमाणातील कर्क्युमिन शरीराला हानीकारकही ठरु शकते. हरिद्रा कॅप्सूल्समधून आवश्यक प्रमाणातच कर्क्युमिन मिळते. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांसाठी हरिद्रा कॅप्सूल खूपच सुरक्षित, प्रभावी आणि उपयुक्त आहेत.
हळद बुरशीनाशक तसेच सूजनाशक आहे. त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स, भरुन येत नसलेल्या जखमा, त्वचारोग अशा विकारात हळद अँटीबायोटिक्स आणि अँटिसेप्टिक औषधांसारखी काम करते. हळदीत ब (B), क (C), ई (E) ही जीवनसत्त्वे असून लोह, कॅल्शियम, तांबे, पोटँशियम, जस्त व मॅग्नेशियमही आहे. या सर्वगुणांसह शंभर टक्के शुध्द स्वरुपातील हळदीच्या या कॅप्सल्स आहेत.
Common Uses of Cap. Haridra –
Haridra (Turmeric) is used for arthritis, heartburn (dyspepsia), joint pain, stomach pain, ulcerative colitis, bypass surgery, haemorrhage, diarrhoea, intestinal gas, stomach bloating, loss of appetite, jaundice, liver problems, Helicobacter pylori (H. pylori) infection, stomach ulcers, irritable bowel syndrome (IBS), gallbladder disorders, high cholesterol, a skin condition called lichen planes, skin inflammation from radiation treatment, and fatigue. It is also used for headaches, bronchitis, colds, lung infections, fibromyalgia, leprosy, fever, menstrual problems, itchy skin, recovery after surgery, and cancers. Other uses include depression, Alzheimer's disease, swelling in the middle layer of the eye (anterior ileitis), diabetes, water retention, worms, an autoimmune disease called systemic lupus erythematosus (SLE), tuberculosis, urinary bladder inflammation, and kidney problems.

किमान हजार आजारांवर उपयुक्त - आमलकी कॅप्सूल्स
आमलकी अर्थात आवळा हे फळ आहे तसेच औषधही आहे. आयुर्वेदामध्ये बहुगुणी आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आधुनिक रासायनिक विश्लेषकांच्या आधारे आवळा या फळात जितके 'सी' व्हिटॅमिन आढळते तितके कुठल्याच अन्य फळात आढळत नाही. बेलफळाच्या दहा टक्के संत्र्यात आणि संत्र्यांच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त ' सी ' व्हिटॅमिन आवळ्यात आढळते.
आवळा तूरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब या आजारावर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक ही म्हटले जाते. आवळा शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्त असतो; रसायन म्हणजे रसरक्तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.
याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा, हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला, स्वप्नदोष, श्वेत पदर आदी आजारावर गुणकारी आहे.
किमान हजार आजारांवर आवळा उपयुक्त आहे. त्यामुळेच अबालवृध्दासाठी आवळा अतिउत्तम आहे. अशा या बहुगुणी आवळ्याच्या शंभर टक्के शुध्द स्वरुपातील या कॅप्सूल्स आहेत.
Common Uses of Cap. Aamalaki -
Amalaki (Indian Gooseberry) is taken for high cholesterol, hardening of the arteries (atherosclerosis), diabetes, pain and swelling of the pancreas (pancreatitis), cancer, upset stomach, eye problems, joint pain, diarrhoea, bloody diarrhoea (dysentery), osteoarthritis, obesity, organ restoration, and for a skin disorder that causes un pigmented skin. It is also used to kill germs and reduce pain and swelling caused by the body's reaction to injury or illness (inflammation).
आनंद वामन कुलकर्णी
ASK Natural Products
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 (Whats App)
Saturday, 26 May 2018
सोरायसिस आणि विविध त्वचा रोगांसाठी नैसर्गिक उपाय -
१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.
२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.
३. Cap. Neem
Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.
५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.
६. फळ, फळभाज्या, पालेभाज्यांचा आहारात भरपूर समावेश असावा.
७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.
८. रोज पहाटे सूर्योदयाच्या सुमारास साधारण ४ कि.मी. चालावे किंवा २४ सूर्यनमस्कार घालावेत.
९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.
१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.
आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 ( What's app)

Tuesday, 15 May 2018
मधुमेह - रक्त शर्करेबरोबरच रुग्णालाही नॉर्मल करणारा उपचार
मधुमेहात रक्त शर्करा औषधानी नॉर्मल होईल. पण, रुग्ण नॉर्मल होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिनचर्येवर लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टीने खालील उपचार सुचवित आहे.
१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात दोन चिमूट हळद टाकून प्यावे.
२. नंतर सूर्योदयाच्या सुमारास नेहमीच्या गतीने किमान तीन किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा.
३. नंतर खुर्चीत मागे टेकून बसावे. दीर्घ श्वास घ्यावा आणि कमरेत वाकून दोन्ही गुडघ्यांच्या बाहेरील बाजूने हात घेवून पायाचे अंगठे धरावेत. या स्थितीत जितके शक्य आहे तेवढा वेळ थांबावे. नंतर पुन्हा मूळ स्थितीत यावे. सहा पासून सुरुवात करुन रोज एकने वाढवत ही कृती २१ वेळा करावी.
४. सकाळचे जेवण १० ते ११ च्या दरम्यान आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा. जेवणापूर्वी एक तास आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये.
५. हे खाऊ नये - गहू, दही, साखर, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, थंड पेय, थंड पदार्थ, आईस्क्रिम, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, फास्ट फूड, जंक फूड, हॉटेलचे पदार्थ, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, रिफाईंड तेल, मिठाई, विदेशी पदार्थ आणि फळ
६. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, फिल्टर्ड शेंगतेल, कसलीही प्रक्रिया न केलेले दूध (गवळ्याकडील दूध घरी तापवावे), पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, देशी फळं, भेंडी, मेथी, मुळा, हळद
७. Cap. Karela Jamun
Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
८. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यान करावे.
९. रात्री १० नंतर जागू नये आणि सकाळी ६ नंतर झोपू नये. दुपारी अजिबात झोपू नये.
१०. सूर्यास्तानंतर काही खाऊ नये. आवश्यक नसेल तर पाणीही पिऊ नये.
या दशसूत्रीचा वापर केल्यास रक्तातील साखर नॉर्मल राहिलच पण, रुग्णही नॉर्मल होईल.
महत्त्वाचे - हे उपचार करताना डॉक्टरांनी दिलेली औषधे सुरु ठेवावीत. पंधरा दिवसांनी रक्तशर्करा तपासून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांच्या औषधांबाबत निर्णय घ्यावा. डॉक्टरांची औषधे परस्पर बंद करणे, त्याचा डोस बदलणे धोकादायक ठरु शकते.
आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर
मोबाईल - 7744964550
(What's app)

Monday, 14 May 2018
केस गळती, केसांच्या विविध समस्यांवर निसर्गोपचार -
१.जाहिरातीतील दावे खरे मानून कुठलाही शाम्पू अथवा तेल केसांना लावू नये. या समस्येसाठी वरच्या उपायांइतकाच पोटाचे आरोग्य सुधारणारा उपचारही तितकाच महत्वाचा आहे.
२. आंघोळीच्या वेळेस केसांना शिकेकाई पूड लावावी. आंघोळीच्या नंतर साधे फिल्टर्ड खोबरेल तेल (पॅराशूट वगैरे नव्हे) केसांना लावावे आणि चांगले चोळून जिरवावे.
३. सकाळी ब्रश झाल्यावर १ चमचा आवळा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यासोबत घ्यावे.
३. हे खाऊ नये - खारवलेले पदार्थ, चटपटीत व मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दही, आंबट आणि आंबवलेले पदार्थ
४. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे.
५. Cap. Wheat Grass
Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
६. जाग्रण टाळावे, सकाळी उशीरा पर्यंत झोपणे, दुपारी झोपणे टाळावे.
७. केसांना कलप लावू नये. अगदीच गरज असेल तर महूरी हिना मेहेंदी लावावी.
८. केसात कोंडा किंवा खपल्या होत असतील तर आठवड्यातून तीनदा सकाळी डोक्याला लिंबाचा रस लावावा. नंतर पंधरा मिनिटांनी आंघोळ करावी.
याप्रमाणे किमान तीन महिने उपाय करावा. त्यानंतरही समस्या कायम राहिली तर प्रत्यक्ष भेटावे.
आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर
मोबाईल - 7744964550
(what's App)
Friday, 4 May 2018
पायाच्या भेगांवर निसर्गोपचार
१. रात्री झोपण्यापूर्वी एका टबात कोमट पाणी घ्यावे. त्यात दोन लिटरला एक चमचा या प्रमाणात मीठ घालून हलवावे. नंतर या पाण्यात दोन्ही पाय बुडवून पंधरा मिनिटे बसावे. त्यानंतर पाय कोरडे करुन भेगांना तिळाच्या तेलात कालवलेली आंबेहळद लावावी आणि पायमोजे घालावेत.
२. सकाळी आंघोळीच्या वेळेस हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात दूध मिसळून त्याने पावले धुवावीत. नंतर भेगांना चंदन लावून पायमोजे घालावेत.
३. दिवसभर पायात मोजे घालावेत. बाहेर जाताना बुटांचा वापर करावा. किमान तीन महिने पाय अजिबात उघडे ठेवू नयेत.
४. हे खाऊ नये - मांसाहार, गहू, तूर डाळ, दही, थंड पेय, आईस्क्रिम, फणस, भोपळा, रिफाईंड तेल, आंबवलेले पदार्थ
५. हे खावे - ज्वारी, तूप, फिल्टर्ड शेंगतेल, ताजे ताक, भारतीय भाज्या आणि फळं
६. Cap. Wheat Grass + Cap. Aloe Vera या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
७. रात्री झोपताना बेंबीत पाच थेंब तिळाचे तेल घालावे. तसेच बेंबीच्या सभोवती साधारण दोन इंचाच्या परिघात तिळाचे तेल एक चमचा हलक्या हाताने चोळून जिरवावे.
आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर
मोबाईल - 7744964550 (What's app)
संधीवातासाठी निसर्गोपचार
१. आठवड्यातून तीन वेळा सकाळी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हलके मालिश करावे. नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.
२. शंभर मिली मोहरीच्या तेलात दोन सोललेल्या लसणाच्या कुड्या टाकून उकळावे. थंड झाल्यावर गाळून काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री अगदी झोपताना दुखणाऱ्या सांध्याना हे तेल लावून हलक्या हाताने चोळून जिरवावे. यानंतर वाऱ्यात अजिबात जावू नये.
३. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे. दुपारी भूक लागली तर हलका नाष्टा किंवा फलाहार घ्यावा. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा.
४. जेवणानंतर लगेच झोपू नये. दुपारी झोपू नये. रात्री ११ पूर्वी झोपावे आणि पहाटे ५ वाजता उठावे.
५. आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप घालून प्यावे.
*६. हे खाऊ नये - गहू, वांगी, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, पाश्चात्य फळे आणि खाद्यपदार्थ, दही, दूध नासवून बनवलेले पदार्थ, रिफाईंड तेल, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, हवाबंद डब्यातील पदार्थ, थंड पेय व पदार्थ, आईस्क्रिम, मसालेदार, चमचमीत पदार्थ, प्रेशर कुकरचा भात, अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवलेले किंवा शिजवलेले अन्न पदार्थ, फ्रिजमधील अन्न आणि पाणी*
*७. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, हळद घातलेले दूध(देशी गाईचे उत्तम, मिळत नसेल तर म्हशीचे पण जर्सी, होस्टन वगैरेचे अजिबात नको.), फिल्टर्ड शेंगतेल, गवळ्याकडील प्रक्रिया न केलेले दूध, सर्व भारतीय भाज्या आणि फळं, सात्विक अन्न, देशी गाईचे किंवा म्हशीच्या दुधापासून घरी केलेले तूप, पारंपारिक पध्दतीने शिजवलेला भात*
*८. Cap. Flax seed + Cap. Glucosamine + Cap. Aloe Vera या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.*
९. वेगवान वाहने, दूरचे सारखे प्रवास, जाग्रणे, बाहेरचे साऱखे खाणे, एकाच जागी बसून राहणे किंवा सतत उभे राहणे असे प्रकार टाळावेत.
१०. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यावे. नंतर दहा मिनिटांनी १२ सूर्यनमस्कार घालावेत.
*याप्रमाणे उपचार सलग किमान तीन महिने करावेत. तरीही फरक पडला नाही तर प्रत्यक्ष भेटावे.*
*आनंद वामन कुलकर्णी*

Thursday, 3 May 2018
अर्धशिशीवर (मायग्रेन) निसर्गोपचार
अर्धशिशी अर्थात मायग्रेन हा खूप चिवट आजार आहे. त़्यामुळे त्याची चिकित्सा सुध्दा तशीच चिवटपणे आणि दीर्घकाळ संयम राखून करावी लागेल. खालील उपचार आपणास या व्याधींमध्ये आराम देतील.
१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळावा. त्यात एक चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा सैंधव घालून प्यावे. नंतर एक तासभर काही घेवू नये.
२. त्या काळात किमान २५ वेळा अनुलोम विलोम प्राणायाम करावा. नंतर दोन्ही नाकपुडीत एक एक थेंब देशी गाईचे तुप घालावे.
३. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल टाकून घ्यावे.
४. हे खाऊ नये- वांगी, मैद्याचे पदार्थ, पालेभाजी, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, दही, पनीर, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, थंड पेय व थंड पदार्थ, तूर डाळ, गहू
५. हे खावे- ज्वारी, बाजरी, फळभाजी, फळ, लोणी काढलेले ताजे ताक, कोमट दूध, मासे, नाचणी, आलं, सैंधव मीठ
६. Cap. Flax seed + Cap. Moringa + Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
७. चहा बंद करावा. दिवसभरात एखादा कप कॉफी चालेल पण ती आलं घालून करावी.
८. अती श्रम, दगदग, ताण तणाव, प्रखर प्रकाश, जाग्रण, चालत्या वाहनात वाचन, विरुध्द अन्न सेवन, जेवणानंतर लगेच पाणी पिणे, अती विचार हे टाळावेच.
९. सकाळचे जेवण ११ पूर्वी घ्यावे आणि सायंकाळी ६ वाजता जेवावे. सकाळच्या निम्मे रात्री जेवावे.
१०. टी. व्ही. वरील मराठी/ हिंदी/ कुठल्याही मालिका, चित्रपट पाहणे बंद करावे. त्या ऐवजी नामस्मरण करावे किंवा एखादा डोक्याला ताण न देणारा छंद जोपासावा. मोबाईलचा वापरही कमीत कमी करावा.
एवढ्या उपायानी तीन महिन्यात फरक पडला नाही तर प्रत्यक्ष भेटावे.
आनंद कुलकर्णी

हात आणि पायाच्या कुरुपांवर निसर्गोपचार
१.जेष्ठमधाची कांडी मोहरीच्या तेलात तेलाचा रंग बदलेपर्यंत उगाळावी. हे तेल रोज रात्री झोपताना कुरपांना लावावे.
२. लिंबाचे काप करावेत. रात्री झोपताना ते कुरपावर बांधावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.
३. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात चार चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. हे फक्त चार आठवडेच करावे.
४. Cap. Wheat Grass + Cap. Aloevera या कॅप्सूल्स घ्याव्यात. त्या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
६. खाऊ नये - बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, साबूदाणा, मांसाहार, दूध आणि फळ एकत्र किंवा पाठोपाठ
आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
संपर्क - 7744964550
(What's app)
मुरुम / तारुण्यपीटीका / पुरळ / गळू आदींसाठी नैसर्गिक उपाय
१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.
२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.
३. व्हिटग्रास कॅप्सूल, अॅलोव्हेरा कॅप्सूल्स, नीम कॅप्सूल घ्याव्यात. या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.
४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.
५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.
६. ज्वारी, फळ, फळभाज्या, पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा.
७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.
८. रोज पहाटे सूर्योदयाच्यावेळी साधारण ४ कि.मी. चालावे.
९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.
१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.
आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 ( What's app)
उपचार लक्षणांवर नव्हे रोगाच्या मुळावर झाला पाहिजे
औरंगाबाद येथील एका महिला रुग्णाने एक दिवस मला व्हॉटस अॅपवर त्यांचे सगळे रीपोर्टस् आणि त्यांच्या त्वचारोगाचे फोटो पाठवून दिले. गेली दहा वर्षे त्या या आजाराने त्रस्त आहेत. खूप उपचार केले पण तात्पुरते बरे वाटते आणि औषधे थांबवली की पुन्हा त्रास सुरु होतो अशी त्यांची व्यथा होती. मला जे विचारायचे होते ते विचारुन झाल्यावर मी त्यांना त्यांच्या त्वचारोगावर घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय सुचविले. माझ्याकडील काही सप्लिमेंटसही पाठवली. काही पथ्यही सुचविली. त्वचा रोग चिवट असतात, त्यांचे उपचारही तसेच चिवटपणे आणि निष्ठेने दीर्घकाळ करावे लागतात याची कल्पना त्यांना दिली. नंतर पंधरा दिवस त्यांचा काहीच संपर्क नव्हता. आज अचानक त्यांनी व्हॉटस् अॅपवर संदेश पाठवला, मला निसर्गोपचार, आयुर्वेदाने फायदा होत नाही म्हणून मी पुण्यातील एका प्रसिध्द त्वचारोग तज्ज्ञांचे उपचार सुरु केले आहेत.
त्या कुठल्या पॅथीने ब-या होतील हा माझ्या दृष्टीने इथे गौण प्रश्न आहे. पॅथीचा दुराग्रह नसावा, रुग्णाला आराम मिळण्यावर लक्ष असावे, हे माझे मत आहे. त्यामुळे त्यांच्या अन्य पॅथीकडे वळण्याच्या निर्णयाचे मला अजिबात वाईट वाटत नाही. माझा मुद्दा आहे तो हा की, चटकन बरे होण्याच्या मानसिकतेतून आपण अजूनही बाहेर पडत नाही. माझा एक डॉक्टर मित्र मला नेहमी सांगतो, त्याच्याकडे येणारे नव्वद टक्के रुग्ण हाच आग्रह धरतात, डॉक्टर काही तरी असं करा की मी अर्ध्यातासात बरा होवून कामावर जाऊ शकेन. अॅलोपॅथीत हे काही अंशी करताही येत असेल पण, जे त्या शास्त्रात आहे ते सगळ्याच वैद्यक शास्त्रात असेल असे नाही. निसर्गोपचारात तर असं अजिबात होत नाही, म्हणूनच या उपचार पध्दतीतील काही मूलभूत गोष्टींचा आपण आज इथे विचार करणार आहोत.
निसर्गोपचार ही लक्षणाधिष्ठीत उपचार पध्दती नाही. ती कारणाधिष्ठीत उपचार पध्दती आहे. म्हणजे निसर्गोपचारात आजारांचा विचार करताना लक्षणांवरुन कारणाचा शोध घेतला जातो. लक्षणाला आजार समजून उपचार केले जात नाहीत. उदाहरण पाहू म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल. एखादा रुग्ण डोक दुखतय, पोटात दुखतय, चक्कर येते अशी चारपाच लक्षणे सांगत असेल तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळी औषधे किंवा उपचार निसर्गोपचारात दिले जात नाहीत. रुग्णाच्या या सगळ्या तक्रारी म्हणजे लक्षणे आहेत. व्याधी नव्हे असे मानले जाते आणि या लक्षणांच्या अनुषंगाने रुग्णाकडून अधिक माहिती मिळवली जाते. त्यानंतर या सगळ्याच्या आधारे व्याधीचे मूळ कारण निश्चित केले जाते आणि त्या मुळावर उपचार केले जातात. म्हणून निसर्गोपचारात एकदा व्याधी बरी झाली की पुन्हा लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच निसर्गोपचारात कमीत कमी औषधांचा वापर केलेला दिसतो.
आपल्या शरीरातील हजारो पेशी रोज मृत होतात, तितक्याच नवीन जन्माला येतात. या प्रक्रियेत शरीरात अनेक विषद्रव्ये तयार होतात. अन्न, पाणी आणि हवेच्या माध्यमातून शरीरात अनेक विषद्रव्ये जातात. याशिवाय न पचलेल्या अन्नातूनही शरीरात मल तयार होतो. ही सगळी घाण शरीरातून वेळच्या वेळी योग्य मार्गाने बाहेर पडणे आवश्यक असते. ही क्रिया घडली नाही तर शरीरात रोगजंतूना वाढीला पोषक भूमी तयार होते. यातून साथीच्या रोगांचे विषाणू शरीरात वाढतात आणि साथीचे रोग होतात. म्हणजेच साथीच्या रोगांचे कारण विषाणू नाहीत तर त्यांच्या वाढीला पोषक असलेली शरीरातील घाण आहे. ही घाण नसती तर विषाणू शरीरात जाऊनही काहीच झाले नसते. म्हणजेच शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपण शरीराच्या बाह्य स्वच्छतेकडे जितके लक्ष देतो तितकेच आतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असतो. निसर्गोपचारात या अंतर्गत स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी उपचारासोबत पथ्य आणि दिनचर्येतील बदलावर भर दिला आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ जरुर लागतो पण रोगाचे मूळच नाहीसे झाल्याने रोगाचा पुन्हा उद्भव होत नाही.
आपल्या शरीरातील उत्सर्जन संस्था अतिशय महत्वाची आहे, शरीरातून घाण बाहेर काढण्याचे काम या संस्थेने थांबवले की शरीरात ही घाण साठते आणि उपद्रव सुरु होतो. म्हणूनच निसर्गोपचारात उत्सर्जन संस्थेला बलशाली बनविण्यावर भर दिला जातो. त्याच सोबत शरीराचे पोषण होण्यासाठी पचनसंस्थेचे कार्य योग्य असणे आवश्यक असते. ते नसेल तर शरीर क्षीण होईलच पण न पचलेल्या अन्नाची समस्या तयार होईल. न पचलेल्या अन्नातून तयार झालेली घाण आणि क्षीण शरीर असा संयोग झाला तर आजार व्हायला कितीसा वेळ लागेल ? म्हणून निसर्गोपचार पचनशक्ती मजबूत कऱण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते. यामुळेच निसर्गोपचारात काही पथ्य पाळायला लावली जातात. पचनसंस्थेवर अकारण ताण आणणा-या पदार्थांचे सेवन बंद केले जाते तर पचनाला चालना देणा-या गोष्टींचा मुद्दाम आहारात समावेश केला जातो.
थोडक्यात काय तर, पाश्चात्य वैद्यक शास्त्राने आजारांना विविध नावे दिली असली तरी आजार होण्याची प्रमुख तीन कारणे निसर्गोपचार मानतो.
1. शरीरातील विषद्रव्यांचा योग्य वेळी आणि योग्य मार्गाने निचरा होत नाही.
2. पचन संस्था योग्य पध्दतीने आणि पूर्ण ताकदीने काम करीत नाही.
3. या दोन्ही गोष्टींना बि्घडवणारी दिनचर्या रुग्णाची आहे.
आता उपचार करायचे असतील तर उलट्या क्रमाने गेले पाहिजे तरच रुग्ण कायमचा बरा होईल. प्रथमतः त्याची आजाराला निमंत्रण देणारी दिनचर्या बदलावी लागेल. नंतर त्याची पचनसंस्था सुदृढ होण्यासाठी उपाय करावे लागतील आणि त्याच वेळी शरीरातील सगळी घाण बाहेर काढण्यावर आणि नव्याने घाण साचणार नाही यावर भर देणारे उपाय करावे लागतील. निसर्गोपचाराचे मूलभूत विज्ञान हेच आहे. म्हणून केवळ दोनचार गोळ्या, रस आणि चूर्ण देणारा खरा निसर्गोपचारक नाहीच. इतक्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ज्याच्या सल्ल्यात किंवा उपचारात आहे तोच योग्य मार्गाने निसर्गोपचार करतो असे म्हणावे लागेल.
निसर्गोपचारात सगळे शरीर एकसंध मानले जाते. त्यामुळे या शास्त्रात लक्षणे वेगवेगळ्या अवयवांवर दिसत असली तरी त्याचे मूळ शरीरात अन्यत्र असू शकते असा विचार केला जातो. म्हणून ब-याचदा डोकेदुखीची तक्रार असलेल्या रुग्णाला पोट साफ होण्याचा उपचार केला जातो आणि पोट साफ होवू लागताच ही तक्रार बंद होते असा अनुभव आहे. म्हणून आयुर्वेदात अथवा निसर्गोपचारात दिले जाणारे उपचार ब-याचदा वरुन विचित्र वाटले तरी तेच योग्य असतात कारण आजाराचे मूळच त्यामुळे उखडले जाते. यासाठी निसर्गोपचारात किंवा आयुर्वेदात तज्ज्ञांनी सांगितलेला प्रत्येक उपचार जसाच्या तसा आणि तितके दिवस निष्ठेने करणे महत्वाचे असते तरच त्याचा फायदा दिसतो. मग कदाचित हा काळ एक वर्ष किंवा दीड वर्षाचाही असू शकतो. माझ्या गेल्या दहा बारा वर्षाच्या कालखंडात अशा प्रकारे धीर धरुन वर्ष दीड वर्ष मी लिहून दिलेला प्रत्येक उपचार निष्ठेने केलेल्या आणि त्यायोगे अनेक वर्षांच्या जुनाट व्याधीतून मुक्त झालेल्या रुग्णांची उदाहरणे आहेत माझ्याकडे ...... आजारावर मात करुन स्वतः नॉर्मल होण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि चिवटपणाला माझा खरोखरच प्रणाम ......
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आपल्याला आजाराला आणि त्याच्या लक्षणांना नॉर्मल करायचे आहे की रोग्याला नॉर्मल करायचे आहे याचा विचार उपचार करणारा आणि घेणारा अशा दोघांनीही केला पाहिजे. आजार आणि लक्षणे नॉर्मल करायची असतील तर पाश्चात्य वैद्यकशास्त्रात एकापेक्षा एक स्ट्रॉंग औषधे आहेत. त्याने हे काम चुटकीसरशी होईल. पण, रुग्णाला ऩॉर्मल करायचे असेल तर आयुर्वेद आणि निसर्गोपचाला पर्याय नाही. तसेच यासाठी आवश्यक असणारा कालावधी देवून उपचार करत राहण्यालाही पर्याय नाही. जितका आजार चिवट तितका त्यावरील उपचार चिवटपणे करावा लागतो, जितका आजार दीर्घकाळचा आहे तितका त्यावरचा उपचारही दीर्घकाल चालतो हे ,साधे सूत्र मनातून स्वीकारले तर ज्याला इंग्रजीत क्रॉनिक म्हणतात अशा आजारातून बाहेर काढण्याची ताकद आयुर्वेद आणि निसर्गोपचारात नक्कीच आहे. अत्यंतिक इमर्जन्सीत अॅलोपॅथीला पर्याय नाही जे जितके सत्य आहे तितकेच अशा क्रॉनिक आजारांना मुळासकट उखडण्यासाठी आयुर्वेद आणि निसर्गोपचाराशिवाय दुसरा मार्ग नाही हेही सत्य स्वीकारले गेले पाहिजे.
शेवटी कुठलीही उपचार पध्दती असली तरी त्याला मर्यादा या असतातच. त्यामुळे ज्या त्या उपचार पध्दतीला त्यांचा वेळ द्यावाच लागेल. अनेक डॉक्टर करणे हाही एक प्रकारचा आजारच म्हणावा लागेल. शेवटी गुण कुणाचाच येणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. त्वचारोगासारख्या रोगात तर हे भान हवेच हवे. प्रस्तुत घटनेच्या अनुषंगाने जेवढे लिहिता आले तेवढे लिहिले आहे. निसर्गोपचार किंवा आयुर्वेदात लवकर गुण येत नाही असे ज्यांना वाटते त्यांना त्यामागची कारणमीमांसा सांगावी एवढाच आजचा विषय होता. त्वचारोग हा स्वतंत्र चर्चेचा विषय असल्याने त्यावर पुढच्या लेखात काही लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
आनंद वामन कुलकर्णी
निस्रगोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550 (Whats App)
Saturday, 28 April 2018
वजन वाढवा .. वजन घटवा.....सावधान.....
परवाच माझा एक जुना मित्र भेटला. एकेकाळी तब्बेतीने स्ट्रॉंग असणारा गडी पुरता ढासळला होता. मी त्याला विचारल्यावर म्हणाला, वजन घटविण्यासाठी उपचार केले आणि तब्बेत पार ढासळली. अगदी मृत्यूच्या
उंब-याला स्पर्श करुन आलो. कुणी सांगितला उपाय ? या प्रश्नावर मात्र त्याने मौन पाळले. फारच खोदून विचारल्यावर वजन वाढवा ... वजन घटवा वाले इतकच तो म्हणाला. जाऊ द्या म्हणून त्याने विषयावर पडदा टाकला पण माझ्या मनातून हा विचार जात नव्हता. लाखात एखाद्याला असं होते असे या उपचार कऱणा-याने आमच्या या मित्राला सांगितले असं तो म्हणाला.

शरीराचे वजन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी जसे अनेकजण प्रयत्नशील अाहेत तसेच वजन वाढावे यासाठीही प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. लोकांच्या या मानसिकतेचा फायदा आपल्या देशातील नेटवर्क मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करणा-या कंपन्यांनी बरोबर उचलला आहे. दिवसदिवस मश्रुम पावडरवर किंवा प्रोटिन पावडरवर रहायला सांगून कसलाही व्यायाम न करता वजन कमी करण्याचा दावा या कंपन्यांचे एजंट करीत असतात. मुळातच व्यायामाचा कंटाळा असलेले आपल्याकडचे लोक यावर मग विश्वास ठेवतात आणि कसलीही वैद्यकीय पदवी अथवा पदविका नसलेल्या या सेल्समनचे ऐकून उपाशीपोटी पावडर खात राहतात. यातूनच मग अशी जिवावर बेतणारी घटना घडते आणि भीक नको पण कुत्र आवर म्हणण्याची वेळ येते.
माझ्याकडेही अनेकजण वजन वाढविण्याचे किंवा कमी करण्याचे उपाय विचारायला येतात. आजवर मी अनेकांना याबाबत सल्लाही दिला आहे. त्यामुळे कसलाही धोका न होता त्यांचे वजन प्रमाणात आले आहे. यातील कुणालाही आपण प्रोटिन पावडर खायला घालून उपवास करायला सांगितला नव्हता.
वाढलेले वजन कमी कऱणे वाटते तितके सोपे नाही. खरं तर हा एक कार्यक्रमच आहे. सगळ्यात प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की कसलाही व्यायाम न करता वजन कमी करणे म्हणजे निसर्गाच्या कामात व्यत्यय आणणेच आहे. आपण जितके खातो तितके उपयोगात आणले नाही तर त्याची चरबी होते आणि वजन वाढते हे साधे सूत्र लक्षात घेतले तर वजन कमी कऱण्याचा कार्यक्रम दोन टप्प्याचा असणे आवश्यक आहे. त्यातील पहिला टप्पा हा संचित चरबी नष्ट कऱणे हा जितका महत्त्वाचा आहे तितकाच दुसरा टप्पा चरबीचा संचय होणार नाही अशी दिनचर्या तयार करुन देवून त्याची सवय लावणे हाही महत्त्वाचा आहे. म्हणूनच हा एक दहा कलमी कार्यक्रमच होवू शकतो. आम्ही त्याला वजन कमी करण्याची दशसूत्री म्हणतो.
ही दहा सूत्रे अशी आहेत -
1. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावे.
2. त्यानंतर किमान चार किलोमीटर जलद गतीने चालावे. सुरुवात एक किलोमीटरने करावी. दर तीन दिवसाला एक किलोमीटर वाढवावे. हे शक्य नसेल तर दररोज 24 सूर्यनमस्कार घालावेत. सुरुवात पाच पासून करावी आणि दर तीन दिवसाला एक नमस्कार वाढवित जावे.
3. शौचाला साफ होत नसेल एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप टाकून प्यावे. पहिल्या आठवड्यात रोज घ्यावे. नंतर दोन दिवसाआड घ्यावे. तीन महिन्यापेक्षा अधिकाकाळ घेवू नये.
4. हे खाऊ नये - बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक पूड, गहू, दही, दूध नासवून बनविलेले पदार्थ, मांसाहार, थंड पेय, थंड पदार्थ, आईस्क्रिम, ज्यूस, शिळे अन्न, विदेशी फळ
5. हे खावे - ज्वारी, नाचणी, बाजरी, लोणी काढलेले ताजे ताक, सगळ्या भाज्या, भारतीतील फळ, ताजे अन्न,
6. सकाळचे जेवण 11 पूर्वी आणि रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यावे. दुपारी भूक लागलीच तर हलका नाष्टा किंवा एखादे फळ खावे. सूर्यास्तानंतर काही खाऊ नये.
7. जेवणापूर्वी एक तास, जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये. जेवताना घोटघोट थोडे प्याले तरी चालेल. पोटाला तडस लागेपर्यंत जेवू नये. अर्धे पोट घट्ट अन्नाने, एक चतुर्थांश पोट पातळ पदार्थाने भरावे तर एक चतुर्थांश पोट मोकळे ठेवावे. जेवणानंतर गोड खाऊ नये. जेवणाच्या सुरुवातीस किंवा मध्ये खावे.
8. जेवणानंतर लगेच किंवा दुपारी झोपू नये. जमिनीवर मांडी घालून बसून जेवावे. उभ्याने अजिबात जेवू नये. घाईगडबडीत जेवू नये. मोबाईल, टिव्ही पहात किंवा वाचन करीत जेवू नये.
9. रात्री 10 वाजता झोपावे आणि पहाटे पाच वाजता उठावे. जाग्रणे टाळावीत तसेच अती झोपही टाळावी. एकाच जागी बसून राहू नये. शरीराची हालचाल होईल अशा पध्दतीने वस्तू ठेवाव्यात. मध्यवर्ती ठिकाणी गाडी पार्क करुन सगळी कामे चालत जाऊन करावीत. लिफ्ट आणि एसी यांचा वापर करु नये. रात्रीचा प्रवास करु नये.
10. मानसिक ताणतणावाचा वजन वाढीशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे ताणतणाव कमी कऱण्यासाठी ध्यानधारणा करावी. आध्यात्मात किंवा एखाद्या छंदात मनावरील ताण हलका करावा. वाचन करावे.
या उपायांनी या समस्येवर मात करता येते. पण हे सगळे उपाय म्हणजे दिनचर्चेतील बदलच आहे. त्यामुळे पुन्हा वजन वाढणार नाही. पण संचित चरबी कमी करण्यासाठी काही पूरक अन्नाची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी Cap. Flax Seed + Cap. Aloevera + Cap. Spirulina हे कॉम्बिनेशन चांगला फायदा देते असा माझा अनुभव आहे. या कॅप्सूल्स कशा घ्यायच्या ते मी त्या पाठवताना लिहून देतो. त्यासाठी माझ्याशी संपर्क साधावा.
आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550 (whats app)
Subscribe to:
Comments (Atom)
देशी गाईचे शुद्ध गावरान तूप
🐂 *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...
Pages
-
*100 % Pure & Natural Shilajeet* *From Himalaya To Your Home* *Shilajeet is a rare medicinal miracle in the Himalayas. We p...
-
🐂 *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...