News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Saturday, 26 May 2018

सोरायसिस आणि विविध त्वचा रोगांसाठी नैसर्गिक उपाय -

१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.

२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.

३. Cap. Neem
    Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.

५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.

६. फळ, फळभाज्या, पालेभाज्यांचा आहारात भरपूर समावेश असावा.

७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.

८. रोज पहाटे सूर्योदयाच्या सुमारास साधारण ४ कि.मी. चालावे किंवा २४ सूर्यनमस्कार घालावेत.

९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.

१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.

आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर
मो. 7744964550 ( What's app)

Tuesday, 15 May 2018

मधुमेह - रक्त शर्करेबरोबरच रुग्णालाही नॉर्मल करणारा उपचार

मधुमेहात रक्त शर्करा औषधानी नॉर्मल होईल. पण, रुग्ण नॉर्मल होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दिनचर्येवर लक्ष देणे आवश्यक आहे. या दृष्टीने खालील उपचार सुचवित आहे.

१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात दोन चिमूट हळद टाकून प्यावे.

२. नंतर सूर्योदयाच्या सुमारास नेहमीच्या गतीने किमान तीन किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा.

३. नंतर खुर्चीत मागे टेकून बसावे. दीर्घ श्वास घ्यावा आणि कमरेत वाकून दोन्ही गुडघ्यांच्या बाहेरील बाजूने हात घेवून पायाचे अंगठे धरावेत. या स्थितीत जितके शक्य आहे तेवढा वेळ थांबावे. नंतर पुन्हा मूळ स्थितीत यावे. सहा पासून सुरुवात करुन रोज एकने वाढवत ही कृती २१ वेळा करावी.

४. सकाळचे जेवण १० ते ११ च्या दरम्यान आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी घ्यावे. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा. जेवणापूर्वी एक तास आणि जेवणानंतर एक तास पाणी पिऊ नये.

५. हे खाऊ नये - गहू, दही, साखर, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, थंड पेय, थंड पदार्थ, आईस्क्रिम, दुग्धजन्य पदार्थ, पनीर, फास्ट फूड, जंक फूड, हॉटेलचे पदार्थ, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, रिफाईंड तेल, मिठाई, विदेशी पदार्थ आणि फळ

६. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, फिल्टर्ड शेंगतेल, कसलीही प्रक्रिया न केलेले दूध (गवळ्याकडील दूध घरी तापवावे), पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य, देशी फळं, भेंडी, मेथी, मुळा, हळद

७. Cap. Karela Jamun
    Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

८. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम, ध्यान करावे.

९. रात्री १० नंतर जागू नये आणि सकाळी ६ नंतर झोपू नये. दुपारी अजिबात झोपू नये.

१०. सूर्यास्तानंतर काही खाऊ नये. आवश्यक नसेल तर पाणीही पिऊ नये.

या दशसूत्रीचा वापर केल्यास रक्तातील साखर नॉर्मल राहिलच पण, रुग्णही नॉर्मल होईल.

महत्त्वाचे - हे उपचार करताना डॉक्टरांनी दिलेली औषधे सुरु ठेवावीत. पंधरा दिवसांनी रक्तशर्करा तपासून तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांच्या औषधांबाबत निर्णय घ्यावा. डॉक्टरांची औषधे परस्पर बंद करणे, त्याचा डोस बदलणे धोकादायक ठरु शकते.

आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर

मोबाईल - 7744964550
(What's app)

Monday, 14 May 2018

केस गळती, केसांच्या विविध समस्यांवर निसर्गोपचार -


१.जाहिरातीतील दावे खरे मानून कुठलाही शाम्पू अथवा तेल केसांना लावू नये. या समस्येसाठी वरच्या उपायांइतकाच पोटाचे आरोग्य सुधारणारा उपचारही तितकाच महत्वाचा आहे.

२. आंघोळीच्या  वेळेस केसांना शिकेकाई पूड लावावी. आंघोळीच्या नंतर साधे फिल्टर्ड खोबरेल तेल (पॅराशूट वगैरे नव्हे) केसांना लावावे आणि चांगले चोळून जिरवावे.

३. सकाळी ब्रश झाल्यावर १ चमचा आवळा चूर्ण एक ग्लास  कोमट पाण्यासोबत घ्यावे.

३. हे खाऊ नये - खारवलेले पदार्थ, चटपटीत व मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, दही, आंबट आणि आंबवलेले पदार्थ

४. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे.

५. Cap. Wheat Grass
     Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

६. जाग्रण टाळावे, सकाळी उशीरा पर्यंत झोपणे, दुपारी झोपणे टाळावे.

७. केसांना कलप लावू नये. अगदीच गरज असेल तर महूरी हिना मेहेंदी लावावी.

८. केसात कोंडा किंवा खपल्या होत असतील तर आठवड्यातून तीनदा सकाळी डोक्याला लिंबाचा रस लावावा. नंतर पंधरा मिनिटांनी आंघोळ करावी.

याप्रमाणे किमान तीन महिने उपाय करावा. त्यानंतरही समस्या कायम राहिली तर प्रत्यक्ष भेटावे.

आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर

मोबाईल - 7744964550
(what's App)

Friday, 4 May 2018

पायाच्या भेगांवर निसर्गोपचार


१. रात्री झोपण्यापूर्वी एका टबात कोमट पाणी घ्यावे. त्यात दोन लिटरला एक चमचा या प्रमाणात मीठ घालून हलवावे. नंतर या पाण्यात दोन्ही पाय बुडवून पंधरा मिनिटे बसावे. त्यानंतर पाय कोरडे करुन भेगांना तिळाच्या तेलात कालवलेली आंबेहळद लावावी आणि पायमोजे घालावेत.

२. सकाळी आंघोळीच्या वेळेस हरभऱ्याच्या डाळीच्या पिठात दूध मिसळून त्याने पावले धुवावीत. नंतर भेगांना चंदन लावून पायमोजे घालावेत.

३. दिवसभर पायात मोजे घालावेत. बाहेर जाताना बुटांचा वापर करावा. किमान तीन महिने पाय अजिबात उघडे ठेवू नयेत.

४. हे खाऊ नये - मांसाहार, गहू, तूर डाळ, दही, थंड पेय, आईस्क्रिम, फणस, भोपळा, रिफाईंड तेल, आंबवलेले पदार्थ

५. हे खावे - ज्वारी, तूप, फिल्टर्ड शेंगतेल, ताजे ताक, भारतीय भाज्या आणि फळं

६. Cap. Wheat Grass + Cap. Aloe Vera या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

७. रात्री झोपताना बेंबीत पाच थेंब तिळाचे तेल घालावे. तसेच बेंबीच्या सभोवती साधारण दोन इंचाच्या परिघात तिळाचे तेल एक चमचा हलक्या हाताने चोळून जिरवावे.

आनंद वामन कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर

मोबाईल - 7744964550 (What's app)

संधीवातासाठी निसर्गोपचार

१. आठवड्यातून तीन वेळा सकाळी संपूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने हलके मालिश करावे. नंतर कोमट पाण्याने स्नान करावे.

२. शंभर मिली मोहरीच्या तेलात दोन सोललेल्या लसणाच्या कुड्या टाकून उकळावे. थंड झाल्यावर गाळून काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे. रोज रात्री अगदी झोपताना दुखणाऱ्या सांध्याना हे तेल लावून हलक्या हाताने चोळून जिरवावे. यानंतर वाऱ्यात अजिबात जावू नये.

३. सकाळचे जेवण ११ पूर्वी आणि रात्रीचे सूर्यास्तापूर्वी करावे. दुपारी भूक लागली तर हलका नाष्टा किंवा फलाहार घ्यावा. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा.

४. जेवणानंतर लगेच झोपू नये. दुपारी झोपू नये. रात्री ११ पूर्वी झोपावे आणि पहाटे ५ वाजता उठावे.

५. आठवड्यातून तीन वेळा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे तूप घालून प्यावे.

*६. हे खाऊ नये - गहू, वांगी, मैदा आणि मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, पाश्चात्य फळे आणि खाद्यपदार्थ, दही, दूध नासवून बनवलेले पदार्थ, रिफाईंड तेल, पाश्चराईज्ड पॉलीबॅगमधील दूध, हवाबंद डब्यातील पदार्थ, थंड पेय व पदार्थ, आईस्क्रिम, मसालेदार, चमचमीत पदार्थ, प्रेशर कुकरचा भात, अॅल्युमिनियमच्या भांड्यात ठेवलेले किंवा शिजवलेले अन्न पदार्थ, फ्रिजमधील अन्न आणि पाणी*

*७. हे खावे - ज्वारी, बाजरी, नाचणी, लोणी काढलेले ताजे ताक, हळद घातलेले दूध(देशी गाईचे उत्तम, मिळत नसेल तर म्हशीचे पण जर्सी, होस्टन वगैरेचे अजिबात नको.),  फिल्टर्ड शेंगतेल, गवळ्याकडील प्रक्रिया न केलेले दूध, सर्व भारतीय भाज्या आणि फळं, सात्विक अन्न, देशी गाईचे किंवा म्हशीच्या दुधापासून घरी केलेले तूप, पारंपारिक पध्दतीने शिजवलेला भात*

*८. Cap. Flax seed + Cap. Glucosamine + Cap. Aloe Vera या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.*

९. वेगवान वाहने, दूरचे सारखे प्रवास, जाग्रणे, बाहेरचे साऱखे खाणे, एकाच जागी बसून राहणे किंवा सतत उभे राहणे असे प्रकार टाळावेत.

१०. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून प्यावे. नंतर दहा मिनिटांनी १२ सूर्यनमस्कार घालावेत.

*याप्रमाणे उपचार सलग किमान तीन महिने करावेत. तरीही फरक पडला नाही तर प्रत्यक्ष भेटावे.*

*आनंद वामन कुलकर्णी*
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर

मोबाईल - 7744964550 (What's app)

Thursday, 3 May 2018

अर्धशिशीवर (मायग्रेन) निसर्गोपचार

अर्धशिशी अर्थात मायग्रेन हा खूप चिवट आजार आहे. त़्यामुळे त्याची चिकित्सा सुध्दा तशीच चिवटपणे आणि दीर्घकाळ संयम राखून करावी लागेल. खालील उपचार आपणास या व्याधींमध्ये आराम देतील.

१. सकाळी ब्रश झाल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळावा. त्यात एक चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा सैंधव घालून प्यावे. नंतर एक तासभर काही घेवू नये.

२. त्या काळात किमान २५ वेळा अनुलोम विलोम प्राणायाम करावा. नंतर दोन्ही नाकपुडीत एक एक थेंब देशी गाईचे तुप घालावे.

३. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल टाकून घ्यावे.

४. हे खाऊ नये- वांगी, मैद्याचे पदार्थ, पालेभाजी, बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, दही, पनीर, आंबवलेले पदार्थ, शिळे अन्न, थंड पेय व थंड पदार्थ, तूर डाळ, गहू

५. हे खावे- ज्वारी, बाजरी, फळभाजी, फळ, लोणी काढलेले ताजे ताक, कोमट दूध, मासे, नाचणी, आलं, सैंधव मीठ

६. Cap. Flax seed + Cap. Moringa + Cap. Aloe Vera
या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

७. चहा बंद करावा. दिवसभरात एखादा कप कॉफी चालेल पण ती आलं घालून करावी.

८. अती श्रम, दगदग, ताण तणाव, प्रखर प्रकाश, जाग्रण, चालत्या वाहनात वाचन, विरुध्द अन्न सेवन, जेवणानंतर लगेच पाणी पिणे, अती विचार हे टाळावेच.

९. सकाळचे जेवण ११ पूर्वी घ्यावे आणि सायंकाळी ६ वाजता जेवावे. सकाळच्या निम्मे रात्री जेवावे.

१०. टी. व्ही. वरील मराठी/ हिंदी/ कुठल्याही मालिका, चित्रपट पाहणे बंद करावे. त्या ऐवजी नामस्मरण करावे किंवा एखादा डोक्याला ताण न देणारा छंद जोपासावा. मोबाईलचा वापरही कमीत कमी करावा.

एवढ्या उपायानी तीन महिन्यात फरक पडला नाही तर प्रत्यक्ष भेटावे.

आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर जि कोल्हापूर

मोबाईल - 7744964550

हात आणि पायाच्या कुरुपांवर निसर्गोपचार

१.जेष्ठमधाची कांडी मोहरीच्या तेलात तेलाचा रंग बदलेपर्यंत उगाळावी. हे तेल रोज रात्री झोपताना कुरपांना लावावे.

२. लिंबाचे काप करावेत. रात्री झोपताना ते कुरपावर बांधावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा.

३. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात चार चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. हे फक्त चार आठवडेच करावे.

४. Cap. Wheat Grass + Cap. Aloevera या कॅप्सूल्स घ्याव्यात. त्या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

६. खाऊ नये - बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ, साबूदाणा, मांसाहार, दूध आणि फळ एकत्र किंवा पाठोपाठ

आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर

संपर्क - 7744964550
(What's app)

मुरुम / तारुण्यपीटीका / पुरळ / गळू आदींसाठी नैसर्गिक उपाय

१. कोणतेही साबण, शाम्पू वापरु नये. हरभऱ्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून ते अंगाला लावावे आणि स्नान करावे. देशी गाईचे दूध मिळाले तर उत्तमच. नसेल तर म्हशीचे वापरावे पण जर्सी चे अजिबात नको.

२.आंबेहळद दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी.

३. व्हिटग्रास कॅप्सूल, अॅलोव्हेरा कॅप्सूल्स, नीम कॅप्सूल घ्याव्यात. या कशा घ्यायच्या ते पाठवताना लिहून देतो.

४. आठवड्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे एरंडेल तेल टाकून प्यावे. त्यानंतर तीन दिवसांनी एक दिवसाचा पूर्ण उपवास करावा. उपवासाच्या दिवशी फक्त पाणी आणि जिऱ्याची फोडणी दिलेले ताजे ताक दर दोन तासांनी एक एक ग्लास प्यावे.

५. गहू, तूर डाळ, मैद्याचे पदार्थ, आंबट व आंबवलेले पदार्थ, शिळे, फ्रिजमधील पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, दूध दही आणि फळांचे एकत्र सेवन, आंबाडी अजिबात खाऊ नये.

६. ज्वारी, फळ, फळभाज्या, पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा.

७. आंघोळीच्या एक बादली पाण्यात एक ग्लास याप्रमाणे ताजे गोमूत्र मिसळावे. उपलब्ध नसेल तर गोमूत्र अर्क वापरला तरी चालेल.

८. रोज पहाटे सूर्योदयाच्यावेळी साधारण ४ कि.मी. चालावे.

९. कडक ऊनापासून त्वचेचे रक्षण करावे. जाग्रण करु नये. पचन बिघडेल असे काही करु नये.

१०. सकाळचे जेवण दहापूर्वी आणि रात्रीचे सात ते आठच्या दरम्यान घ्यावे.

आनंद कुलकर्णी,
निसर्गोपचार सल्लागार,
जयसिंगपूर जि. कोल्हापूर

मो. 7744964550 ( What's app)

उपचार लक्षणांवर नव्हे रोगाच्या मुळावर झाला पाहिजे

     औरंगाबाद येथील एका महिला रुग्णाने एक दिवस मला व्हॉटस अॅपवर त्यांचे सगळे रीपोर्टस् आणि त्यांच्या त्वचारोगाचे फोटो पाठवून दिले. गेली दहा वर्षे त्या या आजाराने त्रस्त आहेत. खूप उपचार केले पण तात्पुरते बरे वाटते आणि औषधे थांबवली की पुन्हा त्रास सुरु होतो अशी त्यांची व्यथा होती.  मला जे विचारायचे होते ते विचारुन झाल्यावर मी त्यांना त्यांच्या त्वचारोगावर घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय सुचविले. माझ्याकडील काही सप्लिमेंटसही पाठवली. काही पथ्यही सुचविली. त्वचा रोग चिवट असतात, त्यांचे उपचारही तसेच चिवटपणे आणि निष्ठेने दीर्घकाळ करावे लागतात याची कल्पना त्यांना दिली. नंतर  पंधरा दिवस त्यांचा काहीच संपर्क नव्हता. आज अचानक त्यांनी व्हॉटस् अॅपवर संदेश पाठवला, मला निसर्गोपचार, आयुर्वेदाने फायदा होत नाही म्हणून मी पुण्यातील एका प्रसिध्द त्वचारोग तज्ज्ञांचे उपचार सुरु केले आहेत.

     त्या कुठल्या पॅथीने ब-या होतील हा माझ्या दृष्टीने इथे गौण प्रश्न आहे. पॅथीचा दुराग्रह नसावा, रुग्णाला आराम मिळण्यावर लक्ष असावे, हे माझे मत आहे.  त्यामुळे त्यांच्या अन्य पॅथीकडे वळण्याच्या निर्णयाचे मला अजिबात वाईट वाटत नाही. माझा मुद्दा आहे तो हा की, चटकन बरे होण्याच्या मानसिकतेतून आपण अजूनही बाहेर पडत नाही. माझा एक डॉक्टर मित्र मला नेहमी सांगतो, त्याच्याकडे येणारे नव्वद टक्के रुग्ण हाच आग्रह धरतात, डॉक्टर काही तरी असं करा की मी अर्ध्यातासात बरा होवून कामावर जाऊ शकेन. अॅलोपॅथीत हे काही अंशी करताही येत असेल पण, जे त्या शास्त्रात आहे ते सगळ्याच वैद्यक शास्त्रात असेल असे नाही. निसर्गोपचारात तर असं अजिबात होत नाही, म्हणूनच या उपचार पध्दतीतील काही मूलभूत गोष्टींचा आपण आज इथे विचार करणार आहोत.

     निसर्गोपचार ही लक्षणाधिष्ठीत उपचार पध्दती नाही. ती कारणाधिष्ठीत उपचार पध्दती आहे. म्हणजे निसर्गोपचारात आजारांचा विचार करताना लक्षणांवरुन कारणाचा शोध घेतला जातो. लक्षणाला आजार समजून उपचार केले जात नाहीत. उदाहरण पाहू म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल. एखादा रुग्ण डोक दुखतय, पोटात दुखतय, चक्कर येते अशी चारपाच लक्षणे सांगत असेल तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळी औषधे किंवा उपचार निसर्गोपचारात दिले जात नाहीत. रुग्णाच्या या सगळ्या तक्रारी म्हणजे लक्षणे आहेत. व्याधी नव्हे असे मानले जाते आणि या लक्षणांच्या अनुषंगाने रुग्णाकडून अधिक माहिती मिळवली जाते. त्यानंतर या सगळ्याच्या आधारे व्याधीचे मूळ कारण निश्चित केले जाते आणि त्या मुळावर उपचार केले जातात. म्हणून निसर्गोपचारात एकदा व्याधी बरी झाली की पुन्हा लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच निसर्गोपचारात कमीत कमी औषधांचा वापर केलेला दिसतो. 

     आपल्या शरीरातील हजारो पेशी रोज मृत होतात, तितक्याच नवीन जन्माला येतात. या प्रक्रियेत शरीरात अनेक विषद्रव्ये तयार होतात. अन्न, पाणी आणि हवेच्या माध्यमातून शरीरात अनेक विषद्रव्ये जातात. याशिवाय न पचलेल्या अन्नातूनही शरीरात मल तयार होतो. ही सगळी घाण शरीरातून वेळच्या वेळी योग्य मार्गाने बाहेर पडणे आवश्यक असते. ही क्रिया घडली नाही तर शरीरात रोगजंतूना वाढीला पोषक भूमी तयार होते. यातून साथीच्या रोगांचे विषाणू शरीरात वाढतात आणि साथीचे रोग होतात. म्हणजेच साथीच्या रोगांचे कारण विषाणू नाहीत तर त्यांच्या वाढीला पोषक असलेली शरीरातील घाण आहे. ही घाण नसती तर विषाणू शरीरात जाऊनही काहीच झाले नसते. म्हणजेच शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपण शरीराच्या बाह्य स्वच्छतेकडे जितके लक्ष देतो तितकेच आतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असतो. निसर्गोपचारात या अंतर्गत स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी उपचारासोबत पथ्य आणि दिनचर्येतील बदलावर भर दिला आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ जरुर लागतो पण रोगाचे मूळच नाहीसे झाल्याने रोगाचा पुन्हा उद्भव होत नाही. 

     आपल्या शरीरातील उत्सर्जन संस्था अतिशय महत्वाची आहे, शरीरातून घाण बाहेर काढण्याचे काम या संस्थेने थांबवले की शरीरात ही घाण साठते आणि उपद्रव सुरु होतो. म्हणूनच निसर्गोपचारात उत्सर्जन संस्थेला बलशाली बनविण्यावर भर दिला जातो. त्याच सोबत शरीराचे पोषण होण्यासाठी पचनसंस्थेचे कार्य योग्य असणे आवश्यक असते. ते नसेल तर शरीर क्षीण होईलच पण न पचलेल्या अन्नाची समस्या तयार होईल. न पचलेल्या अन्नातून तयार झालेली घाण आणि क्षीण शरीर असा संयोग झाला तर आजार व्हायला कितीसा वेळ लागेल ?  म्हणून निसर्गोपचार पचनशक्ती मजबूत कऱण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते. यामुळेच निसर्गोपचारात काही पथ्य पाळायला लावली जातात. पचनसंस्थेवर अकारण ताण आणणा-या पदार्थांचे सेवन बंद केले जाते तर पचनाला चालना देणा-या गोष्टींचा मुद्दाम आहारात समावेश केला जातो.

     थोडक्यात काय तर, पाश्चात्य वैद्यक शास्त्राने आजारांना विविध नावे दिली असली तरी आजार होण्याची प्रमुख तीन कारणे निसर्गोपचार मानतो. 
1. शरीरातील विषद्रव्यांचा योग्य वेळी आणि योग्य मार्गाने निचरा होत नाही.
2. पचन संस्था योग्य पध्दतीने आणि पूर्ण ताकदीने काम करीत नाही.
3. या दोन्ही गोष्टींना बि्घडवणारी दिनचर्या रुग्णाची आहे.
आता उपचार करायचे असतील तर उलट्या क्रमाने गेले पाहिजे तरच रुग्ण कायमचा बरा होईल. प्रथमतः त्याची आजाराला निमंत्रण देणारी दिनचर्या बदलावी लागेल. नंतर त्याची पचनसंस्था सुदृढ होण्यासाठी उपाय करावे लागतील आणि त्याच वेळी शरीरातील सगळी घाण बाहेर काढण्यावर आणि नव्याने घाण साचणार नाही यावर भर देणारे उपाय करावे लागतील. निसर्गोपचाराचे मूलभूत विज्ञान हेच आहे. म्हणून केवळ दोनचार गोळ्या, रस आणि चूर्ण देणारा खरा निसर्गोपचारक नाहीच. इतक्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ज्याच्या सल्ल्यात किंवा उपचारात आहे तोच योग्य मार्गाने निसर्गोपचार करतो असे म्हणावे लागेल.

     निसर्गोपचारात सगळे शरीर एकसंध मानले जाते. त्यामुळे या शास्त्रात लक्षणे वेगवेगळ्या अवयवांवर दिसत असली तरी त्याचे मूळ शरीरात अन्यत्र असू शकते असा विचार केला जातो. म्हणून ब-याचदा डोकेदुखीची तक्रार असलेल्या रुग्णाला पोट साफ होण्याचा उपचार केला जातो आणि पोट साफ होवू लागताच ही तक्रार बंद होते असा अनुभव आहे. म्हणून आयुर्वेदात अथवा निसर्गोपचारात दिले जाणारे उपचार ब-याचदा वरुन विचित्र वाटले तरी तेच योग्य असतात कारण आजाराचे मूळच त्यामुळे उखडले जाते. यासाठी निसर्गोपचारात किंवा आयुर्वेदात तज्ज्ञांनी सांगितलेला प्रत्येक उपचार जसाच्या तसा आणि तितके दिवस निष्ठेने करणे महत्वाचे असते तरच त्याचा फायदा दिसतो. मग कदाचित हा काळ एक वर्ष किंवा दीड वर्षाचाही असू शकतो. माझ्या गेल्या दहा बारा वर्षाच्या कालखंडात अशा प्रकारे धीर धरुन वर्ष दीड वर्ष मी लिहून दिलेला प्रत्येक उपचार निष्ठेने केलेल्या आणि त्यायोगे अनेक वर्षांच्या जुनाट व्याधीतून मुक्त झालेल्या रुग्णांची उदाहरणे आहेत माझ्याकडे ......  आजारावर मात करुन स्वतः नॉर्मल होण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि चिवटपणाला माझा खरोखरच प्रणाम  ......

     सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आपल्याला आजाराला आणि त्याच्या लक्षणांना नॉर्मल करायचे आहे की रोग्याला नॉर्मल करायचे आहे याचा विचार उपचार करणारा आणि घेणारा अशा दोघांनीही केला पाहिजे. आजार आणि लक्षणे नॉर्मल करायची असतील तर पाश्चात्य वैद्यकशास्त्रात एकापेक्षा एक स्ट्रॉंग औषधे आहेत. त्याने हे काम चुटकीसरशी होईल. पण, रुग्णाला ऩॉर्मल करायचे असेल तर आयुर्वेद आणि निसर्गोपचाला पर्याय नाही. तसेच यासाठी आवश्यक असणारा कालावधी देवून उपचार करत राहण्यालाही पर्याय नाही.  जितका आजार चिवट तितका त्यावरील उपचार चिवटपणे करावा लागतो, जितका आजार दीर्घकाळचा आहे तितका त्यावरचा उपचारही दीर्घकाल चालतो हे ,साधे सूत्र मनातून स्वीकारले तर ज्याला इंग्रजीत क्रॉनिक म्हणतात अशा आजारातून बाहेर काढण्याची ताकद आयुर्वेद आणि निसर्गोपचारात नक्कीच आहे. अत्यंतिक इमर्जन्सीत अॅलोपॅथीला पर्याय नाही जे जितके सत्य आहे तितकेच अशा क्रॉनिक आजारांना मुळासकट उखडण्यासाठी आयुर्वेद आणि निसर्गोपचाराशिवाय दुसरा मार्ग नाही हेही सत्य स्वीकारले गेले पाहिजे. 

     शेवटी कुठलीही उपचार पध्दती असली तरी त्याला मर्यादा या असतातच. त्यामुळे ज्या त्या उपचार पध्दतीला त्यांचा वेळ द्यावाच लागेल. अनेक डॉक्टर करणे हाही एक प्रकारचा आजारच म्हणावा लागेल. शेवटी गुण कुणाचाच येणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. त्वचारोगासारख्या रोगात तर हे भान हवेच हवे. प्रस्तुत घटनेच्या अनुषंगाने जेवढे लिहिता आले तेवढे लिहिले आहे. निसर्गोपचार किंवा आयुर्वेदात लवकर गुण येत नाही असे ज्यांना वाटते त्यांना त्यामागची कारणमीमांसा सांगावी एवढाच आजचा विषय होता. त्वचारोग हा स्वतंत्र चर्चेचा विषय असल्याने त्यावर पुढच्या लेखात काही लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. 

आनंद वामन कुलकर्णी 
निस्रगोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550 (Whats App)




देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog