News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Tuesday, 26 March 2019

... तर तापदायक उन्हाळा सुसहाय्य होऊ शकेल ...!!!


उन्हाळा सुरु झाला तसं वाढते ऊन आणि त्यापासून होणारे त्रास यांच्यापासून बचाव कसा करायचा अशी विचारणा करणा-यांची संख्या वाढू लागली आहे. सुखासीन जीवनशैलीला कवटाळताना आपण निसर्गाला पुरते विसरलो आहोत. खरं तर वाढत्या उन्हाळ्यापासून बचाव करण्याची यंत्रणा आपल्या शरीरातच परमेश्वर कृपेने कार्यरत असते यावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे कृत्रिम साधनांचा आमचा शोध संपतच नाही. साहजिकच ही कृत्रिम साधने जशी तात्पुरता फायदा देतात तशी दीर्घकालीन नुकसानही न कळत पदरात घालून जातात.

 यासाठीच वाढत्या उन्हाळ्यात होणारे काही सर्वसामान्य त्रास प्रथम पाहू.

 1. पित्ताचा त्रास - यामध्ये आंबट किंवा कडू गुळण्या येणे, उलट्या होणे, डोके दुखणे, जळजळणे, अंगावर पुरळ, गांध्या किंवा लाल चट्टे उठणे, अंग खाजणे, पित्तजन्य त्वचारोग उफाळून येणे अशा त्रासांचा समावेश करता येईल.

 2. पचन विकारातील बिघाड - यामध्ये अपचन, वारंवार पातळ शौचाला होणे, बध्दकोष्ठाचा विकार बळावणे, मुळव्याध, भूक कमी होणे, पोटात दुखणे अशा त्रासांचा समावेश करता येईल.

 3. अकस्मात होणारे त्रास - चक्कर येणे, खूप थकवा येणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, ताप येणे, सनस्ट्रोक होणे, उन्हाळे लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे आणि लघवी थोडी थोडी होणे.

 उन्हाळ्यात होणा-या त्रासांपासून बचाव करण्याच्या काही अगदी सोप्या आणि पूर्ण नैसर्गिक उपायांकडे आता थोडे पाहू -

 1. उन्हाळ्यात दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हातून फिरण्याचे टाळावे. अगदीच पर्याय नसेल तर डोक्याला टोपी घालावी किंवा रुमाल बांधावा. विदर्भ, मराठवाड्यात टोपीखाली अथवा रुमालाखाली कांदा ठेवतात.

 2. उन्हातून आल्यावर लगेच उभ्याने गटागट पाणी पिऊ नये. बाहेरुन आल्यावर प्रथम हात पाय स्वच्छ धुवावेत. पाच ते दहा मिनिटे खुर्चीत किंवा बैठकीवर स्वस्थ बसावे. नंतर तहान लागली असेल तरच खाली बसून घोट घोट पाणी प्यावे. पाणी रुम टेंम्परेटरचे प्यावे किंवा मातीच्या मडक्यातील वाळा घातलेले प्यावे. फ्रिजमधील आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यातील थंड पाणी हानीकारक असते.

 3. उन्हातून आल्यावर लगेच एसी, कुलर किंवा पंखा सुरु करु नये. उन्हातून सावलीत आल्यावर शरीराला हा बदल सामावून घेण्यास पाच ते दहा मिनिटांचा अवधी द्यावा. या काळात घाम आला तर वैतागू नये. निसर्गाला त्याचे काम कऱण्यासाठी वेळ द्यावा. शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्याचे काम यातून होत असते. घाम सुती रुमालाने पुसून घ्यावा.

 4. सकाळचे जेवण 10 पूर्वी करावे आणि रात्रीचे 7 पूर्वी करावे. दुपारच्या वेळात भूक लागलीच तर हलका नाष्टा, ताक घातलेली नाचणीच्या पिठाची आंबील, घरी बनवलेला मठ्ठा, कलिंगड, द्राक्षे, संत्र, मोसंबी, अंजीर, आंबा अशी फळ यापैकी काहीतरी खावे. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा.

 5. लहानमुलांना आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने जंत आणि कृमींंचे औषध द्यावे.

 6. उन्हाळ्याच्या दिवसात सुती आणि सैल कपड्यांचा उपयोग करावा. जाडे भरडे आणि घट्ट कपडे वापरु नयेत. त्यामुळे त्वचारोग होण्याचा धोका असतो. कपडे स्वच्ठ धुतलेले वापरावेत. कपड्यांचा रंग भडक आणि गडद नसावा. फिकड रंगाचे किंवा पांढरे कपडे अधिक चांगले असतात.

 7. उन्हाळ्याच्या दिवसात शीतपेय, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रिम यांचा वापर वरुन थंडावा देत असला तरी याचे अंतिम परिणाम वाईट होतात. त्यामुळे या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. त्याऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, सोलकढी, ताक, मठ्ठा, विविध प्रकारांची सरबते, गुलकंद, अल्प प्रमाणात लस्सी यांचा उपयोग करावा. चहा आणि कॉफी बंदच करावी. शक्य नसेल तर प्रमाण 75 टक्क्यांनी कमी करावे.

 8. उन्हाळ्याच्या दिवसात तळकट, मसालेदार, मांसाहार, चमचमीत, तिखट पदार्थ टाळावेत. गाड्यावर, हॉटेलमध्ये अगदीच पर्याय नसेल तर खावे. पण अधिकाधिक वेळेस घरच्या खाद्यपदार्थांचा आणि घरच्या जेवणाचा उपयोग करावा.

 9. काही सोपे उपाय -

तळपायाची आणि डोळ्यांची जळजळ होत असेल तर रात्री झोपताना तळपायाला एरंडेल तेल लावून हलक्या हातानी चोळून जिरवावे. दुधात बुडवलेली कापडाची घडी दोन्ही डोळ्यांवर ठेवावी.

 उन्हाळे लागले असेल ( लघवीला कमी होणे, लघवी करताना जळजळणे) तर रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात एक चमचा धणे भिजत घालावेत. सकाळी ब्रश झाल्यावर धणे काढून पाणी प्यावे. बेंबीवर ओल्या कापडाची घडी ठेवावी.

 नाकातून रक्तस्त्राव झाल्यास टाळूवर पाणी थापावे. कांदा फोडून हुंगण्यास द्यावा. रक्तस्त्राव एवढ्याने थांबला नाही तर लगेच वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवावे.

 घामोळे आले असेल तर साबण वापरणे बंद करावे. हरभ-याच्या डाळीचे पीठ, दुधाची साय एकत्र करुन आंघोळ करताना लावावी. हळद आणि चंदनाचा समावेश असलेले उटणे लावावे.

 चक्कर आल्यास किंवा सनस्ट्रोक झाल्यास तात्काळ वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत. 

ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना Cap. Aloe Vera आणि Cap. Aamalaki यांचे सेवन फायद्याचे ठरेल. या कशा घ्यायच्या ते त्या पाठवताना सोबत लिहून देतो. यासाठी माझ्याशी व्क्तीगत व्हॉटस अप किंवा फोनवर संपर्क साधावा.

 10. घरात तांब्याची घागर असेल तर ती भरुन सकाळी 8 वाजता उन्हात ठेवावी आणि सायंकाळी पाच वाजता त्यातील गरम पाण्याने स्नान करावे. याला झळवणी घेणे असे म्हणतात. यामुळे उन्हाळा बाधत नाही. घरातील 12 वर्षांच्या आतील मुलांना हे स्नान अवश्य घालावे.

 याप्रमाणे उपाय योजना केल्यास एरव्ही तापदायक ठरणारा उन्हाळा ब-याच अंशी सुसहाय्य ठरेल. अर्थातच हे उपाय करुनही उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर वैद्याचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101 जि. कोल्हापूर
मोबाईल - 7744964550 (व्हॉटस अँप)

Sunday, 24 February 2019

शिलाजीत - हिमालयातील औषधी चमत्कार

शिलाजीत ही एक प्राचीन आणि नैसर्गिक औषधी आहे. शिलाजीत हा एक प्रकारचा चिकट पदार्थ असतो जो हिमालयातील दगडांमध्ये सापडतो. हे चवीला अतिशय कडवट पण गरम आणि वीर्यवर्धक आहे. याचा रंग वितळवलेल्या घट्ट कोळश्याप्रमाणे असतो. शिलाजीत खूप हळू हळू विकसित होते.

 शिलाजीत सामान्यतः आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये वापरले जाते. ही एक प्रभावी आणि सुरक्षित औषधी आहे जी आपली संभोग क्षमता वाढवते आणि शरीरावर अजून सकारात्मक परिणाम करते. ही औषधी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे.

शिलाजीत सेवनाचे फायदे-
 १) अल्झायमर रोग -  अल्झायमर हा असा रोग आहे जो मेंदू वर दुष्परीणाम करतो. हा असा रोग आहे जो मेंदू मध्ये स्मृती, व्यवहार आणि आकलन क्षमता यांच्याशी निगडित अडचणी निर्माण करतो. अल्झायमरच्या लक्षणांमध्ये सुधार आणण्यासाठी जी औषधी वापरतात त्यात मुख्यत्वे करून शिलाजीतचा वापर केला जातो. आणि शिलाजीत खूप गुणकारी ठरलं आहे या रोगावर. तज्ज्ञांचे मानणं आहे की शिलाजीत हे अल्झायमर रोगाच्या प्रगतीवर रोख लावतं व त्याला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतं.

 शिलाजीत मध्ये एक अँटी ऑक्सिडंन्ट असतं जे फुलीक ऍसिड म्हणून ओळखलं जातं. आपल्या शरीरात प्रोटीन गोठू न देण्याचं महत्वपूर्ण काम पण शिलाजीत करतं. प्रोटीन हा आपल्या शरीरातील खूप महत्वपूर्ण घटक आहे आणि हा गोठला तर मेंदूची कार्यप्रणाली धीम्या गतीने होते. ते गोठू न देण्याच मुख्य काम शिलाजीत करतं.

 २) टेस्टस्टेरॉनचा स्तर वाढवतं -  टेस्टस्टेरॉन हा पुरुषांचा प्राथमिक लैंगिक हार्मोन आहे आणि याचा स्तर प्रत्येक पुरुषामध्ये कमी अधिक असू शकतो. ज्या पुरुषांमध्ये टेस्टस्टेरॉनचा स्तर कमी असतो त्यांना काही अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. ज्यामध्ये मुख्यत्वे संभोग करण्याची इच्छा कमी होणे, थकवा, अनिद्रा इत्यादी. एका अध्ययनानुसार ही बाब समजली आहे की, जर एखादा पुरुष 250 मिली ग्राम शिलाजीतचा नियमितपणे 3 महिने घेत असेल तर त्याच्या टेस्टरॉनच्या स्तरामध्ये समाधान कारक वाढ होते. पण हा प्रयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 ३) शारीरिक स्टॅमिनाशी निगडित इतर आजार –
अनिद्रा –
सुस्ती किंवा थकवा जाणवणे –
अंगदुखी –
वेडेपणा –
हायपोक्सीया –
पुलनुमारी इडीमा

ही सर्व लक्षणे कोणत्याही एका उच्च स्तरीय (डोंगराळ) भागांमध्ये होणाऱ्या रोगाकडे इशारा करतात. तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, शिलाजीतचं सेवन केल्याने उंच ठिकाणी म्हणजेच डोंगराळ भागात राहिल्यामुळे होणाऱ्या आजारांपासून मुक्तता मिळू शकते किंवा त्यांना होण्याआधीच प्रतीबंधीत केलं जाऊ शकतं. शिलाजीत मध्ये फुलविक ऍसिड आणि अशी 84 खनिजे समाविष्ट आहेत जी वेगवेगळे स्वास्थ्य फायदे देतात. शिलाजीत आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं, स्मृती वाढवतं, अँटी इंफ्लामेट्री म्हणजे सूज कमी करतं, शरीरातील ऊर्जा वाढवणं, आणि आपल्या शरीरातील अतिरिक्त द्रव काढून टाकण्यासाठी एक अँटी ऑक्सिडंन्ट म्हणून कार्य करतं. शिलाजीत अनेक प्रकारांनी आपल्याला मजबूती प्रदान करतं.

 नपुंसकता, स्वप्नदोष, धातुदोष, शीघ्रपतन हे असे आजार आहेत जे वैवाहिक जीवनावर खूप मोठा परिणाम करतात. असंयमित खाणपिणे, शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, इतर काही चुकीच्या सवयींमुळे पुरुषांना कमजोरीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. शिलाजीत या सर्वच अजारांविरोधात प्रभावी आहे.

यांच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा आटोक्यात राहते. परिणामी मधुमेहावर इलाज सुद्धा होतो. शिलाजीत रोगप्रतीकार शक्ती तर वाढवतेच पण सोबतच शारीरिक आणि मानसिक शक्ती सुद्धा प्रदान करते. शिलाजीतचे नियमित सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवते व नेहमी ताजे आणि तरुण राहण्यासाठी मदत करते.

 आम्ही अत्यंत उच्च प्रतीचे आणि शुध्दतेबाबत शंभर टक्के खात्रीचे शिलाजीत उपलब्ध केले आहे. शिलाजीतचा सर्वसाधारण डोस हरभ-याच्या डाळी इतक्या आकाराचा असल्याने सर्वसामान्यपणे एका माणसाला 20 ग्रॅम शिलाजीत दोन महिने सहज पुरेल. 20 ग्रॅम शिलाजीतची किंमत 1000 रुपये आहे. तुम्ही बँक खात्यावर पैसे ट्रान्स्फर करुन तुमचा नाव, पत्ता, पिनकोड आणि संपर्क क्रमांक कळविल्यास तुम्हाला पोस्टाने किंवा कुरिअरने घरपोहोच पाठवले जाईल.

 बँक डीटेल्स -
Anand Vaman Kulkarni
State Bank of India, Br, Jaysingpur
Savings Account No. 30308341042
IFSC - SBIN0011136

FOR BHIM APP - 7709443520@upi

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog