News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Friday, 10 June 2016

*मूळव्याध : अवघड जागेचे असहाय्य दुखणे*


अलिकडे मूळव्याधीच्या रुग्णात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. वरकरणी वरवरचे वाटत असले तरी हे दुखणे साधे मुळीच नाही. म्हणून मूळव्याधीवर वेळीच आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे. *मूळव्याध होण्याची काही कारणे -* बध्दकोष्ठता आणि त्याकडे केलेले दुर्लक्ष, बैठा व्यवसाय, व्यायामाचा अभाव, सतत उष्ण पदार्थांचे सेवन, मैदा, मांस यांचे सतत सेवन, जेवणातील अनियमितता, मसालेदार, तळकट पदार्थांचे सतत सेवन, फास्ट फूड आणि बेकरीचे पदार्थ, रात्री जागणे आणि सकाळी उशीरा उठणे इत्यादी. *मूळव्याधीवर नैसर्गिक उपचार -* १. शौचाच्यावेळी रक्त पडत असेल तर तांबड्या झुपकेदार जास्वंदीचे एक फूल देठ काढून टाकून खडीसाखरेच्या दोन खड्यांसोबत रक्त पडायचे थांबेपर्यंत खावे. २. आठवड्यातून तिनदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात तीन चमचे देशी गाईचे तूप टाकून प्यावे. मिळाले नाही तर म्हशीचे तूप घ्यावे. जर्सीचे अजिबात नको. ३. तूप - पाण्याचे दिवस सोडून रोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यासोबत दोन चमचे त्रिफळा चूर्ण घ्यावे. ४. शौचाचे जागी जखम, मोड असतील तर आंबेहळद आणि तुरटीची लाही लोण्यात किंवा दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी. ५. Cap. Aloevera सकाळी आणि रात्री जेवणानंतर एक एक घ्यावी. Cap Wheat Grass सकाळी ब्रश झाल्यावर अनुषापोटी दोन साध्या पाण्यासोबत घ्याव्यात. ६. दररोज पहाटे किंवा संध्याकाळी किमान चार किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा. ७. सकाळचे जेवण १० ते १२ तर रात्रीचे ७ ते ९ च्या दरम्यान घ्यावे. दुपारी भूक लागलीच तर फळं खावीत. ८. रात्री ११ वाजता झोपावे आणि पहाटे ५ वाजता उठावे. *हे खाऊ नये -* शिळे अन्न, मसालेदार, तळकट चमचमीत पदार्थ, मिरची, अतितिखट, शीतपेय, आईस्क्रिम, दही, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, थंड पाणी आणि फ्रिजमधील पदार्थ, मांसाहार, खवा, श्रीखंड, बासुंदीसारखे दुग्धजन्य पदार्थ, चवळी, मटकी, तूरडाळ, वांगे *हे आवर्जुन खावे -* पालेभाज्या, कोबी, ताजे लोणी काढलेले ताक, फळभाज्या, फळ, कंदमूळं, काकडी, रुम टेंम्परेचरचे भरपूर पाणी 👉 इतके करुनही त्रास कायम राहिला तर तात्काळ प्रत्यक्ष भेटावे. आनंद वामन कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर जि. कोल्हापूर मो. 7744964550

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog