News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Friday, 10 June 2016

*मूळव्याध : अवघड जागेचे असहाय्य दुखणे*


अलिकडे मूळव्याधीच्या रुग्णात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. वरकरणी वरवरचे वाटत असले तरी हे दुखणे साधे मुळीच नाही. म्हणून मूळव्याधीवर वेळीच आणि योग्य उपचार करणे आवश्यक आहे. *मूळव्याध होण्याची काही कारणे -* बध्दकोष्ठता आणि त्याकडे केलेले दुर्लक्ष, बैठा व्यवसाय, व्यायामाचा अभाव, सतत उष्ण पदार्थांचे सेवन, मैदा, मांस यांचे सतत सेवन, जेवणातील अनियमितता, मसालेदार, तळकट पदार्थांचे सतत सेवन, फास्ट फूड आणि बेकरीचे पदार्थ, रात्री जागणे आणि सकाळी उशीरा उठणे इत्यादी. *मूळव्याधीवर नैसर्गिक उपचार -* १. शौचाच्यावेळी रक्त पडत असेल तर तांबड्या झुपकेदार जास्वंदीचे एक फूल देठ काढून टाकून खडीसाखरेच्या दोन खड्यांसोबत रक्त पडायचे थांबेपर्यंत खावे. २. आठवड्यातून तिनदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात तीन चमचे देशी गाईचे तूप टाकून प्यावे. मिळाले नाही तर म्हशीचे तूप घ्यावे. जर्सीचे अजिबात नको. ३. तूप - पाण्याचे दिवस सोडून रोज रात्री एक ग्लास कोमट पाण्यासोबत दोन चमचे त्रिफळा चूर्ण घ्यावे. ४. शौचाचे जागी जखम, मोड असतील तर आंबेहळद आणि तुरटीची लाही लोण्यात किंवा दुधाच्या साईत कालवून रात्री झोपताना लावावी. ५. Cap. Aloevera सकाळी आणि रात्री जेवणानंतर एक एक घ्यावी. Cap Wheat Grass सकाळी ब्रश झाल्यावर अनुषापोटी दोन साध्या पाण्यासोबत घ्याव्यात. ६. दररोज पहाटे किंवा संध्याकाळी किमान चार किलोमीटर चालण्याचा व्यायाम करावा. ७. सकाळचे जेवण १० ते १२ तर रात्रीचे ७ ते ९ च्या दरम्यान घ्यावे. दुपारी भूक लागलीच तर फळं खावीत. ८. रात्री ११ वाजता झोपावे आणि पहाटे ५ वाजता उठावे. *हे खाऊ नये -* शिळे अन्न, मसालेदार, तळकट चमचमीत पदार्थ, मिरची, अतितिखट, शीतपेय, आईस्क्रिम, दही, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, थंड पाणी आणि फ्रिजमधील पदार्थ, मांसाहार, खवा, श्रीखंड, बासुंदीसारखे दुग्धजन्य पदार्थ, चवळी, मटकी, तूरडाळ, वांगे *हे आवर्जुन खावे -* पालेभाज्या, कोबी, ताजे लोणी काढलेले ताक, फळभाज्या, फळ, कंदमूळं, काकडी, रुम टेंम्परेचरचे भरपूर पाणी 👉 इतके करुनही त्रास कायम राहिला तर तात्काळ प्रत्यक्ष भेटावे. आनंद वामन कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर जि. कोल्हापूर मो. 7744964550

Thursday, 28 January 2016

स्वास्थ


भारतीय संस्कृतीत माणसाच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देश धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती हा सांगितला आहे. हे चारही पुरुषार्थ प्राप्त करण्याचे साधन म्हणजे माणसाचे आरोग्य होय ! शरीर व्याधीग्रस्त असेल तर माणूस धर्माचे पालन करु शकत नाही. हवे तितके धनही मिळवू शकत नाही. काम सुखाचा आनंद घेणेही त्याला अशक्य बनू शकते. मोक्षाचा विषय तर लांबच राहिला. शरीर स्वास्थ आणि मनाचाही जवळचा संबंध असतो. म्हणूनच तर म्हटले आहे, " शरीर धड तर मन धड " निरोगी भिकारी हा रोगी कोट्यधिशापेक्षा सुखी असतो. म्हणून जीवनाचे खरे सार म्हणजे आरोग्य ! म्हणूनच आयुर्वेदाचा मूळ उद्देश निरोगी माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि नंतर दुसरा उद्देश रोग्यांच्या व्याधीचे निवारण करणे असा आहे. पण हल्लीच्या जीवनशैलीत सुखासाठीच्या धडपडीत लोकांना स्वास्थ आणि आरोग्य या विषयी फारशी आस्था राहिलेली नाही. त्यामुळे आजारी पडले की डॉक्टरांकडे धावायचे. पटकन बरे वाटेल असे औषध घ्यायचे आणि पुन्हा शरीराला कामाला जुंपायचे असा प्रकार सुरु असतो. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता आणि जीवनशक्तीवर विपरित परिणाम होत असतो. आपल्याकडे सध्या चार उपचारपध्दती प्रचलित आहेत. १. अँलोपँथी २. आयुर्वेद ३. होमिओपँथी. ४. निसर्गोपचार आणखीनही काही उपचार पध्दती आहेत. पण, त्या आपल्याकडे फारशा नाहीत. यातील अँलोपँथी या उपचार पध्दतीचा सगळ्यांनाच परिचय आहे. आधुनिक वैद्यक शास्त्र असे याला जरी म्हणत असले तरी त्याला अनेक मर्यादा आहेत. मुळातच ही उपचार पध्दती लक्षणाधिष्टीत आहे. त्यामुळे इथे लक्षणानुसार औषध योजना केली जात असल्याने प्रत्येक लक्षणाला वेगळे औषध दिले जाते. त्यामुळे रुग्णाला औषधांची उसळ खावी लागते. इतके करुनही औषध लक्षणावर असल्याने रुग्णाला लक्षण कमी झाले की बरे झाल्यासारखे वाटते. नंतर काही काळाने आजार त्याच अथवा दुस-या रुपात डोके वर काढतो. या उपचार पध्दतीत वापरली जाणारी औषधे ही रसायने असतात. त्यांच्या प्रभावाने लक्षणे लगेच कमी होतातही, पण त्याचे दुष्परिणामही तिततकेच असल्याने रुग्णाला ती त्रासदायक ठरतात. एका आजाराची लक्षणे कमी होतानाच नवीन व्याधीची बीजे पेरली जातात.त्यामुळे रोग्याला आयुष्यभर कसल्या ना कसल्या व्याधींचा सामना करतच जगावे लागते. काही व्याधीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी तात्काळ उपाय म्हणून ही उपचार पध्दती फायद्याची आणि आवश्यक नक्कीच आहे, पण मनुष्याला आरोग्यदायी जीवन ती देऊ शकत नाही. त्यासाठी स्थल, काल, प्रकृती, आहार, विहार, निसर्ग आणि विकृती या सगळ्यांचा साकल्याने विचार करावा लागतो. त्यानुसार लक्षणांचा विचार करुन रोगाच्या मुळाशी आणि रुग्णाच्या मनाशी पोहोचावे लागते. लक्षण म्हणजे रोगाच्या अस्तित्वाबाबत शरीराने दिलेला इशारा आहे. ते सूत्र पकडून रोगाच्या मुळाशी पोहोचून तिथे उपचार केले तर रोगी व्याधीमुक्त होतो, हा विचार अँलोपँथीपेक्षा आयुर्वेदात अधिक सूत्रबध्द आणि प्रभावीपणे केला आहे. सध्या लोकप्रिय असलेल्या अँलोपँथीच्या मर्यादा आणि आरोग्याबाबत सूक्ष्म विचार करण्याची आयुर्वेदाची पध्दत याचा थोडक्यात आढावा आपण घेतला. आता ख-या आरोग्याची ओळख करुन घेवू. लठ्ठ आणि दिसायला भक्कम असलेले शरीर म्हणजे आरोग्य असा अनेकांचा समज आहे. ज्यांच्या शरीरीत कसलेही जंतू नाहीत तो निरोगी असाही काहीजणांचा समज आहे. पण, या दोन्हीतही पूर्ण आरोग्याचा परिचय नाही. ज्याच्या शरीरात वात म्हणजे स्नायू मंडल, पित्त म्हणजे पाचकाग्नी आणि रक्त संवहन, कफ म्हणजे ओज अथवा जीवनशक्ती आणि मलोत्सर्ग हे निश्चित अवस्थेत, बरोबर आणि एकसमान आहेत व यथायोग्य काम करत आहेत. असाच मनुष्य पूर्ण स्वस्थ आहे, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. आयुर्वेदाने आत्मा आणि मन यांचाही विचार केला आहे. आरोग्याचा विचार करता मनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पूर्ण स्वास्थ्यात शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्यही गरजेचे आहे. शरीराने स्वस्थ दिसणारा मनुष्य मनाने प्रसन्न नसेल तर त्याला स्वस्थ कसे म्हणता येईल ? त्यामुळे शारीरिक आरोग्याचा विचार करण्याआधी आपल्याला मानसिक आरोग्याबाबत चिंतन करावे लागणार आहे.

वजन वाढणेसाठी उपाय


१. रात्री झोपताना एक चमचा कच्चे शेंगदाणे आणि अर्धा चमचा उडीद डाळ वाटीभर पाण्यात भिजत घाला. सकाळी ब्रश झाल्यावर पाणी काढून टाकून चावून चावून खा. २. व्हिटग्रास कँप्सूल्स, स्पिरुलिना कँप्सूल्स आणि अँलोव्हिरा कँप्सूल्स रोज प्रत्येकी दोन घ्या. या कँप्सूल्स कधी आणि कशा घ्यायच्या ते त्या पाठवताना त्यासोबत लिहून देतो. यामुळे तुमचे दरमहा साधारण एक ते दीड किलो वजन वाढेल. पूर्ण परिणाम दिसण्यासाठी सहा महिने किमान घेणे आवश्यक आहे. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर मो. ७७४४९६४५५०

किडणीच्या विकारांवर भारतीय उपचार


१. देशी गाईच्या दुधापासून बनवलेल्या आणि लोणी काढलेल्या एक ग्लास ताज्या ताकात दोन चिमूट गुळवेल सत्व घालून ढवळून प्यावे. दिवसातून तीन वेळा. २. फ्लँक्स सीड कँप्सूल्स सकाळी एक आणि रात्री एक जेवणापूर्वी १५ मिनिटे घ्याव्यात. ३. मोरिंगा पावडर कँप्सूल्स सकाळी एक आणि रात्री एक जेवणानंतर लगेच घ्याव्यात. ४. व्हिट ग्रास कँप्सूल्स सकाळी अनुषापोटी दोन घ्याव्यात. याप्रमाणे किमान एक वर्ष उपाय केल्यास किडणीच्या विकारात फायदा होतो. �� महत्त्वाचे - वरील उपचार डॉक्टरांनी दिलेली औषधे आणि सांगितलेले उपाय सुरु ठेवूनच करावेत. डॉ. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर मो. ७७४४९६४५५०

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog